Acidity Remedies : अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोय? मग ‘हे’ 10 पदार्थ आजपासून खायला सुरू करा

लेखात अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी 10 उत्तम पदार्थांची चर्चा केली आहे. या पदार्थांमधील पोषक तत्वे आणि त्यांचे अ‍ॅसिडिटीवर कसे उपायकारी परिणाम होतात हे स्पष्ट केले आहे. या सोप्या घरी उपलब्ध असलेल्या उपायांनी अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.

Acidity Remedies : अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोय? मग 'हे' 10 पदार्थ आजपासून खायला सुरू करा
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 12:29 PM

प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात का होईना अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोच होतो. बदललेली जीवनशैली आणि वेळेत न जेवणे या कारणामुळे अ‍ॅसिडिटी होत असते. याशिवाय मानसिक ताण, धूम्रपान, जास्त कॅफिन घेणे, जास्त तिखट, तिखट आणि आम्लयुक्त अन्न पदार्थ खाणे इत्यादी गोष्टी देखील अ‍ॅसिडिटीला कारणीभूत होऊ शकतात. म्हणूनच, अ‍ॅसिडिटी रोखण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. आम्ही तुम्हाला दहा पदार्थांची माहिती देणार आहोत.

1. ओवाचे पाणी

ओवा टाकून उकडलेले पाणी पिणे पचनाचे सर्व त्रास दूर करण्यास फायदेशीर ठरते. गॅस, पोट फुगणे, पचनासंबंधी तणाव आणि इतर समस्या दूर करण्यासाठी ओवा खूप प्रभावी आहे. यामध्ये असलेले एंझाईम्स याला मदत करतात.

2. तूप

पचनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी दररोज थोडं तूप खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. यामुळे पचन संस्थेतील आम्लांचे प्रमाण नियंत्रणात राहते. म्हणून, अ‍ॅसिडिटी असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारात तूपाचा समावेश केला पाहिजे.

3. आले चहा

आल्यात सूजनविरोधी गुण असतात. म्हणून आले टाकलेला चहा पिणे अ‍ॅसिडिटीच्या समस्यांना दूर करण्यास मदत करू शकतो.

4. थंड दूध

अ‍ॅसिडिटी समस्या असलेल्या व्यक्तींनी दररोज थंड दूध पिणे एक चांगली सवय बनवली पाहिजे. दुधामध्ये असलेला कॅल्शियम आणि हायड्रोक्लोरिक अॅसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो.

5. नारळ पाणी

नारळ पाण्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे पचनातील अस्वस्थतेला दूर करण्यास मदत होते. म्हणून अ‍ॅसिडिटीची समस्या असलेल्या व्यक्तींनी दररोज नारळ पाणी पिण्याचा प्रयत्न करावा.

6. हिंग

पोटामधील जास्त आम्ल उत्पादन थांबवण्यासाठी हिंग अत्यंत उपयुक्त आहे. हिंग अ‍ॅसिडिटी, गॅस, पोट फुगणे, पोटदुखी अशा पचनाच्या समस्यांवर एक उत्तम उपाय आहे. दररोज हिंग टाकून उकडलेले पाणी पिणे ही एक चांगली सवय आहे.

7. ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये अँटी-ऑक्सिडन्ट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे ग्रीन टी नियमितपणे पिणे अ‍ॅसिडिटीसारख्या पचनाच्या समस्यांना थांबवण्यास मदत करते.

8. केळं

केळं हे पोषणतत्त्वांनी भरलेले एक फळ आहे. यामध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडन्ट्स यांचा समावेश असतो. हे पचनासंबंधी अ‍ॅसिडिटी कमी करण्यास मदत करते.

9. काकडी

काकडी खाल्ल्याने पोट संपूर्ण दिवसभर थंड राहते. शरीरात पाणी राखण्यासाठी देखील काकडी फायदेशीर आहे. म्हणून काकडी आपल्या आहारात समाविष्ट केल्याने अ‍ॅसिडिटी, गॅस इत्यादी पचनासंबंधी समस्यांना दूर करण्यात मदत होते.

10. पालेभाजी

पालक, ब्रॉकली आणि इतर पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर्स असतात. हे पचन प्रक्रियेला मदत करतात. याशिवाय, अ‍ॅसिडिटी सारख्या समस्यांपासून देखील आराम मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतात. या अन्न पदार्थांचा नियमितपणे आहारात समावेश करून अ‍ॅसिडिटीच्या समस्यांपासून मुक्ती मिळवता येऊ शकते.

'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा.
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?.
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची...
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची....
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात.
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI.
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.
विधानसभेतील यशानंतर भाजपच मिशन BMC, मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम?
विधानसभेतील यशानंतर भाजपच मिशन BMC, मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम?.
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर? कोणी दाखल केली याचिका? काय केला दावा?
अजमेर शरीफ दर्ग्यात शिव मंदीर? कोणी दाखल केली याचिका? काय केला दावा?.
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?
'कॉमन मॅन' शिंदे पुढे कोणत्या भूमिकेत? DCM की पक्षाची धुरा सांभाळणार?.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला
मुख्यमंत्री भाजपचाच होणार, फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी दावा सोडला.