हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी, रेसिपी आहे एकदम सोपी

हिवाळ्यात लोक थंडीत निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आहारात बदल करतात. हिवाळ्यात गूळ असलेली गोड आणि आंबट टोमॅटो चटणी एकदा नक्कीच ट्राय करा.

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी, रेसिपी आहे एकदम सोपी
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 7:40 AM

Jaggary Tomato Chutney Recipe : आता लवकरच थंडी सुरू होणारे आहे. हलक्या थंडीसह हवामानाने बदल करण्यास सुरुवात झाली आहे. बदलत्या हवामानामुळे रोगप्रतिकारक शक्ती अनेकदा कमकुवत होऊ लागते. त्यामुळे लोक सहजपणे आजारांना बळी पडतात. अशा परिस्थितीत या ऋतूमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य खाणे खूप महत्त्वाचे आहे. गुळ टोमॅटोची चटणी हिवाळ्यासाठी अतिशय आरोग्यदायी मानली जाते. चवीसोबतच आरोग्य राखण्यासाठी गुळ टोमॅटो चटणीची रेसिपी उत्तम आहे. त्याची आंबट-गोड चव आरोग्यासाठी लाभदायक मानली जाते.

थंडीच्या दिवसात गुळ शरीराला आतून उबदारपणा देतो आणि आजारांपासून वाचवतो. शिवाय त्याची गोड आणि आंबट चव तुमच्या जेवणाची चव दुप्पट करते. हीच स्वादिष्ट चटणी तुम्ही घरी बनवू शकता. कारण ती बनवायला खूप सोपी आहे. आता आपण चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी जाणून घेऊ.

चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

चार मध्यम बारीक चिरलेले टोमॅटो तीन ते चार चमचे गुळ एक टीस्पून मोहरीचे तेल एक टीस्पून मोहरी चिमुटभर हिंग आठ ते दहा कडीपत्त्याची पाने दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा टीस्पून लाल तिखट चिमूटभर हळद पावडर चवीनुसार मीठ सजावटीसाठी कोथिंबीर

चटणी बनवण्याची कृती

सर्वप्रथम एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा. नंतर त्यात मोहरी टाका ती चांगली तडतडू द्या. त्यानंतर चिमूटभर हिंग आणि कडीपत्ता घाला. आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि अधून मधून ढवळत राहा. यानंतर ते मऊ होईपर्यंत शिजवा.

यानंतर त्यामध्ये हळद, मसाला, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. यानंतर त्यात गूळ घाला आणि ते वितळत नाही तोपर्यंत व्यवस्थित मिसळा. आता ही चटणी मंद आचेवर पाच ते सात मिनिटे शिजू द्या. या चटणीचे तेल जोपर्यंत वेगळे निघत नाही आणि चटणी घट्ट होत नाही तोपर्यंत ती मंद आचेवर शिजवत ठेवा. त्यानंतर सर्वात शेवटी चवीनुसार गूळ आणि मीठ घालायला अजिबात विसरू नका. आता वरुन ताजी हिरवी कोथिंबीर सजावटीसाठी चटणीवर घाला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.