Weight Loss | उन्हाळ्याच्या काळात ‘या’ फळांच्या सेवनाने कमी होईल वजन! आरोग्यालाही होतील अनेक फायदे…
सध्या उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात खाण्यापिण्याच्या वेळी थोडासाही निष्काळजीपणा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. उन्हाळ्यात भलेही अन्न कमी खात असाल, तरी द्रव आहाराकडे पुरेसे लक्ष दिले पाहिजे.
मुंबई : सध्या उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात खाण्यापिण्याच्या वेळी थोडासाही निष्काळजीपणा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. उन्हाळ्यात भलेही अन्न कमी खात असाल, तरी द्रव आहाराकडे पुरेसे लक्ष दिले पाहिजे. या हंगामात बहुतेक पाण्याने भरली फळे विक्रीस उपलब्ध होतात. ही फळे आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास, तसेच वजन नियंत्रित करण्यात मदत करतात (Eat these fruits in summer for weight loss).
उन्हाळ्यात तळलेल्या-मसालेदार गोष्टी कमीतकमी खाव्या. या गोष्टींचे जास्त सेवन केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते. वजन कमी करण्यासाठी निरोगी अन्न आवश्यक आहे. उन्हाळ्यात अशी अनेक फळे आहेत, जी केवळ पौष्टिक आहार म्हणून उपयोगी येत नाहीत, तर वजन कमी करण्यासाठीही मदत करतात. चला तर, अशा फळांबद्दल जाणून घेऊया…
कलिंगड
उन्हाळ्यात कलिंगड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पुरेसे पाणी असते. तसेच यात अनेक पौष्टिक घटक असतात आणि कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. हे फळ खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते आणि अधिकवेळ भूकही लागत नाही.
आंबा
आंबा हा फळांचा राजा आहे. आंब्यात चवदार गराबरोबरच भरपूर फायबरही असते. त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे. आंबा आपल्या पाचन तंत्रासाठी अतिशय चांगला आहे. चयापचय वाढवण्यासाठी देखील आंबा मदत करतो. आंबा खाल्ल्याने तुमचे पोट बर्याच वेळेस भरलेले राहते.
खरबूज
खरबूजात भरपूर पाणी असते आणि त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी असते. जर, तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर उन्हाळी आहारात खरबूज नक्की सामील करा. या फळामध्ये जीवनसत्त्वे अ, सी, बी 6, मॅग्नेशियम आणि फायबर आहेत (Eat these fruits in summer for weight loss).
अननस
अननसामध्ये कॅलरींचे प्रमाण कमी आहे. पण, त्यात भरपूर फायबर आणि व्हिटामिन सी आहे. हे आपल्या पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे चयापचय वाढवण्याचे कामही करते.
पल्म
पल्म अर्थात आलू बुखारमध्ये अतिशय कमी कॅलरी आणि ग्लाइसेमिक इंडेक्स आहे, परंतु त्यात पौष्टिक मूल्य खूप जास्त आहेत. हे फळ खाल्ल्यास पोटाच्या समस्या नाहीशा होतात. चयापचय वाढवण्यात देखील हे फळ फायदेशीर ठरते.
सफरचंद
सफरचंदामध्ये कॅलरी कमी असून व्हिटामिन सी, मिनिरल्सबरोबर फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते. त्यामुळेही वजन कमी होण्यास मदत होते.
द्राक्षे
द्राक्ष्यामध्ये व्हिटामिन सी आणि फायबरची मात्रा जास्त असल्याने वजन कमी करण्यास ते अतिशय उपयुक्त आहे. आपल्या आहारात द्राक्षाचा समावेश केल्यास काहीच दिवसांत फरक पडतो.
नारळपाणी
नारळपाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होवून चरबी कमी होण्यास मदत होते. नारळ पाण्याने शरीरातील पचन संस्था व्यवस्थित काम करते. यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा देखील मिळते.
(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
(Eat these fruits in summer for weight loss)
हेही वाचा :
Skin care : ऑफिस शिफ्टमध्ये त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वापरा या टिप्स, चेहरा दिसेल तजेलदार
किवी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा फायदे https://t.co/cUqNVdKB2R #Kiwi | #HealthCare | #healthtips
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2021