Mushroom Benefits: वजन घटवायचंय? मग मशरुम ट्राय करता?

मशरुम करी, सलाड, सूप आणि भाजी बनवूनही खाता येतं. इतकंच नाही, तर मशरूम स्नॅक्स म्हणूनही खाता येतात. विशेष म्हणजे मशरूममुळे वजन कमी होण्यासही मोठी मदत होते.

Mushroom Benefits: वजन घटवायचंय? मग मशरुम ट्राय करता?
उन्हाळ्यात मिल्की मशरुमची शेती करा अन् दहापट पैसा कमवा
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 10:59 PM

मुंबई : मशरूम हा पदार्थ शाकाहारींमध्ये चांगलाच आवडीने खाल्ला जातो. मशरूम केवळ चविष्ट नसून त्याचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. मशरूममध्ये अत्यंत कमी कॅलरी असतात. सोबतच त्याच्यात अनेक पोषणतत्व असतात (Health Benefits Of Mushroom). मशरुम करी, सलाड, सूप आणि भाजी बनवूनही खाता येतं. इतकंच नाही, तर मशरूम स्नॅक्स म्हणूनही खाता येतात. विशेष म्हणजे मशरूममुळे वजन कमी होण्यासही मोठी मदत होते (Health Benefits Of Mushroom including weight loss).

मशरूम लोक आवडीने खातात. मात्र, ते दैनंदिन न घाता अगदी कधीकधी खाल्ल जातं. मात्र, आहारतज्ज्ञांनुसार मशरूमचा समावेश दररोजच्या जेवणात केल्यास त्याचे अनेक फायदे आहेत. खाण्यासाठी चविष्ट असण्यासोबतच त्याचे शरिराला अनेक फायदे आहेत. मशरूममध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरी असतात. असं असलं तरी त्यात अनेक पोषकतत्व असतात. मशरूम अनेक प्रकारे खाता येतं. याची करी, सलाड, सूप किंवा भाजी असे अनेक प्रकार केले जाऊ शकतात.

दैनंदिन जेवणात समावेश केल्या फायदे

वजन कमी करण्याचा रामबाण उपाय

मशरूममध्ये कॅलरीचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे खाणाऱ्याला भूक कमी लागते. एकदा मशरूम खाल्ल्यास बराच वेळ खाणाऱ्याला भूक लागत नाही. 5 पांढऱ्या मशरूममध्ये किंवा एका पोर्टेबेला मशरूममध्ये केवळ 20 कॅलरी असतात. हे खाल्ल्यामुळे पोट लवकर भरतं. तुम्ही मशरूम खाऊन जंक फूड आणि अतीसेवनापासूनही वाचू शकतात.

व्हिटॅमिन D चा चांगला स्त्रोत

मानवी शरीरासाठी व्हिटॅमिन D खूप आवश्यक आहे. शरीरात याची कमतरता पडल्यास अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. असं असलं तरी व्हिटॅमिन D खूप कमी भाज्यांमध्ये सापडते. यापैकी मशरूम एक आहे. दररोज मशरूम खाल्ल्यास शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन D मिळते. यामुळे शरीराची व्हिटॅमिन D ची गरज पूर्ण होते. पांढऱ्या आणि पोर्टेबेला प्रकारच्या मशरूममध्ये याचं प्रमाण सर्वाधिक असते.

आहार तज्ज्ञ देखील मशरूमला दैनंदिन आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या आहारात मशरूमचा समावेश करु शकता. मशरूम अगदी सहजपणे बाजारात उपलब्ध होतात. त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची पद्धत देखील अगदी साधीसोपी आहे. खूप कमी वेळेत मशरूमचे सलाड, भाजी किंवा सूप तयार करता येते.

हेही वाचा :

Jaggery Health Benefits | गुळाचे हे फायदे जाणाल… तर रोज गूळ खाल!

Weight lose Tips | वजन कमी करायचे आहे का? तर या गोष्टी टाळा…

Egg Benefits | अंड्याचा केवळ पांढरा भाग खाताय? थांबा, पिवळ्या बलकाचे ‘हे’ मोठे फायदे जाणून घ्या!

Health Benefits Of Mushroom including weight loss

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.