Low Blood Pressure | कमी रक्तदाबाची समस्या? मग, आहारात सामील करा ‘हे’ घटक!
हायपर टेन्शन अर्थात उच्च रक्तदाब प्रमाणे, कमी रक्तदाब देखील एखाद्या व्यक्तीसाठी अत्यंत धोकादायक असू शकतो. कमी रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबमुळे हृदय, मेंदू आणि महत्वाच्या अवयवांमध्ये रक्तपुरवठा करण्यात अडथळा निर्माण होतो.
मुंबई : हायपर टेन्शन अर्थात उच्च रक्तदाब प्रमाणे, कमी रक्तदाब देखील एखाद्या व्यक्तीसाठी अत्यंत धोकादायक असू शकतो. कमी रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबमुळे हृदय, मेंदू आणि महत्वाच्या अवयवांमध्ये रक्तपुरवठा करण्यात अडथळा निर्माण होतो. 120 एमएम एचजीपेक्षा कमी आणि 80 एमएम एचजीपेक्षा जास्त रक्तदाब सामान्य मानला जातो. लोकांमध्ये ब्लड प्रेशरची समस्या खूप सामान्य झाली आहे. त्यामुळे सर्वांना यातून दिलासा मिळवण्याचे मार्ग माहित असले पाहिजेत (Healthy food for low blood pressure patient).
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर एखाद्या व्यक्तीला थकवा, हलकी डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, त्वचेत चिकटपणा अशा समस्या येत असतील, तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन रक्तदाब तपासला पाहिजे. अशा परिस्थितीत, डॉक्टर आपल्याला निरोगी आहाराचे पालन करण्याचा सल्ला देतात. कमी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, डॉक्टर काही गोष्टी खाण्याची शिफारस करतात.
निरोगी स्नॅक्स खाणे सुरु ठेवा
न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यातील अंतरादरम्यान हलके आरोग्यदायी स्नॅक्सने खाल्ले पाहिजेत. कमी रक्तदाबाची समस्या टाळण्यासाठी, आपण दिवसभर थोडेथोडे खत राहिले पाहिजे. दिवसातून तीन वेळा जेवण करण्याऐवजी, आपण पाच लहान लहान मिल्सचे विभाजन केले, तर चांगले होईल. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीही हे खूप फायदेशीर ठरू शकते.
मीठाचा वापर
जास्त प्रमाणात मीठ शरीरासाठी हानिकारक आहे, परंतु संतुलित प्रमाणात ते आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, आपल्या दैनंदिन आहारामध्ये एक चमचा मीठ असणे आवश्यक आहे. जर आपण ते भाज्या आणि फळांसोबत सेवन केले तर अधिक चांगले होईल. जर, आपण दररोज व्यायाम केला तर आपण उन्हाळ्यात एक चिमूटभर मीठ लिंबूपाण्यासोबत घेऊ शकता. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या वाढवते.
पेये
आरोग्य तज्ज्ञांनी दिवसाला दोन ते तीन लिटर पाणी पिण्याची शिफारस केली आहे. कमी रक्तदाब असणाऱ्या लोकांनी आहारामध्ये नारळपाणी, द्राक्षांचा रस आणि आंबा पन्हे सारख्या गोष्टी देखील समाविष्ट केल्या पाहिजेत. हे आपल्या शरीरातील द्रव राखण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देईल. कमी रक्तदाबामध्ये डिहायड्रेशन ही एक सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत, आपण डाळिंबाचा रस देखील पिऊ शकता. त्यामध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटी-ऑक्सिडंट कमी रक्तदाबात फायदेशीर ठरतो.
कॅफिन
चहा किंवा कॉफी सारख्या कॅफिनेटेड पेये देखील काही काळ कमी रक्तदाब समस्या दूर करू शकतात. जर, आपला रक्तदाब अचानक कमी झाला तर एक कप चहा किंवा कॉफी शरीराच्या रक्ताभिसरणाला सुधारू शकेल. हे केवळ थोड्या काळासाठीच लाभदायक आहे, परंतु त्याचा परिणाम लवकरच दिसू शकतो (Healthy food for low blood pressure patient).
तुळशीची पाने
आजीच्या आईच्या टिप्समध्येही तुळशीच्या पानांचा उल्लेख आहे. डॉक्टरांनी सांगितले की, आपण दररोज सकाळी तुळशीची 5 ते 7 पाने चावून खावीत. तुळशीच्या पानांमध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटामिन-सी असते, जे शरीरात रक्ताचे योग्य नियमन करण्यास मदत करते. त्यामध्ये असणारा युजेनॉल नावाचा अँटी-ऑक्सिडेंट रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास खूप उपयुक्त आहे.
बदामाचे दूध
रात्री 5-6 बदाम भिजवा. सकाळी त्यांना सोलून घ्या. पेस्ट बनवा आणि दुधामध्ये उकळवा. दररोज हे दूध पिण्यामुळे तुमचा रक्तदाब कधीही कमी होणार नाही. बदामाच्या दुधात कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड फॅट नसते, परंतु त्यामध्ये ओमेगा -3 फॅटी आम्ल असतात. कमी रक्तदाबाच्या समस्येशी झगडणार्या प्रत्येक व्यक्तीने त्याचा वापर केला पाहिजे.
मनुका
मनुका देखील या समस्येत खूप फायदेशीर ठरू शकतात. रात्री मनुका भिजत घाला आणि सकाळी दुधासोबत उकळा. दररोज सकाळी हे पेय प्याल्याने रक्तदाब कमी होणार नाही. आपण इच्छित असल्यास, नाश्त्यात देखील मनुका घेऊ शकता. हे कमी रक्तदाब आणि रक्त परिसंचरण या दोहोंसाठी फायदेशीर आहे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Healthy food for low blood pressure patient)
हेही वाचा :
Weight Loss | Intermittent Fasting दरम्यान ‘ब्लॅक कॉफी’ पिणे ठरेल फायदेशीर! जाणून घ्या कसे…
Skimmed Milk | स्किम्ड दुधाचे सेवन करताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम…
Amla Benefits | रोग प्रतिकारशक्त आणि हाडे मजबूत करण्यासाठी लाभदायी ‘आवळा’, अशाप्रकारे करा सेवन!#AmlaBenefits | #Food | #Health | #Fruithttps://t.co/mencvI5ntM
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2021