नवी दिल्ली: आजकाल सर्वांच्याच घरात मायक्रोवेव्ह ओव्हन (Microwave) आढळतो. जेवण गरम करण्यापासून ते नवनवे पदार्थ बनवण्यापर्यंत अनेक गोष्टी या ओव्हनमुळे अतिशय सोप्या बनल्या आहेत. त्यामुळे पदार्थ (food) पटकन बनतात, त्यांची चव वाढते आणि आपले कामही सोपे होते. मात्र काही महिलांना हा ओव्हन साफ ठेवणे, त्याची स्वच्छता (cleaning) करणे हे थोडं कठीण वाटतं. बऱ्याच वेळेस अन्न गरम करताना त्याचा वास ओव्हनमध्ये राहतो. तसेच खूप दिवस स्वच्छता केली नाही तर ओव्हन घाण दिसूही लागतो.
ओव्हन सहज, सोप्या पद्धतीने साफ, स्वच्छ करण्यासाठी काही टिप्सचा वापर करू शकतो.
मायक्रोवेव्ह ओव्हन साफ करण्यासाठी ओल्या पेपर टॉवेलचा वापर तुम्ही करू शकता. त्यासाठी वेट पेपर टॉवेल घेऊन तो मायक्रोवेव्हमध्ये ठेवावा आणि ओव्हन 5 मिनिटांसाठी सुरू करावा. यामुळे वाफ तयार होईल ज्यामुळे ओव्हनमधील दुर्गंधी शोशली जाऊन ती कमी होईल. त्यानंतर ओव्हन पेपर टॉवेलने स्वच्छ पुसून घ्यावा.
वेट पेपर टॉवेलप्रमाणेच हा उपायही चांगला ठरेल. त्यासाठी एका नॉन-मेटालिक मायक्रोवेव्ह-सेफ बाऊलमध्ये पाणी घ्यावे व त्यामध्ये लिक्विड डिश सोपचे काही थेंब टाकावेत. त्यानंतर तो बाऊल मायक्रोवेव्हमध्ये ठेून ओव्हन 1 मिनिटासाठी हाय टेम्परेचरवर अथवा वाफ तयार होईपर्यंत सुरू ठेवावा. त्यानंतर ओव्हन थंड झाल्यावर पाण्याचा बाऊल काढून घ्यावा व साध्या कापडाने किंवा स्पंजने ओव्हन स्वच्छ पुसून कोरडा करावा.
मायक्रोवेव्हमध्ये अडकलेली घाण साफ करण्यासाठी किंवा क्लिनिंग करण्यासाठी इतर पदार्थांच्या तुलनेत, बेकिंग सोडा हा एक उत्तम पर्याय आहे. बेकिंग सोडा व पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवा आणि ओव्हनमध्ये जिथे एखादा पदार्थ अडकला असेल, त्यावर ही पेस्ट लावावी. ते कमीत कमी 5 मिनिटे तसेच राहू द्यावे.
त्यानंतर स्पंज किंवा ओल्या कापडाने ओव्हन स्वच्छ पुसावा. पुन्हा एक साधे कापड घेऊन ओव्हन कोरडा करावा. या उपायांनी तुमच्या ओव्हनमधील घाण तसेच दुर्गंधी दूर होईल. व तो पूर्वीप्रमाणे चमकू लागेल.