31st ला मार्गशीर्षातील गुरुवार, कोल्हापूरकरांची मांसाहाराकडे पाठ, चिकन-मटण बाजार ओस

यावेळी 31 डिसेंबरला मार्गशीर्षातील गुरुवार असल्यामुळे अनेक जणांकडे शाकाहारी सेलिब्रेशनचा मार्ग अवलंबला जाणार आहे.

31st ला मार्गशीर्षातील गुरुवार, कोल्हापूरकरांची मांसाहाराकडे पाठ, चिकन-मटण बाजार ओस
थर्टीफर्स्ट असूनही कोल्हापुरातील चिकन मटण, तसेच मासळी बाजारात शुकशुकाट
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 3:07 PM

कोल्हापूर : नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात सगळेच सज्ज आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंधनं असली तरी घरच्या घरी सेलिब्रेशनचे बेत आखले जात आहेत. कुठे ओली पार्टी विरुद्ध सुकी पार्टी असे दोन गट-तट पडले आहेत. त्यातच मार्गशीर्ष महिन्यामुळे 31 डिसेंबरला शाकाहाराचा प्लान करण्यावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. एरवी तांबडा-पांढरा रस्सा भुरकण्यासाठी चढाओढ करणारे कोल्हापूरकर यंदा थंड दिसत आहेत. त्यामुळे करवीरनगरीत चिकन-मटण बाजार ओस पडले आहेत. (Kolhapur Chicken Mutton shops no customer ahead of 31st December)

थर्टी फर्स्ट आणि कोल्हापूरकर यांचं अनोखं नातं आहे. तांबड्या-पांढऱ्या रश्श्यावर यथेच्छ ताव मारणाऱ्या कोल्हापूरकरांना 31 डिसेंबर ही खास पर्वणी असते. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक जणांना न्यू इयर सेलिब्रेशनचे वेध लागतात. 31 डिसेंबरला कशी सुट्टी टाकायची, कुठे फिरायला जायचं, काय खायचं याचं व्यवस्थित प्लॅनिंग ठरतं. मात्र यावर्षीचा थर्टी फर्स्ट मार्गशीर्ष महिन्यात आल्यामुळे अनेक खवय्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.

मार्गशीर्षातील गुरुवारमुळे थर्टीफर्स्ट कोरडा

मार्गशीर्ष महिन्यात व्रतवैकल्य आणि उपासामुळे अनेक जण मांसाहर करत नाहीत. मार्गशीर्षातील गुरुवार तर बऱ्याच जणांसाठी उपवासाचा वार असतो. त्यातच थर्टी फर्स्टही मार्गशीर्षातील गुरुवारी आल्यामुळे अनेकांची कोंडी झाली आहे.

चिकन-मटण, अंडी किंवा मासे… यांच्या भावात चढउतार सुरुच आहेत. मात्र अस्सल मांसाहारींनी एकदा चिकन-मटण आणायचं ठरवलं, की ठरवलं. मग त्यासाठी खिसा गरम करावा लागला, तरी चालेल. परंतु यावेळी मार्गशीर्षातील गुरुवार असल्यामुळे शाकाहारी सेलिब्रेशनचा मार्ग अवलंबला जाणार आहे.

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

2020 चा शेवटचा फटका म्हणजे थर्टीफर्स्टही मार्गशीर्षातील गुरुवारी आलं, असे मीम्स काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर थर्टीफर्स्टला मार्गशीर्षातील गुरुवार, त्याआधी बुधवारी पौर्णिमा, मंगळवारी दत्त जयंती, त्याआधी सोमवार आहे, मग सेलिब्रेशन करायचं कधी? असा प्रश्नही एक चिमुरडा विचारताना दिसला होता. (Kolhapur Chicken Mutton shops no customet ahead of 31st December)

एरवी बुधवार, शुक्रवार आणि रविवारी मटण मार्केटकडे वळणारी कोल्हापूरकरांची पावले मार्गशीर्ष महिन्यामुळे थांबली आहेत. आज बुधवार आणि उद्या थर्टीफर्स्ट असूनही कोल्हापुरातील चिकन मटण, तसेच मासळी बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे बोकड आणि कोंबड्या आनंदात असतील, असं गमतीने म्हणायला हरकत नाही.

संबंधित बातम्या :

सरत्या वर्षाची पार्टी घरच्या घरी आयोजित करताय? मग ‘ही’ रेसिपी नक्की ट्राय करा!

पुढच्या वर्षी सुट्ट्यांचा धमाका, आठवड्यातून एकच दिवस सुट्टी आणि चार दिवस मज्जा!

(Kolhapur Chicken Mutton shops no customer ahead of 31st December)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.