हॉटेलसारखा स्वादिष्ट पुलाव बनवा घरच्या घरी, जाणून घ्या सोपी रेसिपी
कधी कधी रोजचे जेवण थोडे कंटाळवाणे वाटू लागते. अशावेळी तुम्हालाही काहीतरी नवीन आणि चविष्ट खायचे असेल तर पुलाव हा उत्तम पर्याय आहे. रेस्टॉरंट सारखा पुलाव कसा बनवायचा तेही कोणत्या त्रासाशिवाय ते जाणून घ्या.
कधी कधी आपल्याला रोजची भाजी पोळी खाण्याचा कंटाळा येतो. यामुळे स्वयंपाक करताना काही तरी नवीन करून बघायचं असते. अशावेळी पटकन होणारी चविष्ट भाताची रेसिपी उत्तम पर्याय ठरू शकते. त्यात तुमच्या आवडीच्या भाज्या टाकून तुम्ही पुलाव पौष्टिकतेने परिपूर्ण बनवू शकतात. रेस्टॉरंट सारखा स्वादिष्ट पुलाव तुम्ही घरी बनवू शकतात. जाणून घ्या त्याचे साहित्य आणि सोपी रेसिपी.
पुलाव बनवण्यासाठी साहित्य
बासमती तांदूळ – 2 कप (धुवून भिजवलेले) तेल – 2 चमचे कांदा – एक मोठा, बारीक चिरलेला लसूण – तीन ते चार कांड्या बारीक चिरून आले – 1 इंच तुकडा बारीक चिरून गाजर – 1 मोठे किसलेले वाटाणे – 1 कप फुलकोबी – 1/2 कप बारीक कापलेली हिरव्या मिरच्या – 2 ते 3 बारीक कापलेल्या दही – 1/2 कप हळद पावडर – 1/2 चमचा धने पावडर – 1 चमचा जिरे पावडर – 1/2 चमचा लाल मिरची पावडर – चवीनुसार गरम मसाला – 1/2 चमचा मीठ – चवीनुसार पाणी – 3 कप
फोडणीसाठी तेल – 1 चमचा जिरे – 1/2 चमचा तमालपत्र – 2 दालचिनी – 1 इंच तुकडा लवंग – 2 ते 3 काळीमिरी – 4 ते 5
कृती
सर्वप्रथम कढाई मध्ये तेल गरम करून त्यात जिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घालून तळून घ्या.
आता त्याच पॅनमध्ये कांदा, लसूण आणि आले घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यामध्ये गाजर, वाटाणे, फ्लॉवर आणि हिरवी मिरची घालून काही मिनिटे परतून घ्या.
यानंतर त्यात हळद, धनेपूड, जिरेपूड, तिखट आणि गरम मसाला घालून मिक्स करा.
नंतर दही थोड्या पाण्यात विरघळून ते भाज्यांमध्ये घालून चांगले मिसळा.
आता त्यात भिजवलेले तांदूळ घालून मिक्स करा.
यानंतर वरून तीन कप पाणी टाका आणि चवीनुसार मीठ घाला.
आता पॅनवर झाकण ठेवून मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटे किंवा भात शिजेपर्यंत शिजवा.
शेवटी गॅस बंद करा आणि पुलाव पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवा त्यानंतर गरमागरम सर्व्ह करा.
विशेष टिप्स
पुलाव मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर भाज्या देखील घालू शकता जसे की शिमला, मिरची, वांगी इत्यादी. पुलाव अधिक रुचकर बनवायचा असेल तर त्यात मनुके, बादाम किंवा काजू देखील घालू शकतात. तुम्ही पुलाव दही किंवा रायत्या सोबत सर्व्ह करू शकतात कारण यामुळे चव अनेक पटीने वाढते.