Green Tea | ग्रीन टीमध्ये मिसळा ‘हे’ आयुर्वेदिक घटक, आरोग्याला होतील अनेक फायदे!

ग्रीन टीची पौष्टिकता आणखी वाढवण्यासाठी, त्यात काही आयुर्वेदिक घटक घालून ते सेवन केल्याने आरोग्याला अधिकचे फायदे होतात.

Green Tea | ग्रीन टीमध्ये मिसळा ‘हे’ आयुर्वेदिक घटक, आरोग्याला होतील अनेक फायदे!
ग्रीन टी
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 7:00 PM

मुंबई : ग्रीन टी (Green Tea) पिण्याचे बरेच फायदे आहेत, हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु, ग्रीन टीची पौष्टिकता आणखी वाढवण्यासाठी, त्यात काही आयुर्वेदिक घटक घालून ते सेवन केल्याने आरोग्याला अधिकचे फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची ग्रीन टी आणखी चविष्ट बनेल. तसेच, त्याचे फायदे देखील वाढतील (Mix these five things with green tea will increase the health benefits).

लिंबू

लिंबाचा रस ग्रीन टीच्या कडू चवीचा प्रतिकार करतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, लिंबूवर्गीय फळामचा रस ग्रीन-टीमध्ये मिसळल्यास त्यातील अँटीऑक्सिडेंट्स वाढतात, जे आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत. परंतु, आपल्या ग्रीन-टीला आधी थंड होऊ द्या आणि नंतरच त्यात थोडे लिंबू पिळून मग त्याचे सेवन करा.

पुदीना पाने आणि दालचिनी

ग्रीन- टीमध्ये पुदीनाची पाने टाकल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि आपली भूक देखील कमी होते. यासारखे आरोग्यविषयक अनेक फायदे मिळतात. तसेच, दालचिनी देखील वजन कमी करण्यास मदत करते.

स्टीव्हियाची पाने

स्टीव्हिया एक सुरक्षित आणि नैसर्गिक स्वीटनर आहे आणि याचा आरोग्यावर कोणताही नकारात्मक प्रभाव न पडता, ही पाने आपल्या ग्रीन टीला गोड करू शकतात. आपण आपल्या ग्रीन टीमध्ये स्टीव्हियाची पाने घालू शकता आणि त्याचे सेवन करू शकता. अशी ग्रीन टी पिण्यामुळे, कॅलरी कमी होतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

मध

मध साखरेसाठी एक निरोगी पर्याय आहे. म्हणून, आपल्या ग्रीन टीमध्ये गोडवा आणण्यासाठी मध एक उत्तम पर्याय आहे. यामुळे तुमच्या ग्रीन टीचा कडवटपणा कमी होतो. ग्रीन टीमधील अँटी ऑक्सिडेंट्स आणि मधातील मुबलक जीवनसत्त्वे व खनिजे एकत्र येऊन, हे एक सुपर हेल्दी ड्रिंक बनते. तसेच, मधयुक्त ग्रीन टी त्वचेच्या समस्या दूर करतो (Mix these five things with green tea will increase the health benefits).

आले

जेव्हा ग्रीन टीमध्ये आले मिसळले जाते, तेव्हा तिचे आरोग्यादायी फायदे आणखी वाढतात. वाढत्या प्रतिकारशक्तीबरोबरच आले कर्करोग रोखण्यासही मदत करते. हा चहा दमा, मधुमेह आणि मासिक पाळीच्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी देखील वापरला जातो.

कधी प्यावा ग्रीन टी?

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी पित असाल तर नाश्ता किंवा जेवणानंतर ग्रीन टी प्या. त्यामुळे तुमच्या शरीराला लगेचच त्याचा फायदा होईल. तसेच तुमचे पोट जर खूप सेनस्टिव्ह असेल तरच असे करा. कारण त्यामुळे नेचर अल्कालाइन होते. त्याशिवाय दररोज सकाळी एक कप आणि संध्याकाळी एक कपच ग्रीन टी चे सेवन करा.

अशी तयार करा ग्रीन टी?

ग्रीन टी तयार करण्यासाठी पाण्याला खूप जास्त गरम करु नका. त्यामुळे त्यात आवश्यक जीवनसत्त्व नष्ट होतात. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही पाणी गरम करुन 10 मिनीटे तसेच ठेवा. त्यानंतर ग्रीन टीचे पॅकेट कपात घेऊन त्यावर गरम पाणी टाका आणि 1 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टी आणि पाणी एकत्रित झाल्यानंतर प्या.

(Mix these five things with green tea will increase the health benefits)

हेही वाचा :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.