पपई खाताय? खुशाल खा, पण कधीही करु नका ‘ही’ चूक, पडू शकते महागात
पपई आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असली तरी, तिचे जास्त सेवन हानिकारक ठरू शकते. पचनसंस्थेच्या समस्या, एलर्जी, रक्तातील साखरेचे कमी होणे आणि औषधांशी प्रतिक्रिया यासारख्या दुष्परिणामांचा धोका असतो.
Papaya Side Effects : पपई ही बहुगुणी आहे. शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच औषधी वनस्पतीही आहे. त्यामुळे पपईचा अत्यंत चांगला वापर केला जातो. पपईमुळे तुम्ही वजन घटवण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंतचा फायदा होतो. पपई त्वचेवरही खूप फायदेशीर आहे. शरीराच्या अनेक समस्यांसाठी पपई औषध म्हणून वापरली जाते. रक्तस्त्राव, किडनीच्या जखमा, गळू आणि सोरियासिस, कब्ज आणि कृमी यांसारख्या समस्यांसाठी पपई अत्यंत महत्त्वाची असते. पिकलेली पपई गळू आणि कब्जमध्ये उपयोगी आहे. पपईत पॅपेन नावाचा एन्झाइम असतो, जो पचनप्रक्रियेत मदत करतो.
असे असले तरी पपई जास्त खाल्ल्याने त्याचे तोटेही होतात. अनेक समस्या उद्भवतात. पपई अति खाल्ल्याने काय समस्या उभवतात यावर टाकलेला हा प्रकाश.
पचनसंस्थेच्या समस्या : पपईत फायबर्स आणि पॅपेन एन्झाइम असतो. पॅपेन पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यात मदत करते. परंतु, पपई अधिक प्रमाणात खाल्ल्यास पचनसंस्थेचा त्रास होऊ शकतो. यामुळे डायरियासारख्या समस्या होऊ शकतात.
खाज, सूज किंवा एलर्जी : पॅपेन नावाचा घटक पपईत अधिक असतो. जास्त पॅपेन सेवन केल्याने शरीरात खाज, सूज, फुगवट, डोकेदुखी, एलर्जी इत्यादी समस्या होऊ शकतात. म्हणून, पपई आवश्यकतेनुसार खावी.
ब्लड शुगर कमी होणे : पपईत नैसर्गिक रसायने असतात. ज्यांना रक्तातील साखरेची कमी समस्या आहे, त्यांनी पपई खाणे टाळावे. कारण पपई इन्सुलिन वाढवण्याचं काम करते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी खूपच कमी होऊ शकते.
औषधांसोबत पपई न खाणे : पपई औषधांसोबत खाणे टाळावे. जर आपण एखाद्या आजाराचं औषध घेत असाल, तर औषध घेतल्यावर किंवा त्या आधी पपई खाणे टाळा. कारण पपईत काही घटक असतात जे रक्त पतळ करतात. यामुळे शरीरात रक्तस्रावाच्या समस्या होऊ शकतात.
गर्भवती महिलांसाठी पपई नकोच : गर्भवती महिलांनी पपई खाणे टाळावे, विशेषत: कच्ची पपई. कच्च्या पपईत लेटेक्स असतो, जो गर्भाशयासाठी हानिकारक ठरू शकतो. याशिवाय, यामध्ये पॅपेन असतो, जो कोशिकांच्या कव्हरला हानी पोहोचवू शकतो. यामुळे गर्भाच्या विकासात अडचणी येऊ शकतात.