लुसलुशीत इडलीसोबत बनवा लज्जतदार सांबार, रेसिपी जाणून घ्या
गरमागरम इडली, मेदू वडा असे पदार्थ सांबारसोबतच खायला चांगले लागतात. इडली, डोसा, मेदू वडा हे पदार्थ जरी दाक्षिणात्य असले तरी आता हे पदार्थ सर्रास सगळ्यांच्या घरी नाश्त्याला मोठ्या आवडीने बनवले जातात.
इडलीचं नाव घेतलं की त्यासोबत सांबरचं नाव येणार नाही असं होऊच शकत नाही. कारण हे दाक्षिणात्य पदार्थ बनवायचे झाले की सांबार शिवाय खाणे अधुरेच. दक्षिण भारतात प्रत्येक जेवणात सांबर हा सर्व प्रकारे पदार्थांमध्ये दिसतो. सांबारचा उगम दक्षिण भारतीय पाककृतींमधून झालेला आहे. तसेच सांबर हा भारतात जेवढ्या प्रकारे प्रसिद्ध आहे तेवढाच भारताबाहेर सुद्धा लोकप्रिय आहे. त्यात सांबर ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला इडलीबरोबर खूप चवदार वाटते. तसेच तुम्ही सांबार हा भाताबरोबर ही खाऊ शकता. सांबार बनवण्यासाठी आणि टेस्टी होण्यासाठी विविध मसाल्यांचा वापर केला जातो. सांबार बनवताना त्याचा मसाला आपण जितका ताजा व फ्रेश बनवून घालू तितकी सांबारची चव अधिक उत्तम होण्यास मदत मिळते.
तुम्हालाही लुसलुशीत इडली सोबत मस्त सांबार खायचा असेल तर ही पद्धत नक्की ट्राय करा.
सांबार बनवण्याची पद्धत
सांबर बनवण्यासाठी तूरडाळ किंवा मुगडाळ घ्यावी किंवा दोन्ही डाळींचा वापर केला जातो. सर्वप्रथम कुकरमध्ये तुमच्या आवडीची डाळ घेऊन शिजवून घ्या. डाळ शिजवून थंड झाल्यावर डाळीला फोडणी देण्यासाठी व सांबारची चव वाढवण्यासाठी मध्यम आकारात टोमॅटो आणि कांदा चिरून घ्या. त्यानंतर एका टोपात तूप किंवा तेल घालून कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्या. तसेच सांबार लज्जतदार करण्यासाठी यात काकडी, गाजर, बटाटा, भोपळा, शेवग्याची शेंग अशा मिश्र भाज्या घालून तसेच तुमच्या सोयी नुसार यात हळद व मसाले घालून सर्व भाज्या परतून घ्या.
त्यानंतर यात शिजवलेली डाळ घालून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण मिक्स करा. थोड्यावेळात यात आंबट चव संतुलित करण्यासाठी त्यात थोडी चिंचेची पेस्ट किंवा अर्क घाला. आता यात बाजारात मिळणार सांबार मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तसेच सांबारमध्ये चव संतुलित ठेवण्यासाठी मीठ आणि चिमूटभर गूळ घालून भाज्या शिजेपर्यंत छान उकाळा घ्या. त्यानंतर गरम तेलात किंवा तूपात मोहरी, जिरे, सुक्या लाल मिरच्या, हिंग आणि कढीपत्ता असे मसाल्याचा तडका डाळीवर द्यावा. अश्या पद्धतीने तुमचे सांबार तयार आहे. त्यामुळे तुम्हाला आता सुट्टीच्या दिवशी इडली, डोसा यांच्या सोबत अश्या पद्धतीने घरी सांबार बनवा.