Soybean Face pack | चमकदार त्वचेसाठी वापरा सोयाबीनचा फेसपॅक, दूर होतील त्वचेच्या अनेक समस्या…
सोयाबीन हा प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो, म्हणून तो आहारात सामील करणे पौष्टिक असते. सोयाबीन तुमचे सौंदर्य वाढवण्यात देखील मदत करू शकते.
मुंबई : आपण नेहमीच आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे फेस मास्क वापरत असतो. विशेषत: मुली याचा जास्त उपयोग करतात. हे फेस मास्क वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. या फेस मास्कद्वारे आपली त्वचा सुधारते. आज आम्ही तुम्हाला अशा फेस मास्कबद्दल सांगणार आहोत, जे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहेत. सोयाबीन फेस मास्कबद्दल फार कमी लोकांना माहित असेल. सोयाबीनपासून बनविलेले फेस मास्क आपल्या चेहर्यावरील बर्याच समस्यांना बरे करू शकतात (Soybean Face pack for healthy and glowing skin).
सोयाबीन प्रथिनांचा चांगला स्रोत
सोयाबीन हा प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो, म्हणून तो आहारात सामील करणे पौष्टिक असते. सोयाबीन तुमचे सौंदर्य वाढवण्यात देखील मदत करू शकते. खरं तर, सोयाबीनमध्ये व्हिटामिन ई आणि व्हिटामिन ए बरोबरच भरपूर खनिज घटक असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.
तेलकट त्वचेपासून व्हा मुक्त
बहुतेक मुलींमध्ये तेलकट त्वचेची समस्या दिसून येते आणि उन्हाळ्यात ही तेलकट त्वचा त्यांना खूप त्रास देते. सोयाबीन खाल्ल्याने आणि त्याचा मास्क लावल्याने ही समस्या बर्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
त्वचेच्या घट्टपणासाठी फायदेशीर
त्वचेच्या घट्टपणासाठी देखील सोयाबीन खूप फायदेशीर आहे. यासाठी सोयाबीनमध्ये डाळिंबाची दाणे जाडसर वाटून, त्यात थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. साधारण 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. असे केल्याने चेहर्याची चमक वाढेल आणि घट्टपणाही येईल.
सुरकुत्या कमी होतील
प्रत्येक मुलीला आपण चीरतरूण दिसावे असे वाटत असते. परंतु, चेहऱ्यावरील सुरकुत्या त्यांचे सौंदर्य खराब करतात. अशा परिस्थितीत सोयाबीनच्या सेवनाने ही समस्या खूप लवकर कमी होते, कारण सोयाबीनमुळे शरीरात इस्ट्रोजेन तयार होण्यास सुरुवात होते, हे सुरकुत्या दूर करण्यास अतिशय प्रभावी आहे (Soybean Face pack for healthy and glowing skin).
चेहर्यावरील डाग दूर करण्यासाठी
चेहऱ्यावरील डाग चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात. सोयाबीनपासून बनवलेल्या फेसपॅकच्या वापरामुळे हे डाग दूर होतात. यासाठी सोयाबीनमध्ये दही आणि लिंबू मिसळून पेस्ट बनवा. हा फेस पॅक 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. सोयाबीनमध्ये व्हिटामिन ई असते जे त्वचेतील मृत पेशी काढून टाकते आणि नवीन पेशी तयार करते. यासाठी सोयाबीन बारीक करून त्यात पाणी घालून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट 20-25 मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने चेहरा सुधारतो. आपण आठवड्यातून तीनदा हा मास्क वापरू शकता.
दाट आणि चमकदार केसांसाठी
केस लांब, जाड आणि चमकदार असावे असे प्रत्येकालाच वाटते. सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. याच्या सेवनामुळे केस जाड आणि चमकदार बनतात.
सोयाबीन फेस मास्कचे फायदे
सोयाबीन चेहरा आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यात त्वचेचे पीएच पातळी संतुलित करणारे घटक असतात. सोयाबीन त्वचा सुधारण्यासाठी तसेच त्वचेचे आजार दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. सोयाबीन चेहर्यातील अनेक त्रास तसेच समस्या दूर करतो. यामध्ये असे अनेक घटक आढळतात, जे त्वचेच्या जळजळीपासून बचाव करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. जर, आपण सोयाबीन नियमितपणे सेवन केले, तर आपल्याला चमकदार आणि निरोगी चेहरा मिळेल.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Soybean Face pack for healthy and glowing skin)
हेही वाचा :
Hair Fall | मधुमेहामुळे देखील उद्भवू शकते केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक!
Beauty Tips | नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!
Gulkand Benefit | वजन कमी करण्यापासून ते अनेक समस्यांवर गुणकारी ‘गुलकंद’, जाणून घ्या याचे फायदे..#Gulkand | #ROSE | #GulkandBenefits | #health https://t.co/CWktK261cY
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 27, 2021