सकाळी नाश्त्याला अजिबात खाऊ नका ‘हे’ पदार्थ, होऊ शकतात गंभीर परिणाम

ॲसिडिटीचा परिणाम आपल्या संपूर्ण कामावर होतो. मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाण्याची चुकीची पद्धत हे ॲसिडिटीचे प्रमुख कारण आहे.

सकाळी नाश्त्याला अजिबात खाऊ नका 'हे' पदार्थ, होऊ शकतात गंभीर परिणाम
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 1:21 PM

आपल्याकडे दिवसाची सुरुवात एक कप चहाने केली जाते. चहा घेतला नाही की दिवसाची सुरुवात होत नाही, असे अनेकांचे म्हणे आहे. गरम गरम चहा म्हंटल कि गरमागरम नाश्ता सर्वाना लागतोच. म्हणून आपल्याकडे पोहे, इडली, तुपाचे पराठे, बटाट्याचे सँडविच अशा अनेक पदार्थ आहेत, जे नाश्त्यासाठी परफेक्ट मानल्या जातात. हेल्थलाइनच्या म्हणण्यानुसार,आपण नेहमी पोटभर नाश्ता केला पाहिजे, त्यामुळे बहुतांश लोक नाश्त्यामध्ये असे काही पदार्थ खातात ज्यामुळे त्यांना ॲसिडिटीचा त्रास होत असतो.

आता ॲसिडिटी कमी करण्यासाठी व छातीतील जळजळ कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे औषधांचे सेवन केलं जात. अधिक प्रमाणात जर औषधांचे सेवन केले तर त्याचा वाईट परिणाम हा किडनीवर तसेच इतर अवयवांचे नुकसान करते. अशाने तुमच्या पोटात गंभीर समस्या निर्माण होतात. ॲसिडिटीचा परिणाम आपल्या संपूर्ण कामावर होतो. मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाण्याची चुकीची पद्धत हे ॲसिडिटीचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे नाश्त्यामध्ये अशा काही गोष्टी खाणे टाळा कि ज्याने सकाळी छातीत किंवा पोटात जळजळ होणार नाही. दिवसाची सुरुवात कशाने करू नये हे जाणून घ्या.

सकाळी खाऊ नका ‘या’ गोष्टी, होऊ शकते ॲसिडिटी

चहासोबत पराठे

नाश्त्यामध्ये पराठा आणि चहाचं कॉम्बिनेशन काही लोकांना आवडतं. बटाट्याच्या पराठ्यांमध्ये मसाले आणि तेल दोन्ही असतात आणि चहाबरोबर त्याचे सेवन केल्याने ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते. चहा आणि मसालेदार पदार्थांच्या सेवनाने ॲसिडिटीचं किंवा पोटाच्या इतर समस्या वाढतात.

पोहे आणि चहा

काही लोक हेल्दी पदार्थांसह चहा देखील घेतात. यामध्ये पोहे आणि चहाचे कॉम्बिनेशन सर्वात कॉमन आहे. नाश्त्यात पोह्यासारखे हेल्दी फूड खाऊ शकता पण त्यासोबत मसालेदार किंवा चहा सारख्या गोष्टी खाऊ किंवा पिऊ नका. असे केल्याने तासन् तास ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

आंबट फळं 

रिकाम्या पोटी संत्र किंवा मोसंबी सारख्या आंबट फळांचा सेवन केल्यास किंवा त्यांचा ज्युस प्यायल्यानेही ॲसिडिटी होऊ शकते. तज्ञांच्या मते असे केल्याने शरीरात ॲसिड वाढू शकते, ज्यामुळे पीएच बॅलन्स बिघडते. तुमची ही चूक ॲसिडिटीला कारणीभूत ठरू शकते. जयपूरचे आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता सांगतात की, रिकाम्या पोटी आंबट पदार्थांचे सेवन केल्याने ॲसिडिटी होणारच आहे.

कॅफिनयुक्त पदार्थ

चहा किंवा कॉफीमध्ये कॅफिन असते आणि ते रिकाम्या पोटी प्यायल्याने ॲसिडिटीही होते. आपल्या भारतीय लोकांची दिवसाची सुरुवात चहाशिवाय करत नाहीत. कॅफिनमुळे ॲसिडिटी तर होतेच पण शरीरातील डिहायड्रेशनही वाढते. डॉ. किरण सांगतात की, रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अनेकदा ॲसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.