Weight Loss | लिंबूसमवेत ‘या’ दोन घटकांमुळे वजन होईल कमी, पोटावरील चरबी देखील होईल गायब!

धावपळीची जीवनशैली आणि अयोग्य आहार आपली लठ्ठपणाची समस्या आणखी वाढवतात. वजन कसे वाढते, हे समजून घेण्यासाठी आपल्या आहाराद्वारे आपल्या शरीरात किती कॅलरी जाते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Weight Loss | लिंबूसमवेत ‘या’ दोन घटकांमुळे वजन होईल कमी, पोटावरील चरबी देखील होईल गायब!
वजन कमी करण्यासाठी मेथीचा चहा खूप फायदेशीर आहे. मेथीचा चहा घरी तयार करण्यासाठी आपल्याला आठ ते दहा मेथी घ्याव्या लागतील. त्यानंतर एक ग्लास पाण्यात मेथी उकळून घ्या आणि हे पाणी गाळून घेऊन प्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 11:48 AM

मुंबई : धावपळीची जीवनशैली आणि अयोग्य आहार आपली लठ्ठपणाची समस्या आणखी वाढवतात. वजन कसे वाढते, हे समजून घेण्यासाठी आपल्या आहाराद्वारे आपल्या शरीरात किती कॅलरी जाते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा दररोज आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणत कॅलरी जातात, परंतु शरीराला इतक्या कॅलरीजचा वापर करलिंबूसमवेत ‘या’ दोन घटकांमुळे वजन होईल कमी, पोटावरील चरबी देखील होईल गायब!ता येत नाही, तेव्हा त्या अतिरिक्त कॅलरी चरबीच्या रूपात आपल्या शरीरात साठतात. म्हणूनच, आपल्या शरीराचे वजन अवाजवी वाढू लागते (Weight Loss lemon and these 2 things can help you to control weight).

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. अबरार मुलतानी म्हणतात की, लठ्ठ लोकांमध्ये अनेक आजार होण्याचा धोका अधिक असतो. सध्याच्या युगात प्रत्येकजण तंदुरुस्त आणि सडपातळ राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल माहिती देणार ​​आहोत, ज्याचे सेवन करून तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता.

  1. लिंबाचे सेवन

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा लठ्ठपणाची समस्या टाळायची असेल, तर नियमित लिंबाचे सेवन करा. कारण लिंबामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडेंट त्वचेला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवण्यात मदत करतात. यामुळे वजन कमी करण्यात मदत होते. इतकेच नव्हे तर, त्यामध्ये आढळणारे घटक पाचन समस्या दूर करण्यात प्रभावी ठरतात. यामुळे देखील लठ्ठपणाचा धोका कमी होतो. विशेष गोष्ट अशी आहे की, लिंबामध्ये कॅलरींचे प्रमाण खूप कमी आहे, तसेच ते चयापचय सुधारते (Weight Loss lemon and these 2 things can help you to control weight).

  1. वेलचीचे सेवन

जर, तुम्हाला चरबी कमी करायची असेल तर, वेलची तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. एवढेच नाही तर अति अन्न सेवन केल्यानंतर ताबडतोब वेलची खाल्ल्याने तुम्हाला ते अन्न जड वाटणार नाही आणि अपचन झाल्यासारखे देखील वाटणार नाही. वेलची चयापचय वाढवते, ज्यामुळे वजन कमी करणे सुलभ होते.

  1. दालचिनीचे सेवन

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. अबरार मुलतानी यांच्या म्हणण्यानुसार, आपण दालचिनीच्या सहाय्याने वजनही मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. त्यामध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत, जे केवळ वजन कमी करण्यास उपयुक्त ठरत नाहीत, तर चयापचय सुधारण्याशी त्याचा विशेष संबंध आहे. याची खास गोष्ट अशी आहे की, हे आपल्या भुकेला नियंत्रित करण्याबरोबरच, लोकांना जास्त प्रमाणात खाण्यापासून देखील प्रतिबंधित करते.

(टीप : कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Weight Loss lemon and these 2 things can help you to control weight)

हेही वाचा :

दररोज करा नारळ पाण्याचे सेवन, आरोग्यासह त्वचेलाही होतील अनेक फायदे

Skin Care : केळी, दही आणि हळदीचा फेसपॅक लावा, त्वचा उजळवा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.