गॅसची किंमती भडकू देत नाही तर शेगडी…; हे उपाय करा आणि गॅसची करा बचत…
गॅस वाचावायचा असेल तर कुकरचा वापर करणे तुमच्या फायदेशीर असते. कुकरचा वापर केल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होत असतो.
मुंबईः सध्याच्या काळात महागाईने टोक गाठले आहे. त्यामुळे सामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यातच रोजच्या वापरातील गॅस सिलिंडच्या किंमतीही दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक मेटाकुटीला आला आहे. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतीमुळे जनसामान्यांचे जिणे अवघड झाले असून सध्या तरी त्याचे भाव काही कमी होणार नाही असंच दिसून येत आहे.
एकीकडे गॅसच्या किंमती भडकल्या जात असताना दुसरीकडे मात्र महागाईमुळे गॅस वाचवण्याचा प्रयत्न नागरिकांकडून केला जात आहे. गॅसच्या किमती वाढल्या असल्याने आता ते वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळ घरगुती गॅस वाचवण्यामुळे आता पैशांचीही बचत होत आहे. त्यामुळे आता गॅस वाचवायचा कसा आणि त्यावर उपाय काय हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सध्याच्या काळात प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. मात्र सध्या महागाईमुळे तो कुणालाच परवडत नाही. त्यामुळे गॅस वाचवायचा कसा यावरच आज आम्ही तुम्हाला उत्तम पर्याय सांगणार आहोत. त्यामध्ये पहिला पर्याय आहे तो म्हणजे बर्नर स्वच्छ असावा.
तुमच्या घरातील गॅस वाचवायचा असेल तर त्याची पहिली पायरी म्हणजे गॅस बर्नर स्वच्छ ठेवणे. त्यामुळे किमान तीन महिन्यातून एकदा गॅस स्टोव्हचे तुम्ही सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. तुमच्या गॅस जास्त वाया जात असेल तर तुम्हाला तुमच्या गॅस स्टोव्हच्या ज्वालेच्या रंगातून ते तुमच्या लक्षात येण्यासारखे आहे. गॅस स्टोव्हमधून ती ज्वाला निळ्या रंगाची येत असेल तर तुमच्या गॅस स्टोव्हचा बर्नर योग्य असल्याचे सिद्ध होते.
जर गॅस स्टोव्हची ज्योत लाल, पिवळ्या किंवा केशरी रंगाची येत असेल तर बर्नरमध्ये काही तरी समस्या असल्याचे समजावे.त्यानंतर बर्नर ताबडतोब साफ करावा. त्यातही तुम्हाला ते शक्य असल्यास ते एकदा सर्व्हिसिंग करुन घ्यावे. या अनावश्यक गॅस वाया जाणारा वाचू शकतो.
गॅस सिलिंडरचा वापर करत असताना अनेक जण भांडी धुवून थेट गॅसच्या शेगडीवर ठेवतात. म्हणजेच पॅन धुऊन स्वयंपाक तयार करण्यासाठी थेट गॅस स्टोव्हवर ठेवला जातो.
पण हीच चूक आपल्याला अधिक महागात पडत असते. भांडी धुवून थेट गॅसच्या शेगडीवर ठेवण्याऐवजी ती प्रथम स्वयंपाकघरातील टॉवेलने पुसून सुकवावे. यामुळे भांडे लवकर गरम होणार नाही आणि गॅसचा वापरही टाळला जाईल.
तुमच्या गॅस वाचवायचा असेल तर गॅस पाईपही तपासून घ्या. कधी कधी जेवण करताना तुम्हाला गॅस बंद केल्याचे आठवत नाही. त्यावेळी साहजिकच गॅस वाया जात असतो. पण इथे थोडासा अस्ताव्यस्तपणा असला तरी ती गोष्ट किचनरुममध्ये मात्र धोकादायकच असते. त्यामुळे याबाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगा.
गॅस पाईपमध्येही गळती असण्याची शक्यता असते. त्यामुळे तात्काळ गॅस दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. गॅस गळती होत असेल तर आधी पाईप बदलून घेणे गरजेचे आहे.
गॅस वाचावायचा असेल तर कुकरचा वापर करणे तुमच्या फायदेशीर असते. कुकरचा वापर केल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होत असतो. उदाहरणार्थ, भात बनवण्यासाठी कुकर वापरा त्यामध्येच तुम्ही भाजी शिजवा. त्यामुळे स्वयंपाकही जलद तर होतोच, पण गॅसवर होणारा खर्चही टाळला जातो.
आपल्या सर्वांना माहितीच आहे की, कडधान्य शिजायला खूप वेळ लागत असतो. म्हणून स्वयंपाक करण्यापूर्वी किमान एक तास आधी धान्य किंवा तांदूळ पाण्यात तासभर भिजत ठेवल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असतो. या सगळ्या गोष्टीमुळे तुमचा गॅस नक्कीच बचत होणार आहे.