Aging Signs | कमी वयातच शरीर वृद्धत्वाकडे झुकतंय? वेळीच ओळखा ‘ही’ लक्षणे!

काही लोकांचे शरीर त्यांच्या वयापेक्षा वेगाने वाढत असते. आपण असे बरेच लोक पाहिले असतील, जे त्यांच्यापेक्षा वयापेक्षा अधिक वृद्ध वाटतात.

Aging Signs | कमी वयातच शरीर वृद्धत्वाकडे झुकतंय? वेळीच ओळखा ‘ही’ लक्षणे!
अकाली वृद्धत्व
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 3:26 PM

मुंबई : काही लोकांचे शरीर त्यांच्या वयापेक्षा वेगाने वाढत असते. आपण असे बरेच लोक पाहिले असतील, जे त्यांच्यापेक्षा वयापेक्षा अधिक वृद्ध वाटतात. डॉक्टरांच्या मते ही वृद्धत्वाशी संबंधित एक समस्या आहे, ज्यामध्ये एखाद्याचे शरीर सामान्य लोकांपेक्षा वेगाने विकसित होते. तज्ज्ञांच्या मते, शरीरातील काही अनोखे बदल वृद्धत्वाच्या समस्येचे लक्षण असतात (Know about early aging warning signs).

कंबरेपासून घट्ट होणारे कपडे

शरीराच्या मधल्या भागातील चरबीमध्ये अचानक वाढ होणे, वृद्धत्वाची समस्या दर्शवते. उदाहरणार्थ, जर आपली कोणतीही जुनी पँट पोट व मांडीपासून घट्ट होऊ लागली, आणि तळाव्यापासून फिटिंगमध्ये कोणताही बदल झाला नाही, तर अकाली वृद्धत्वाची समस्या असू शकते. तथापि, अशा समस्या मेटाबॉलीजम सिंड्रोम आणि संधिवात यामुळे देखील होऊ शकतात.

जखमा भरण्यास विलंब

डॉक्टर म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या किरकोळ जखमा किंवा ओरखडे सहज भरत नसल्यास वृद्धत्वाशी संबंधित समस्या असू शकते. अशा समस्या आपल्या अंतर्गत एजिंग सिस्टमवर अवलंबून असतात.

कमकुवत पकड

तज्ज्ञ म्हणतात की, वाढत्या वयानुसार माणसाची पकड कमकुवत होऊ लागते. एका अभ्यासानुसार, हातांनी वस्तू पकडण्याचा आपल्या वयाशी थेट संबंध असतो. हे केवळ कमकुवत स्नायूंचे लक्षणच नाही, तर हे देखील सांगते की आपला मेंदू आता वृद्धत्वाकडे झुकत आहे (Know about early aging warning signs).

हाडांचे नुकसान

हाडांचे नुकसान दुर्दैवाने म्हातारपणाचा एक सामान्य भाग आहे. हाडांच्या वस्तुमानांमध्ये घट होतेय हे थेट आपल्या चेहऱ्यावर दिसू लागते. आत खप्पड झालेले गाल आणि अधिक पातळ ओठ वृद्धत्वाची लक्षणे असू शकतात. धूम्रपान, अयोग्य आहार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार किंवा अचानक वजन कमी होणे देखील देखील वृद्धत्वाचे लक्षण असू शकते.

सुरकुत्या

वयाआधी चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या देखील वृद्धत्वाच्या समस्येचे चिन्ह आहे. काही लोक अनुवांशिकरित्या त्यास बळी पडू शकतात. या व्यतिरिक्त तंबाखूचे सेवन, सूर्यप्रकाशाचा अभाव, आहारविषयक सवयी आणि जास्त मद्यपान, हे देखील याला जबाबदार असू शकते.

केस गळणे

केस गळणे ही लहान वयात वृद्धत्वाच्या समस्येची चेतावनी देत असते. केसांशी संबंधित ही समस्या केवळ डोक्यापर्यंत मर्यादित नाही. हात, पाय किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर अचानक केस कमी होणे हे वृद्धत्वाचे लक्षण असू शकते.

पायर्‍या चढण्यास अडचण

कमकुवत गुडघे आणि खराब तंदुरुस्तीमुळे तुम्हालाही पायऱ्या चढण्यास अडचण येत असेल, तर हे अकाली वृद्धत्वाचे लक्षण देखील असू शकते. दुसरे म्हणजे, काही पायऱ्या चढल्यानंतर श्वास वेगाने वाढू लागतो किंवा असे केल्यास एखाद्या डोंगरावर चढल्यासारखे वाटत असेल, तर ते वृद्धत्वाची समस्या देखील असू शकते.

(Know about early aging warning signs)

हेही वाचा :

Health care : गर्भावस्थेदरम्यान नोकरी देखील करताय? मग, अशाप्रकारे घ्या स्वतःची काळजी!

Skin Care | त्वचेचेही असतात वेगवेगळे प्रकार, जाणून घ्या कोणता घरगुती स्क्रब ठरेल अधिक फायदेशीर!

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...