Day Special | मुघल शासक तुघलकाला ‘जिझिया कर’ रद्द करायला लावणारे भक्ती चळवळीचे संत रामानंद!

उत्तर भारतात जन्मलेले ते पहिले आचार्य होते, ज्यांनी भगवान श्री राम यांची भक्ती तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहचवली.

Day Special | मुघल शासक तुघलकाला 'जिझिया कर' रद्द करायला लावणारे भक्ती चळवळीचे संत रामानंद!
मुघल शासक तुघलकाला 'जिझिया कर' रद्द करायला लावणारे भक्ती चळवळीचे संत रामानंद!
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 3:58 PM

मुंबई : भारत देश हा संतांचा देश आहे. मध्ययुगीन काळात, जेव्हा भक्ती चळवळ सुरू झाली तेव्हा स्वामी रामानंद हे सर्वोच्च संत होते. उत्तर भारतात जन्मलेले ते पहिले आचार्य होते, ज्यांनी भगवान श्री राम यांची भक्ती तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहचवली. असे म्हटले जाते ‘भक्ति द्रविड़ उपजी लाये रामानन्द, प्रकट किया कबीर ने, सात दीप नौ खंड’. आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी यांनी या भक्ती काळाला हिंदी साहित्याचा सुवर्णकाळ म्हटले आहे (Know About swami Ramanand who made Mughal ruler Tughlaq repeal ‘Jizya Kar’).

आज म्हणजे 4 फेब्रुवारी ही स्वामी रामानंद यांची 723वी जयंती आहे. स्वामी रामानंद यांचा जन्म माघ कृष्ण सप्तमी संवत 1356 रोजी 723 वर्षांपूर्वी तीर्थराज प्रयागराजच्या कन्याकुब्ज ब्राह्मण कुटुंबात झाला होता. वडील पंडित पुण्य सदन शर्मा आणि आई सुशीला देवी यांनी धार्मिक रस पाहून रामानंदला काशीच्या पंचगंगा घाटातील श्रीमठ येथील गुरु राघवनंद यांच्याकडे पाठवले.

रामानंद यांनी अतिशय अल्पावधीतच सर्व धर्मग्रंथ, वेद आणि पुराणांचा अभ्यास केला. कुटुंब आणि गुरु यांच्या दबाव असतानाही त्यांनी गृहस्थ जीवन स्वीकारले नाही आणि आयुष्यभर विरक्त राहण्याची शपथ घेतली. स्वामी राघवनंद यांच्या रामतारक मंत्राची दीक्षा घेऊन ते ‘स्वामी रामानंदाचार्य’ झाले.

दलित आणि महिलांना समान स्थान

स्वामी रामानंद यांनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचे अनुसरण करत भक्तीचा साधा मार्ग दाखवला. त्यांच्या शिष्यांमध्ये कबीरदास, रविदास, सेन्नई आणि पिपनेरेश सारख्या मूर्तिपूजेला विरोध करणारे निर्गुणवादी संत होते, तर दुसरीकडे मुर्तिपूजेस मानणारे स्वामी अनंतानंद, भवानंद, सुरसुरानंद, नरहर्यानंद सारखे आचार्य भक्तही होते, जे अवतारवादाचे पूर्ण समर्थक होते.

याच परंपरेत कृष्णदत्त पियोहारी सारखे जबरदस्त तेजस्वी साधक आणि गोस्वामी तुलसीदास यांच्यासारखे महान कवी देखील होते. स्वामी रामानंद यांनीही दलित-अस्पृश्य आणि स्त्रियांना भक्तीमध्ये समान स्थान दिले. त्यांच्या शिष्य मंडळामध्ये सुrसरी आणि पद्मावती अशा विद्वान महिला देखील होत्या. बैरागी जमात त्यांची द्वादश महाभागवत म्हणून पूजा करतात.

कबीरदास यांना शिष्य बनवण्याची रंजक कहाणी

संत कबीरदास यांच्याबद्दल असे म्हणतात की, स्वामी रामानंद यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांना सकाळी काशीतील पंचगंगा घाटाच्या पायर्‍यांवर झोपून राहावे लागले. त्या मार्गाने स्वामी रामानंद दररोज सकाळी गंगास्नानासाठी जात असत.

स्वामी रामानंद यांचे पाय अचानक कबीरवर पडले आणि कबीर यांनी राम-राम म्हणत विव्हळायला सुरुवात केली. कबीर यांनी रामानंद यांना स्वतःला शिष्य बनवण्याचा आग्रह केला आणि रामानंद कबीरला हृदयाशी कवटाळले व आपल्या घरी घेऊन गेले. पुढे राममान हाच त्यांचा गुरुमंत्र झाला (Know About swami Ramanand who made Mughal ruler Tughlaq repeal ‘Jizya Kar’).

मोगल शासक आश्रयस्थानात आला, अन् जिझिया कर रद्द झाला…

सर्व जातीतील लोकांच्या कानी पडावे व जास्तीत जास्त लोकांचे कल्याण व्हावे, यासाठी आचार्य रामानंद यांनी तारक राममंत्रांचा उपदेश दिला. त्यांच्या योगशक्तीने आणि चमत्काराने प्रभावित झालेला, तत्कालीन मोगल शासक मोहम्मद बिन तुघलक हा देखील संत कबीरदासप्रमाणे त्यांच्या आश्रयाला आला. त्यांच्या विचारांमुळे प्रभावित होऊन मुघल राज्यकर्त्याने हिंदू व जिझिया करावरील सर्व निर्बंध हटवण्याचे निर्देश दिले.

दीक्षित हिंदूंना इस्लाममधून पुन्हा हिंदू धर्मात परत आणण्यासाठी स्वामी रामानंद यांनी परावर्तन संस्कार सुरू केले. अयोध्याचा राजा हरिसिंग यांच्या नेतृत्वात 34 हजार राजपूतांना स्वामीजींना एकाच व्यासपीठावरुन स्वधर्म स्वीकारण्याची प्रेरणा दिली.

देश आणि धर्म या दोघांची अमूल्य सेवा

स्वामी रामानंदाचार्य यांनी संस्कृत भाषेपेक्षा हिंदी किंवा सार्वजनिक भाषेत त्यांच्या तत्त्वांचा प्रसार करण्याला महत्त्व दिले. प्रस्थानानंतर त्यांनी विशिष्टाद्वैत सिद्धांतनुगुण स्वतंत्र आनंद भाष्य याची रचना केली. तत्व आणि नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून त्यांनी वैष्णवमताब्ज भास्कर, श्रीरामपटल, श्रीरामार्चनापद्धति, श्रीरामरक्षास्त्रोतम असे अनेक शास्त्रीय ग्रंथ लिहिले.

स्वामी रामानंद हे हनुमानजींच्या प्रसिद्ध आरतीचे लेखकही आहेत. देश आणि धर्म या अनमोल सेवांनी सर्व पंथांमधील वैष्णवांच्या हृदयात त्यांचे महत्त्व स्थापित झाले आहे. भारताच्या सांप्रदायिक इतिहासात परस्पर विरोधी तत्त्वे आणि पद्धती पाळणार्‍यांमध्ये त्यांच्या इतकी लोकप्रियता कोणालाही मिळाली नव्हती.

संतांचा सर्वात मोठा गट

रामानंद पंथ किंवा रामावत पंथ हा स्वामी रामानंद यांनी स्थापन केलेला वैष्णवांचा सर्वात मोठा धार्मिक गट आहे. वैष्णवांच्या 52 वेशींपैकी 36 दरवाजे फक्त रामानंदांचे आहेत. या पंथातील संतांना बैरागी असेही म्हणतात. त्यांना निर्वाणी, निर्मोही आणि दिगंबर अशी तीन दशा आहेत.

अयोध्या, चित्रकूट, नाशिक, हरिद्वार येथे या पंथाची शेकडो मठ आहेत. काशीच्या पंचगंगा घाटावर वसलेले श्रीमठ हे रामानंदी संत आणि भक्तांचे मूळ गुरुस्थान आहे. ते सगुण-निर्गुण रामभक्ती परंपरेचे आणि रामानंद पंथाचे मूळ आचार्यपीठ असल्याचे म्हटले जाते. तेथील प्रतिष्ठित आचार्य यांना जगद्गुरू रामानंदाचार्य ही पदवी परंपरा लाभली आहे. सध्या जगद्गुरू रामानंदाचार्य यांचे पद स्वामी रामनरेशाचार्य यांच्याकडे आहे.

(Know About swami Ramanand who made Mughal ruler Tughlaq repeal ‘Jizya Kar’)

हेही वाचा :

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.