Food : Expiry Date उलटून गेल्यानंतरही खराब होत नाहीत ‘हे’ पदार्थ! करू शकता सेवन

आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांची एक्सपायरी डेट उलटून गेल्यानंतरही आपण त्या पदार्थांचा वापर करू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? हे पदार्थ नीट साठवून ठेवल्यास ते बराच काळापर्यंत वापरता येतात.

Food : Expiry Date उलटून गेल्यानंतरही खराब होत नाहीत 'हे' पदार्थ! करू शकता सेवन
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 11:02 AM

आपण जेव्हा एखादा खाद्यपदार्थ (Food Items) विकत घ्यायला जातो, तेव्हा आपण त्यावर लिहीलेली एक्सपायरी डेट नक्कीच तपासून पाहतो. ज्यामुळे तो पदार्थ कधीपर्यंत टिकू शकतो हे कळेल आणि तो खराब होण्याआधीच संपवता येऊ शकेल. एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत (Health problem) परिणाम होऊ शकतो. ती व्यक्ती आजारीही पडू शकते. मात्र आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांची एक्सपायरी डेट उलटून गेल्यानंतरही आपण त्या पदार्थांचा वापर करू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? ते पदार्थ नीट स्टोअर (Store properly) करून अथवा साठवून ठेवल्यास ते बराच काळापर्यंत वापरता येतात. जाणून घेऊ या ते कोणते पदार्थ आहेत…

मध –

मधात कमी आम्लीय पीएच असते, जे बॅक्टेरियाची वाढ होण्यापासून रोखते. मध एक हवाबंद काचेच्या बाटलीत ठेवल्यास तो वर्षानुवर्षे टिकू शकतो. त्याचे कालांतराने स्फटिकीकरण (Crystalize) होऊ शकते, तरीही तो मध वापरणे किंवा सेवन करणे सुरक्षित असते.

व्हिनेगर –

व्हिनेगर हा एक स्वयं-जतन करणारा (Self-Preserving Agent) पदार्थ आहे. लोणच्यासारख्या इतर पदार्थांचे जतन करण्यासाठी आणि ते आंबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हिनेगर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील कॅबिनेटमध्ये व्हिनेगर ठेवू शकता. उन्हाळ्यातही ते फार खराब होणार नाही.

हे सुद्धा वाचा

मीठ –

साधे पांढरे मीठ असो किंवा सैंधव, कोणत्याही प्रकारचे मीठ नीट स्टोअर करून ठेवल्यास बऱ्याच काळापर्यंत खराब होत नाही. एका हवाबंद डब्यात किंवा बाटलीत मीठ नीट साठवून ठेवावे.

पास्ता –

पास्ता ओलाव्यामुळेही खराब होत नाही. एखादा हवाबंद डबा किंवा बाटलीमध्ये पास्टा स्टोअर करावा. त्याची एक्सपायरी डेट उलटून गेल्यानंतरही 1 ते 2 वर्ष पास्ता वापरता येऊ शकतो. पास्तामध्ये किटकांचा संसर्ग होऊ नये म्हणून तुम्ही लाल मिरचीचा वापर करू शकता.

साखर –

साधारणतः रिफाइंड साखरेच्या पाकिटावर त्याचे शेल्फ लाइफ 2 वर्षं इतकं लिहिलं जातं, पण साखर व्यवस्थित साठवली तर त्याचा बराच काळ वापर करता येतो. साखर साठवण्यासाठी कोरडी आणि स्वच्छ बरणी वापरा. तसेच ती काढण्यासाठी नेहमी कोरड्या चमच्याचा वापर करा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की, जर तुमच्या साठवलेल्या साखरेचे स्फटिकीकरण (Crystalize) होऊ लागली आणि त्यातून ओलसर वास येऊ लागला तर ती वापरण्यास योग्य नाही असे समजावे व ती टाकून द्यावी.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.