Beauty Tips | त्वचेला रातोरात चमकदार बनवणारा ‘Slugging’ ब्युटी ट्रेंड, तुम्हीही करू शकता ट्राय!
अंडर हायड्रेटेड आणि थकल्यासारख्या वाटणाऱ्या त्वचेसाठी स्लगिंग हा एक चांगला पर्याय आहे. मात्र, तेलकट त्वचा असलेल्यांना स्लगिंग टाळण्याचा सल्ला सौंदर्य तज्ज्ञ देतात.
मुंबई : महिला आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी सर्व प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात. ही उत्पादने वापरुनही अनेकदा चेहऱ्यावर चमक येत नाही आणि त्वचेतला नैसर्गिक ओलावाही नाहीसा व्हायला लागतो. जर आपणही चेहऱ्यावरील नाहीशा होणाऱ्या नैसर्गिक ओलाव्याबद्दल काळजीत असाल, तर चिंता करण्याची गरज नाही. आजकाल इंटरनेटवर त्वचेची काळजी घेण्यासाठी एक चर्चित ‘स्लगिंग’ ट्रेंड सुरु आहे, ज्यामुळे आपली त्वचा रातोरात चमकदार आणि मऊ होते (Know about What is slugging beauty treatment).
कोणत्या त्वचेसाठी ‘स्लगिंग’ चांगले?
अंडर हायड्रेटेड आणि थकल्यासारख्या वाटणाऱ्या त्वचेसाठी स्लगिंग हा एक चांगला पर्याय आहे. ज्यांची त्वचा कोरडी व निर्जीव दिसू लागते, अशा लोकांसाठी स्लगिंगद्वारे त्वचेची काळजी घेणे अतिशय फायदेशीर आहे. तेलकट त्वचा असलेल्यांना स्लगिंग टाळण्याचा सल्ला सौंदर्य तज्ज्ञ देतात.
स्लगिंग कसे करावे?
यासाठी दररोज नियमित झोपायला जाण्यापूर्वी तुम्हाला चेहऱ्यावर पेट्रोलियम जेली किंवा मॉइश्चरायझर लावावे. इंटरनेटवरील सौंदर्य प्रेमी यासाठी ‘व्हॅसलीन’ला प्राधान्य डेट आहेत. हे केवळ आपल्या त्वचेला चांगल्या पद्धतीने मॉइश्चरायझर करत नाही, तर त्वचेतील इच्छित आर्द्रता देखील टिकून राहते. व्हॅसलीन खूप जास्त प्रमाणात वापरताना, आपण आपल्या चेहऱ्याला इतर सौंदर्य उत्पादनांपासून दूर ठेवले पाहिजे, कारण पेट्रोलियम जेली त्वचेतील ओलावा लॉक करते आणि त्वचेवर एक थर तयार करते (Know about What is slugging beauty treatment).
स्लगिंगसाठी सर्वोत्तम वेळ
स्लगिंगसाठी उत्तम काळ म्हणजे थकवणारा दिवसाचा शेवट किंवा कंटाळवाण्या आठवड्याचा शेवट. असा एखादा दिवस किंवा आठवडा, जेव्हा आपण खूप मेकअप केला असेल आणि आपल्याला असे वाटेल की आता आपल्याला आपल्या त्वचेला आराम मिळाला पाहिजे किंवा तिला हायड्रेट करणे आणि त्यास मॉइश्चरायझ करणे आवश्यक आहे, तेव्हा स्लगिंग करा. कोमल, मुलायम त्वचेसाठी हे एक स्वस्त आणि प्रभावी तंत्र आहे, परंतु ते त्वचेच्या सर्व प्रकारांसाठी योग्य नाही. तर आपली त्वचा कोमल हवी असेल, तर आधी त्वचेचा पोत ओळखा आणि त्याप्रमाणेच पुढे जा. जर आपल्या त्वचेवर मुरुम किंवा पिटकुळ्यांची समस्या येत असेल, तर स्लगिंग टाळा.
त्वचेचा पोत
कोरडी आणि मिश्र त्वचा, बर्याचदा डीहायड्रेटेड आणि थकलेली दिसते. त्यांच्यासाठी स्लगिंग खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होते. जेव्हा आपल्या त्वचेचा एक भाग तेलकट असतो आणि दुसरा भाग कोरडा असतो तेव्हा त्याला मिश्रित त्वचा म्हणतात. कोरड्या व मिश्रित त्वचेत ज्यांच्या त्वचेवर जास्त ड्रायनेस व रुक्षपणा असेल, फक्त त्या लोकांनाच स्लगिंग करण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, सौंदर्य तज्ज्ञ तेलकट त्वचा असलेल्यांना स्लगिंग टाळण्याचा सल्ला देतात, कारण यामुळे आपले पोर्स बंद होऊ शकतात.
(Know about What is slugging beauty treatment)
हेही वाचा :
Makeup Tips | ऑफिससाठी तयार होताना जास्त वेळ लागतोय? मग, नक्की ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स!#makeuplooks | #MakeupTips | #Makeup | #beautytips https://t.co/exHA9kbJ3R
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2021