Beauty Tips : घरच्या घरी असे करा पेडिक्युअर करून असे वाढवा पायांचे सौंदर्य…

चेहऱ्यासोबतच आपल्या शरीराचे आणि पायांचे सौंदर्यही महत्वाचे असते. पाय खराब दिसत असतील तर आपला संपूर्ण लूक बिघडतो. पायांची काळजी घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरच्या घरीही तुम्ही पेडिक्युअर करू शकता..

Beauty Tips : घरच्या घरी असे करा पेडिक्युअर करून असे वाढवा पायांचे सौंदर्य...
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 2:08 PM

नवी दिल्ली | 7 ऑगस्ट 2023 : आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी बरेच जण नियमित पार्लरमध्ये जातात, तर काही जण महागड्या उत्पादनांचा (beauty products) वापर करून चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण या सर्वांत आपले, आपल्या पायांकडे दुर्लक्ष होते. चेहरा, शरीर याप्रमाणेच पायांचीही योग्य काळजी घेणे गरजेचे असते. ते न केल्यास आपला पूर्ण लूक तर बिघडतोच पण त्याचसोबत अनेक समस्याही उद्भवू शकतात. पायांची स्वच्छता (foot care) राखून सौंदर्य वाढवण्यासाठी दरवेळेस पार्लरमध्ये पैसे खर्च करणे गरजेचे नाही. तुम्ही घरच्या घरी पेडिक्युअर (pedicure) करू शकता.

तुम्ही उघड्या चपला, सँडल घालत असाल तर पायावर धूळ आणि घाण जमा होण्यासोबतच सूर्यप्रकाशामुळे टॅनिंगही होते. योग्य काळजी न घेतल्याने पाय कुरूप तर दिसतातच, सोबतच फंगल इन्फेक्शनसारख्या समस्याही उद्भवू शकतात. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरी सहज पेडिक्युअर करू शकता. यासाठी तुम्हाला आठवड्यातून एखादा दिवसच थोडा वेळ काढावा लागेल. घरी पेडिक्युअर कसे करावे त जाणून घेऊया.

पेडिक्युअरचे असतात अनेक फायदे

पेडिक्युअर केल्याने पायांची स्वच्छता तर होतेच, पण डेड स्कीनही निघून जाते. तसेच यामुळे त्वचा कोरडी पडणे, टाचांना भेगा पडणे, अशा समस्यांपासूनही आराम मिळतो. पेडिक्युअर केल्याने पायांना मसाज होतो, ज्यामुळे रक्ताभिसरणही सुधारते.

घरी पेडिक्युअर करण्यासाठीचे सामान

– एक टब, पायांना सोसवेल इतके गरम पाणी

– शांपू आणि फूट स्क्रब

– नेल पॉलिश रिमूव्हर

– टॉवेल

– मॉयश्चरायझर

– नेल कटर, नेल फायलर

– प्यूमिक स्टोन किंवा ब्रश

सर्वप्रथम काय करावे ?

– सर्व तयारी करून नीट सामान गोळा करून ठेवावे. पायांच्या नखांना नेल पेंट असेल तर ते रिमूव्हरच्या मदतीने काढून टाका. त्यानंतर नेल कटरच्या मदतीने नखं ट्रीम करा आणि नेल फायलरने नखांना नीट , हवा तसा शेप द्या.

पेडिक्युअरची अशी करा सुरूवात

– एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात शांपू टाका. तुम्हाला हवे असेल तर लिंबाचा रस देखील टाकू शकता कारण लिंबू अँटीबॅक्टेरियल गुणांनी परिपूर्ण असतं. या पाण्यात पाय काही वेळ बुडवून ठेवावेत. त्यानंतर तुमच्या टाचा, पायांची बोटं, नख, घोट्याजवळची जागा हे सर्व ब्रशने नीट स्वच्छ करावे.

डेड स्कीन हटवण्यासाठी स्क्रब

नंतर पाय पाण्यातून काढा आणि फूट स्क्रबने नीट घासा. यामुळे डेड स्कीन निघून जाईल. स्क्रबिंगनंतर पाय नीट स्वच्छ करा आणि टॉवेलने पुसून कोरडे करा. त्यानंतर पायांना चांगले मॉयश्चरायझर लावावे. त्याऐवजी तुम्ही नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईलही वापरू शकता.

'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.