ओठ झालेत काळसर आणि कोरडे ? नैसर्गिक हर्ब्सच्या सहाय्याने बनवा लिपबाम
ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी लोकं अनेक महागड्या लिप बामचा वापर करतात. पण त्यानंतरही काही लोकांचे ओठ कोरडे आणि काळसर दिसतात. अशा परिस्थितीत काही नैसर्गिक औषधी वनस्पतींच्या मदतीने घरीच लिप बाम बनवून तुम्ही तुमच्या ओठांची विशेष काळजी घेऊ शकता.
नवी दिल्ली – मऊ, गुलाबी ओठ हे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. ओठांची विशेष काळजी घेण्यासाठी लोक अनेक टिप्स (lip care tips) फॉलो करतात. असे असूनही, ओठांच्या मृत त्वचेच्या पेशी अनेकदा वाढू लागतात. यामुळे बहुतेक लोकांचे ओठ काळे आणि निर्जीव दिसतात. जर तुमचे ओठही काळे आणि कोरडे होत असतील तर काही नैसर्गिक औषधी वनस्पतींनी नैसर्गिक लिप बाम (Natural lip balm) बनवून तुम्ही तुमचे ओठ मऊ आणि गुलाबी (soft and pink lips) ठेवू शकता.
खरंतर, ओठांचे सौंदर्य टिकवण्यासाठी लोक अनेक महागडे लिप बाम वापरतात. पण लिप बाम लावल्यानंतरही ओठांचा ओलावा जास्त काळ रहात नाही आणि ओठ काही वेळातच कोरडे आणि निस्तेज होतात. अशा परिस्थितीत काही नैसर्गिक औषधी वनस्पतींच्या मदतीने घरीच लिप बाम बनवून तुम्ही तुमच्या ओठांची विशेष काळजी घेऊ शकता व तुमचे ओठ नैसर्गिकरित्या सुंदर ठेवू शकता.
रोझमेरी लिप बाम
रोझमेरी लिप बाम बनवण्यासाठी एका कढईत 1 चमचा बीवॅक्स, 3 चमचे खोबरेल तेल आणि 2 चमचे शिया बटर घालून ते वितळवावे. नंतर त्या मिश्रणात व्हिटॅमिन ई तेलाचे 4-5 थेंब, रोझमेरी तेलाचे 2 थेंब आणि पेपरमिंट तेलाचे 3 थेंब घाला आणि थंड होण्यासाठी ठेवावे. थोड्याच वेळात तुमचा लिप बाम तयार होईल. या लिप बामचा नियमितपणे वापर केल्यास तुमच्या ओठांचा काळसरपणा दूर होऊन ते गुलाबी दिसू लागतील व मऊही राहतील.
पेपरमिंट लिप बाम
घरच्या घरी पेपरमिंट लिप बाम तयार करण्यासाठी, पुदिन्याची पाने अर्धा चमचा गुलाब पाण्यात मिसळून बारीक वाटून घ्यावीत. नंतर ही पेस्ट गाळून घ्या व रस वेगळा काढा. त्यानंतर, पॅनमध्ये 1 चमचा मेण व त्यामध्ये व्हिटॅमिन ईची 1 कॅप्सूल, 1 चमचा बदाम तेल आणि पुदिन्याचा रस मिसळा. आता हे मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. तुमचा होममेड पेपरमिंट लिप बाम तयार होईल. ओठांवर हा लिपबाम नियमितपणे लावल्यास फरक दिसून येईल.
कोको बटर लिपबाम
कोको बटरच्या सहाय्याने होममेड लिप बाम बनवण्यासाठी पॅनमध्ये 3 चमचे बीवॅक्स आणि 2 चमचे कोको बटर गरम करावे. हे मिश्रण वितळल्यानंतर त्यात 1 चमचे जोजोबा तेल आणि 8-10 थेंब थाइम इसेंशिअल ऑईल मिसळावे आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. तुमचा लिप बाम तयार आहे. ओठ मऊ आणि गुलाबी ठेवण्यासाठी हा लिप बाम रोज वापरा.
(डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)