Beauty Tips : चेहऱ्यावर वाफ घेतल्याने खरंच ब्लॅकहेड्सचा होतो का नायनाट ?
पुरूष असो किंवा महिला, बहुतांश लोक हे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सच्या समस्येने लोक त्रस्त असतात. यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात किंवा वाफ घेतात. पण चेहऱ्यावर वाफ घेतल्याने खरंच ब्लॅकहेड्स साफ होतात का ?
Beauty Tips : बहुतांश लोकांच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स (blackheads)असतात. ते चंद्रावरील डागासारखे वाटतात, म्हणजेच आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात त्यामुळे बाधा येऊ शकते. पुरूष असो किंवा महिला, बरेचसे लोक हे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सच्या समस्येने लोक त्रस्त असतात. त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण आणि त्यासह तेल जमा झाल्यास ब्लॅकहेड्स निर्माण होतात. हे तेल आणि घाण चेहऱ्यावर काळ्या डागांच्या म्हणजेच ब्लॅकहेड्सच्या रूपात दिसून येते. ब्लॅकहेड्समुळे चेहरा खूप वाईट दिसू लागतो. मात्र चेहरा नियमितपणे स्वच्छ (skin care) केल्याने ब्लॅकहेड्स टाळता येतात.
चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स हटवण्यासाठी लोक काय-काय उपाय करत असतात. त्यातीलच एक उपाय म्हणजे वाफ घेणे. ब्लॅकहेड्स झाल्यावर अनेक जण चेहऱ्यावर वाफ घेतात. खरंतर वाफेमुळे त्वचेची छिद्रे उघडतात, पण त्यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स खरोखरच दूर होतात का ? चला जाणून घेऊया.
वाफेमुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स खरोखरच दूर होतात का ?
वाफ घेतल्याने ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स दूर होतात हे पूर्णपणे खरं नाही. खरंतर आपण जेव्हा चेहऱ्यावर वाफ घेतो तेव्हा त्वचेची छिद्रे उघडली जातात, रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा हायड्रेटही होते. पण त्यानंतर ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी त्वचेची साफसफाई करावी लागते. ओलसर त्वचेतून ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स सहज काढता येतात.
घरी असे साफ करा ब्लॅकहेड्स
- त्वचेच्या प्रकारानुसार प्रथम फेसवॉश घेऊन चेहरा स्वच्छ करा.
- ब्लॅक किंवा व्हाईट हेड्स असलेल्या ठिकाणी स्क्रब करत गोलाकार मसाज करा.
- स्क्रब केलेल्या चेहऱ्यावर वाफ घ्या आणि नंतर हलक्या हाताने मसाज करा.
- ब्लॅक हेड्स साफ केल्यानंतर चेहऱ्यावर फेसमास्क लावा.
- 10-15 मिनिटांनंतर मास्क काढा आणि चांगले मॉयश्चरायझर लावा.
या गोष्टींची घ्या विशेष काळजी
- ब्लॅक हेड्स एका झटक्यात साफ करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा चेहऱ्यावर पुरळ उठू शकतात. व चेहऱ्याचे नुकसान होऊ शकते.
- ब्लॅक हेड काढण्यासाठी कोणतेही साधन अतिशय काळजीपूर्वक वापरले पाहिजे.
- ब्लॅकहेड्स काढण्यासाठी जास्त जोरात स्क्रब करू नका.