नाभीत तेल टाकल्याने त्वचाच नव्हे आरोग्यही सुधारते ; मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
त्वचेची काळजी घेताना अनेक लोकं नाभीच्या काळजीकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे ते अनेक आजारांना बळी पडतात. नाभी नियमितपणे स्वच्छ केल्याने आणि नाभीला तेल लावल्याने, तुम्ही अनेक आरोग्य समस्या दूर करू शकता.
नवी दिल्ली : शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी स्क्रब, बॉडी वॉश (body wash) अशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो. तसेच त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी काही लोक तेल आणि महागडे मॉइश्चरायझरही वापरून पाहतात. पण शरीरासोबतच नाभीची (Belly button) काळजी घेणे, नीट स्वच्छता करणे आणि नाभीमध्ये तेल लावणे (cleaning and oiling of belly button) हेही खूप आवश्यक आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ? हो, याच्या मदतीने तुम्ही शरीराच्या अनेक समस्या सहज दूर करू शकता. आंघोळ करताना बहुतेक लोक नाभीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. मात्र, नाभी अस्वच्छ राहिल्यास तुम्हाला मधुमेह आणि वजन वाढणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
नाभी स्वच्छ केल्याने व त्यामध्ये तेल टाकल्याने केवळ आपल्या त्वचेलाच नव्हे तर आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात, ते कोणते हे जाणून घेऊया.
नाभी स्वच्छ करण्याचे उपाय
नाभी साफ करण्यासाठी तुम्ही कोमट पाणी वापरू शकता. त्यासाठी अंगावर कोमट पाणी घ्यावे त्यानंतर नाभीला एखादा सौम्य साबण लावून चोळून स्वच्छ करावे व नंतर कोमट पाण्याने धुवून टाकावे. यामुळे नाभी सहज स्वच्छ होईल. तसेच अंघोळीनंतर नाभी टॉवेलने कोरडीकरून त्यात दोन थेंब तेल टाकावे. हा उपाय दररोज केल्यास अनेक फायदे मिळतील.
डोकं शांत राहतं
नाभी स्वच्छ केल्याने आणि तेल लावल्याने मन व डोकं शांत राहते. अशा परिस्थितीत तुमचा थकवा तर दूर होतोच पण तुम्ही खूप तणावमुक्तही राहू शकता.
त्वचा चमकेल
नाभीला तेल लावल्याने संपूर्ण शरीरावर होणारा परिणामही तुम्ही पाहू शकता. नाभीला तेल लावल्याने त्वचेची आर्द्रता टिकून राहते, ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि चमकदार दिसते.
दुखण्यापासून आराम मिळेल
नाभीची नियमित स्वच्छता केल्याने व तेल लावल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. वास्तविक या ठिकाणी तेल लावल्याने सांध्यांची हाडे मजबूत होतात, त्यामुळे सांधेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते.
डोळ्यांसाठी फायदेशीर
नाभी स्वच्छ ठेवणे आणि मॉयश्चराइज करणे हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. नाभीला नियमित तेल लावल्याने डोळ्यात जळजळ होणे, खाज सुटणे आणि कोरडेपणाची समस्या दूर होते.
प्रजनन आरोग्य चांगले राहते
नाभी स्वच्छ करणे आणि तेल लावणे हे पुरुष आणि महिला दोघांसाठीही फायदेशीर असले तरी महिलांनी पोटाच्या नाभीला तेल लावल्याने प्रजनन आरोग्य सुधारण्यास सुरुवात होते. यासोबतच प्रजोत्पादनाशी संबंधित आजारही महिलांमध्ये कमी दिसतात.
केस निरोगी होतात
नाभीला तेल लावणे हे केसांना पोषण देण्यासाठी देखील उपयुक्त आहे, ज्यामुळे केस गळणे आणि केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका मिळते. तसेच तुमचे केस लांब, दाट आणि सुंदर दिसू लागतात.
पचनसंस्था मजबूत होते
नाभीची नियमित स्वच्छता केल्याने व तेल लावल्याने शरीराची पचनक्रियाही मजबूत होते. यामुळे पोटात गॅस, ॲसिडिटी आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.