Cloves For Hair: लांब आणि मजबूत केसांसाठी वापरा लवंग, मिळतात अनोखे फायदे

लवंगांमध्ये बीटा कॅरेटिन असते, ज्यामुळे पेशी वाढतात. त्याशिवाय लवंगांमध्ये व्हिटॅमिन के हेही असते , जे रक्ताभिसरणाला चालना देते.

Cloves For Hair: लांब आणि मजबूत केसांसाठी वापरा लवंग, मिळतात अनोखे फायदे
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 11:21 AM

नवी दिल्ली – लवंगांचा वापर मसाल्यांमध्ये (spices) केला जात असला तरी इंडोनेशियामध्ये अनेक शतकांपासून पोटाचा त्रास दूर करण्यासाठी लवंग (cloves) वापरली जाते. तसेच लवंगांमध्ये असेलेले अँटी-बॅक्टेरिअल, अँटीव्हायरल, ॲनेस्थेटिक, अँटी-पॅरॅसेटिक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे लवंग ही अनेक चिनी औषधांमध्ये आणि आयुर्वेदिक उपचारांसाठीही वापरली जाते. दातदुखीसाठी लवंग तेल (clove oil for toothache) वापरले जाते. पण हीच लवंग आपल्या केसांसाठीही (cloves for hair) खूप फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ? तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण पेशींच्या वाढीमध्येही लवंग खूप महत्वपूर्ण भूमिका बजावते.

केसांची वाढ चांगली होते

लवंगांमध्ये बीटा कॅरेटिन असते, ज्यामुळे पेशी वाढतात. त्याशिवाय लवंगांमध्ये व्हिटॅमिन के हेही असते , जे रक्ताभिसरणाला चालना देते. लवंगांचा अप्रत्यक्षपणे आपल्याला हा फायदा होतो. मात्र केसांच्या वाढीसाठी केलॉन्ग हे वैज्ञानिकदृष्ट्या फारसे प्रभावी नाही, असे म्हटले जाते. पण एका संशोधनानुसार लवंगांचा उपयोग केसांच्या उपचारासाठी आणि स्काल्प डिसऑर्डरच्या उपचारांसाठी केला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

केस होतात मजबूत

हीट डॅमेज, ताण ( केस नीट न विंचरणे) आणि ब्लीचिंगमुळे केस गळणे आणि तुटण्याचा त्रास होऊ शकतो. पण लवंग ही केस तुटणे टाळू शकते. त्यात मायक्रोन्यूट्रिएंट्स मॅंगनीज आढळतात, जे आपले केस मजबूत करतात. आणि केसांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. लवंगांमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट हे केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करतात. लवंगात अँटी-ऑक्सिडेंट युजेनॉल असते, जे केसांच्या कूपांचे ऑक्सिडेशन रोखण्यास मदत करू शकते.

खाज येण्यापासून संरक्षण करते

लवंग ही तिच्या अँटी-ऑक्सिडेंट, अँटीव्हायरल आणि उपचार गुणधर्मांमुळे त्वचा आणि स्काल्पच्या उपचारांसाठी वापरली जाते. कोंडा दूर करण्यासाठीही बरेच लोक लवंगांचे तेल वापरतात. लवंग ही कोंड्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंवर उपचार करू शकते, ज्यामुळे खाज सुटण्याची समस्या कमी होण्यात मदत होते.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.