Hair Fall in Rainy Season : पावसाळ्यात होते प्रचंड केसगळती, दिवसभरात तुटू शकतात 300 केस ! या सोप्या उपायांनी करा बचाव

केसगळतीची समस्या पावसाळ्यात सर्वाधिक दिसून येते. वातावरणातील आर्द्रतेमुळे केसांवर विपरीत परिणाम होतो. केसगळती थांबवण्यासाठी काही उपाय करू शकता.

Hair Fall in Rainy Season : पावसाळ्यात होते प्रचंड केसगळती, दिवसभरात तुटू शकतात 300 केस ! या सोप्या उपायांनी करा बचाव
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 5:43 PM

Tips To Prevent Hair Fall in Monsoon : सध्या देशाच्या बहुतांश भागात पाऊस पडत आहे. या ऋतूत आजारांचा कहर वाढतो. तसेच या काळात स्किन आणि केसांचीही (skin and hair care) अधिक, विशेष काळजी घ्यावी लागते, अन्यथा बराच त्रास होऊ शकतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार केसगळतीची (Hair Fall) समस्या पावसाळ्यात सर्वाधिक दिसून येते. तुम्हालाही हा त्रास होत असेल तर केसगळतीचे कारण जाणून घेऊन त्यावर काय उपाय करता येतील हेही समजून घ्या. त्यामुळे केसगळती तर थांबेलच शिवाय लांब व मजबूत केस मिळतील.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्यात हवेत आणि वातावरणात जास्त आर्द्रता असते आणि खूप घाम येतो. या ऋतूमध्ये जास्त भिजल्यामुळे स्काल्पही कोरडा होऊ शकतो. त्यामुळे केस कमकुवत होऊन तुटायला लागतात. पाण्यात भिजल्यास अनेक वेळा स्काल्पला इन्फेक्शनही होऊ शकते, जे केसगळीतासाठीही कारणीभूत ठरते. अशा परिस्थितीत केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.

पावसाळ्यात रोज तुटू शकतात 300 केस

दररोज केस धुताना आणि ते विंचरताना शंभर केस तुटणे नॉर्मल आहे. पण पावसाळ्याच्या दिवसांत 300 केसही तुटू शकतात. त्यामुळे केसांची विशेष निगा राखली पाहिजे व केसगळती रोखण्यासाठी शक्य ते सर्व उपाय केले पाहिजे.

केसगळती कशी रोखाल ?

  • पावसात भिजणे टाळा, केस ओले झाले तर ते लगेच वाळवावेत. असे केल्याने फंगल इन्फेक्शनचा झोका कमी होतो व केसगळतीपासूनही आरामा मिळू शकतो. तसेच केसही मजबूत होतात.
  • केसगळती रोखण्यासाठी आंघोळीपूर्वी केसांना खोबरेल तेलाने चांगला मसाज करावा. असे केल्याने स्काल्पचा कोरडेपणा दूर होतो आणि ते कंडिशनर म्हणून काम करते. तुम्ही नारळाच्या तेलाने किंवा इतर कोणत्याही तेलाने आठवड्यातून 1-2 वेळा केसांना मसाज करू शकता.
  • शांपूचा वापर करून केस धुतल्यावर त्यांना कंडीशनर लावणेही आवश्यक आहे, विशेषत: पावसाळ्यात हे केलंच पाहिजे. यामुळे केस मजबूत होतात आणि केसगळतीच्या समस्येपासूनही बराच आरा मिळतो. शांपूनंतर कंडीशनर लावल्याने केस मऊही राहतात.
  • केस मजबूत व्हावेत यासाठी आणि केसगळतीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी चांगला प्रोटीनयुक्त आहारा घेतला पाहिजे. या ऋतूमध्ये तुम्ही विविध डाळी, पनीर आणि सोयाबीन खाऊ शकता. मांसाहार करत असाल तर तुम्ही मासे, चिकन आणि अंडी यांचेही सेवन करू शकता.
  • केसांसाठी ऋतूमानानुसार मिळणाऱ्या फळांचे सेवनही उत्तम मानले जाते. सीझनल फळं अवश्य खावीत, त्यामुळे केसांना झिंक, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन्स मिळतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.