Yoga and Pranayama : योग आणि प्राणायाम सेम नसतो बरं का; हा आहे त्यांच्यातील मुख्य फरक..
योग आणि प्राणायाम एकच आहेत असं अनेकांना वाटते. पण ते खरं नाहीये.... योग आणि प्राणायाम यात बरंच अंतर आहे.
Yoga and Pranayama : भारतात योगाची (Yoga) परंपरा खूप प्राचीन आहे. शतकानुशतकांपासून इथले लोक योग करताना दिसतात. दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. मात्र सध्या लोकांची जीवनशैली इतकी बिघडली आहे की ते योगासने करण्यासाठी वेळच देऊ शकत नाहीत. यामुळे शरीराला अनेक आजारही घेरतात. योगासने केल्याने तुम्ही तंदुरुस्त तर राहताच पण त्यासोबतच तुम्ही स्वतःला अनेक गंभीर आजारांपासूनही वाचवू शकता. त्यांच्या मदतीने आपण केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी राहात नाही तर मानसिकदृष्ट्याही निरोगी राहतो. आजकाल बरेच लोक आहेत व्यायाम करण्याऐवजी योगासने किंवा प्राणायाम करतात.
पण अनेक लोकांना असं वाटतं की योग आणि प्राणायम (Yoga and Pranayama) हे एकच, म्हणजे सेम आहेत. पण तसं अजिबात नाही. या दोन्ही गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. योग आणि प्राणायाम यात काय फरक आहे ते जाणून घेऊया.
योग म्हणजे काय ?
योग करताना तुम्ही शारीरिक व्यायाम करता. योग याचा अर्थ असतो सामील होणे. योग हा एक प्रकारचा व्यायाम आहे. त्यामुळे शरीर लवचिक बनण्यास मदत होते. श्वासोच्छवासाच्या व्यायामासह योगासने केली जातात. योगासने केल्याने शरीर ताणले जाते. त्यामुळे आपल्या शरीराचे स्नायूही मजबूत होतात. योगासनांमुळे अस्थमासारख्या अनेक आजारांपासून तुमचे रक्षण होते. याच्या मदतीने तुम्ही तुमचे स्नायू मजबूत करू शकता. तसेच योगासने शरीराची रोगप्रतिकारशक्तीही वाढवतात.
प्राणायाम म्हणजे काय ?
तर प्राणायाम हा श्वासोछ्वासाचा व्यायाम आहे. प्राणायाम करताना श्वासावर लक्ष केंद्रित केले जाते. याला तुम्ही श्वासोच्छवासाचा योग देखील म्हणू शकता. आपण काही व्यायामांद्वारे श्वास घेण्यास सक्षम होते. नियमितपणे प्राणायम करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे मन शांत राहते, आपण स्वतःला तणावमुक्त ठेवू शकतो. तसेच प्राणायाम केल्याने कफ विकारही कमी करू शकता.
एवढेच नव्हे तर प्राणायामामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. योगासनांप्रमाणाचे प्राणायमाच्या मदतीनेही तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. फारसे आजारी पडण्याचा धोका कमी होतो. प्राणायमामुळे एकाग्रता वाढण्यासही मदत होते.
तसेच प्राणायाम केल्याने आपण अनेक मानसिक आजारांपासून स्वतःला वाचवू शकतो. एवढेच नव्हे तर प्राणायमामुळे मन शांत राहते आणि झोपेची गुणवत्ताही सुधारते. प्राणायाम करताना श्वास घेतला जातो आणि उच्छवास सोडला जातो. यामुळे तुमच्या फुफ्फुसाचे कार्य देखील सुधारते. प्राणायाम हे तुमच्या फुफ्फुसांना मजबूत करण्याचे काम करते.