Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त अश्वगंधा, जाणून घ्या फायदे

अश्वगंधा हा उदासीनता कमी करण्यासाठी वापरला जातो. हे आपल्याला शांत ठेवते आणि शरीरातील एंडोर्फिन बाहेर टाकते. ते सेवन केल्याने तुम्ही तणावापासून दूर राहता. (know the exact benefits of Ashwagandha, which is useful for relieving stress)

Health Tips : तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त अश्वगंधा, जाणून घ्या फायदे
तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त अश्वगंधा
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 12:03 PM

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जिवनात प्रत्येकाला काही ना काही व्याधी असतात. बर्‍याच व्याधी आपण घेत असलेल्या टेन्शनमुळे वाढलेल्या असतात. वाढता ताणतणाव आपल्या शरीरावर तसेच मानसिक स्थितीवर परिणाम करतो. अशा परिस्थितीत आपण अश्वगंधासारख्या गुणकारी वनस्पतीचा वापर करून ताणतणावातून मुक्तता मिळवू शकतो. अश्वगंधा एक औषधी वनस्पती आहे जी शरीरास आतून आणि बाहेरून बरे करण्याचे काम करते. त्यात अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि पौष्टिक घटक असतात, जे शरीराच्या विकासास मदत करतात. याचे सेवन केल्यास आजार रोखण्यास मदत होते. याव्यतिरिक्त शरीरात उर्जादेखील प्राप्त होते. अश्वगंधा हा उदासीनता कमी करण्यासाठी वापरला जातो. हे आपल्याला शांत ठेवते आणि शरीरातील एंडोर्फिन बाहेर टाकते. ते सेवन केल्याने तुम्ही तणावापासून दूर राहता. (know the exact benefits of Ashwagandha, which is useful for relieving stress)

तणाव दूर करते

अश्वगंधा शरीरातील कोर्टिसोलच्या पातळीवर परिणाम करते. कोर्टिसोल हा एक स्ट्रेस हार्मोन आहे. हे शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी कार्य करते. ज्यामुळे आपण तणावापासून दूर राहता.

हाडे आणि स्नायूंची शक्ती सुधारते

अश्वगंधा शरीरात स्नायूंची शक्ती वाढवण्याचे काम करते. विशेषतः वृद्धांनी ते सेवन केले पाहिजे. वजन कमी करण्याबरोबरच हे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.

रोगप्रतिकार शक्ती वाढते

अश्वगंधा रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप फायदेशीर आहे. हे शरीरातील तग धरण्याची क्षमता वाढवते. यामुळे शरीर शारीरिक आणि मानसिक पातळीवर निरोगी राहते.

साखरेची पातळी नियंत्रित करते

अश्वगंधा शरीरात इन्सुलिनची पातळी वाढविण्याचे कार्य करते, ज्यामुळे शरीरात रक्तातील साखरेची पातळी कमी होते. मधुमेह रूग्णांसाठी अश्वगंधाचे सेवन करणे फायदेशीर आहे. हे आपल्या शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी कार्य करते.

स्मरणशक्ती सुधारते

अश्वगंधा आपल्या स्मरणशक्तीसाठी आणि मानसिक स्थितीसाठी खूप चांगले आहे. हे मेंदूला चालना देते आणि सुस्थितीत ठेवते. मेंदूची कार्यक्षमता वाढवते.

पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढवते

वाढता ताणतणाव बहुतेक पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम करतो. ज्या पुरुषांना जास्त ताण येतो, त्यांच्यात टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असते. ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी असते. अश्वगंधा तणावाची पातळी कमी करण्यात मदत करते. यातून शुक्राणूंची संख्या वाढते.

निद्रानाशाच्या समस्येतून सुटका

जर तुम्हाला तणाव आणि चिंतेमुळे झोप येत नसेल, तर रात्री झोपायच्या आधी एका ग्लास दुधात थोडीशी अश्वगंधा पावडर प्या. हे आपल्याला चांगली झोप लागण्यास आणि आपल्या झोपेची पद्धत सुधारण्यास मदत करेल. (know the exact benefits of Ashwagandha, which is useful for relieving stress)

संबंधित बातम्या

बदाम खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे नक्की वाचा !

रुक्ष केसांच्या समस्या आणि केस गळतीही होईल कमी, ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा !

ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्...
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्....
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल.
मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे..., करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन्
मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे..., करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन्.
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा.
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?.
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप.
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर.