चव तिखटजाळ पण आरोग्यासाठी फायदेशीर, किचनमधला हा पदार्थ त्वचा व केसांसाठी आहे बेस्ट

लाल मिरची हा मसाल्याचा असा पदार्थ आहे, ज्याचा वापर मर्यादित प्रमाणात केल्याने पदार्थांची चव वाढते. पण त्याचा जास्त वापर केल्याने तुमच्या डोळ्यात पाणी येऊ शकते.

चव तिखटजाळ पण आरोग्यासाठी फायदेशीर, किचनमधला हा पदार्थ त्वचा व केसांसाठी आहे बेस्ट
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 3:40 PM

नवी दिल्ली : भारतीय स्वयंपाकघरात आढळणारे बहुतेक मसाले (Indian spices) हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या मसाल्यांमध्ये असे गुणधर्म लपलेले असतात, ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात तसेच आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करता येते. चवीबरोबरच या मसाल्यांना शतकानुशतके महत्त्व दिले जाते. त्यापैकीच एक आहे लाल मिरची किंवा लाल तिखट (red chilli). त्याचा वापर मर्यादित प्रमाणात केल्याने पदार्थांची चव वाढते. पण जास्त वापर केल्याने तुमच्या डोळ्यात पाणी येऊ शकते. पण या गरम लाल मिरचीचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे (benefits of red chilli for health) आहेत. भारत हा लाल मिरचीचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. डोळ्यांत पाणी आणणारी लाल मिरची आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.

ब्लड प्रेशर राहते नियंत्रणात

हे सुद्धा वाचा

लाल मिरची पावडर किंवा लाल तिखटात पोटॅशिअम भरपूर असते. त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या रिलॅक्स होण्यास व रक्तदाब नियंत्रणात राखण्यास मदत होते. त्यात कॅप्सेसिन हा देखील घटक असतो. हा एक सक्रिय घटक आहे जो रक्तदाब कमी करून शरीरातील रक्ताभिसरण सुधारतो.

वजन कमी करण्याल फायदेशीर

अभ्यासानुसार, कोरडी लाल मिरची ही वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. अभ्यासात असे आढळून आले आहे की ती शरीरातील चरबी कमी करते आणि चयापचय अथवा मेटाबॉलिज्म रेट वाढवते, जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. लाल तिखट देखील भूक कमी करते आणि यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. तथापि, त्याचा वापर कमी करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रोगप्रतिकार शक्ती वाढवते

लाल मिरची पावडरमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी ओळखले जाते. हे शरीरातील रोग आणि संक्रमणांशी लढण्यास मदत करते. याशिवाय लाल मिरची शरीरातील फ्री रॅडिकल्स आणि टॉक्सिन कमी करण्यास मदत करते.

निरोगी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

लाल मिरची केवळ आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी त्वचेतील कोलेजन वाढवते. तर व्हिटॅमिन ए केसांना हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, जे आपले केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.