Trave | जगप्रसिद्ध चहाचे मळे पाहायला ‘आसाम’ फिरण्याची योजना आखताय? मग, वाचा ‘या’ राज्याविषयी काही खास गोष्टी…

फार पूर्वी मोगलांनी या ठिकाणी बर्‍याच वेळा आक्रमण केले होते, पण प्रत्येक वेळी ते इथे राज्य करण्यास अपयशी ठरले. आसामच्या अहोम राज्यकर्त्यांनी सुमारे 17 वेळा मोगलांचा पराभव केला.

Trave | जगप्रसिद्ध चहाचे मळे पाहायला ‘आसाम’ फिरण्याची योजना आखताय? मग, वाचा ‘या’ राज्याविषयी काही खास गोष्टी...
आसाम
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 5:13 PM

मुंबई : आसाममधील चहाचे मळे जगभर प्रसिद्ध आहे. आसाममधील चहा जगभरात निर्यात केली जाते. फार पूर्वी मोगलांनी या ठिकाणी बर्‍याच वेळा आक्रमण केले होते, पण प्रत्येक वेळी ते इथे राज्य करण्यास अपयशी ठरले. आसामच्या अहोम राज्यकर्त्यांनी सुमारे 17 वेळा मोगलांचा पराभव केला. औरंगजेबानेही एकदा आसामवर हल्ला केला होता, पण तो यशस्वी झाला नाही. चला तर, आसामबद्दलच्या अशाच काही ऐतिहासिक गोष्टींबद्दल जाणून घेऊया…(Know the history and details about state Assam)

आसामची लोकसंख्या

आसाममधील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 61.47 टक्के लोक हिंदू आहेत, तर 32.22 टक्के लोक मुस्लिम, 3.74 टक्के ख्रिश्चन आणि बाकीचे जैन, बौद्ध इत्यादी इतर धर्माचे लोक आहेत. स्वातंत्र्यानंतर आसाम एक मोठे राज्य होते. त्यावेळी आसामची राजधानी शिलाँग होती. त्याच वेळी राज्यांच्या मागणीमुळे, 1968मध्ये नागालँड, 1972मध्ये मेघालय आणि मिझोरम या राज्यांना आसामपासून वेगळे केले गेले.  यावेळी शिलाँग मेघालयच्या भागात गेले.

म्हणून, आता दिसपूर आसामची राजधानी बनली. आसाममध्ये ब्रह्मपुत्र नदी खूप प्रसिद्ध आहे. या नदीचा उगम राज्याच्या मध्यभागी होतो. जो सुमारे 100 किलोमीटर रूंद आणि 1000 किलोमीटर लांबीचा आहे. ब्रह्मपुत्र नदीमध्ये माजुली बेट तयार झाले आहे, जे जगातील सर्वात मोठे बेट मानले जाते.

आसामचा इतिहास

असे म्हणतात की, आसाम हा शब्द संस्कृत शब्द ‘असोमा’पासून तयार झाला आहे. या शब्दाचा अर्थ अनुपम आणि अद्वितीय असा आहे. त्याच वेळी, बरेच लोक म्हणतात की हे नाव ‘अहोम’पासून बनले आहे. आसामवर अहोम राज्यकर्त्यांनी सुमारे 600 वर्षे राज्य केले. ही वेळ ब्रिटीश सत्तेच्या आधीची होती. या राज्यात बरेच लोक डोंगर दऱ्यांमध्ये येऊन वसले होते. जसे की अ‍ॅस्ट्रिक, मंगोलियन, द्रविडियन आणि आर्य इत्यादी. यामुळेच आसाममध्ये विविध परंपरा आणि जीवन संस्कृती तयार झाल्या. हेच कारण आहे की, या राज्याला संस्कृती आणि सभ्यताने समृद्ध मानले जाते (Know the history and details about state Assam).

आसामची प्राचीन नावे

प्राचीन काळी आसामला ‘प्राग्ज्योतिष’ अर्थात ‘पूर्वी ज्योतिषाचे ठिकाण’ असे म्हटले जात असे. आणि नंतर या राज्याचे नाव ‘कामरूप’ असे पडले.’कामरुपाचा’ उल्लेख अलाहाबादच्या समुद्रगुप्त शिलालेखात सापडतो आणि त्यात गुप्त साम्राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा उल्लेख केला गेला आहे.

‘कामरूप’ राज्यात राजा कुमार भास्करवर्मन यांच्या आमंत्रणानंतर, चीनी विद्वान प्रवासी झुआनझांग सुमारे इ.स.पूर्व 743 मध्ये कामरूप येथे आले. आणि म्हणूनच 12व्या शतकापर्यंत पूर्वेकडील सीमा ‘प्राग्ज्योतिष’ आणि ‘कामरूप’ म्हणून ओळखली जात होती. इथला राजा स्वत:ला ‘प्राग्ज्योतिष नरेश’ म्हणत असे.

इतिहास

इतिहासाबद्दल बोलताना, 1228मध्ये पूर्व डोंगराळ प्रदेशात एक नवीन बदल दिसला. हो सुमारे 600 वर्षे येथे टिकून राहिला. पण राजदाबर यांच्यात झालेल्या भांडणांमुळे अहोम राज्यकर्त्यांचे शासन मोडकळीस येऊ लागले. यानंतर बर्मी लोक इथे स्थायिक झाले.

पण, एका करारामुळे हे राज्य 1826मध्ये ब्रिटीश सरकारच्या ताब्यात गेले. आसामच्या उत्तरेस भूतान आणि अरुणाचल प्रदेश, पूर्वेस मणिपूर आणि नागालँड आणि दक्षिणेस मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा या आंतरराष्ट्रीय सीमेसह हे राज्य तयार झाले आहे.

(Know the history and details about state Assam)

हेही वाचा :

Travel | ‘Gods Own Country’ केरळ, चहा आणि मसाल्यांव्यतिरिक्त ‘या’ ठिकाणांसाठी प्रसिद्ध!

Travel | भारताच्या ‘या’ गावात आजही सुखाने नांदतायत कौरव-पांडवांचे वंशज, तुम्हीही देऊ शकता भेट!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.