आपल्या शरीरावर दिसणाऱ्या तिळाचे कारण काय ?
तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर अचानक तीळ दिसू लागला आहे का? तीळ कशामुळे निर्माण होतात हे तुम्हाला माहीत आहे का ? शरीरावर दिसणार्या तीळाबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.
नवी दिल्ली : शरीराच्या विशिष्ट भागावर तीळ (moles) असण्याचा काही अर्थ असतो असे आपण आपल्या वाडवडिलांकडून ऐकले असेलच. काही लोक मानतात की तळहातावर तीळ असणे तुमची शक्तिशाली आर्थिक स्थिती दर्शवते. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्याचा वेगळा अर्थ (meaning of moles) असू शकता. पण मुळात तीळ (know what is mole and reason) म्हणजे काय, ते आपल्या शरीरावर का निर्माण होतात, त्याचे कारण काय हे तुम्हाला माहीत आहे का ? या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
तीळ म्हणजे काय ?
तीळ हे मेलानोसाइटसचे कॉन्स्नट्रेशन असते. मेलानोसाइटस या आपल्या त्वचेच्या रंगासाठी जबाबदार त्वचेच्या पेशी असतात. जेव्हा मेलानोसाइट्स समान रीतीने पसरू शकत नाहीत आणि त्याऐवजी एका समूहात वाढतात, तेव्हा तेथील त्वचेचा रंग अनेकदा बदलतो. तो टॅन, तपकिरी, काळा, गुलाबी, लाल आणि निळा अशा रंगांमध्ये दिसू शकतो. हे जन्मजातही असू शकते किंवा सूर्यप्रकाशामुळे तयार होऊ शकते.
तीळ का येतात ?
हे मेलेनोसाइट्समुळे होतात, परंतु मेलेनोसाइट्स कोणत्या कारणामुळे तयार होतात, याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप आढळलेली नाही. असे मानले जाते की अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्ग एका उत्प्रेरक म्हणून कार्य करते, कारण अतिनील किरणे या मेलेनोसाइट्सच्या निर्मितीला चालना देतात, ज्यामुळे सूर्यप्रकाशात असताना आपल्या त्वचेचा रंग बदलतो. याव्यतिरिक्त, अनुवांशिकता देखील तीळ निर्माण होण्यामागे प्रमुख भूमिका बजावते. काही कुटुंबांमध्ये प्रत्येक सदस्याला तीळ असतात. काही संशोधनांतून असे सुचवण्यात आले आहे की लिंग-विशिष्ट जीन्स यातील फरकांसाठी जबाबदार असतात. सामान्यत: स्त्रियांच्या शरीरावर खालच्या भागात तकर पुरूषांच्या शरीरावर वरच्या भागात (मान आणिस्काल्पवर) तीळ दिसून येतात.
हार्मोन्सचा देखील मेलानोसाइट्सवर परिणाम होता. यौवनावस्था, यौवन, गर्भधारणा आणि इतर प्रमुख हार्मोनल चढउतारांदरम्यान नवीन तीळ अनेकदा शरीरावर दिसतात आणि काही वेळा गायबही होतात.
तीळ येणे नॉर्मल असते का ?
तीळ येणे हे पूर्णपणे सामान्य आहेत आणि ते कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर येऊ शकतात. फिकट त्वचा असणाऱ्या लोकांच्या अंगावर तीळ येण्याची शक्यता जास्त असते. पुष्कळ मुलांचा तर तीळासह जन्म होतो आणि बालपणापासून तारुण्यापर्यंत म्हणजे वयाच्या 30व्या वर्षांपर्यंत कधीही येऊ शकतात. तीळाचा आकार आणि रंग काळानुसार बदलत राहतो.
नवी दिल्ली : शरीराच्या विशिष्ट भागावर तीळ (moles) असण्याचा काही अर्थ असतो असे आपण आपल्या वाडवडिलांकडून ऐकले असेलच. जसे काही लोक मानतात की तळहातावर तीळ असणे तुमची शक्तिशाली आर्थिक स्थिती दर्शवते. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्याचा वेगळा अर्थ (meaning of moles) असू शकता. पण मुळात तीळ (know what is mole and reason) म्हणजे काय, ते आपल्या शरीरावर का निर्माण होतात, त्याचे कारण काय हे तुम्हाला माहीत आहे का ? या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
तीळ का येतात ?
तीळ हे मेलानोसाइटसचे कॉन्स्नट्रेशन असते. मेलानोसाइटस या आपल्या त्वचेच्या रंगासाठी जबाबदार त्वचेच्या पेशी असतात. जेव्हा मेलानोसाइट्स समान रीतीने पसरू शकत नाहीत आणि त्याऐवजी एका समूहात वाढतात, तेव्हा तेथील त्वचेचा रंग अनेकदा बदलतो. तो टॅन, तपकिरी, काळा, गुलाबी, लाल आणि निळा अशा रंगांमध्ये दिसू शकतो. हे जन्मजातही असू शकते किंवा सूर्यप्रकाशामुळे तयार होऊ शकते.
तीळ का येतात ?
हे मेलेनोसाइट्समुळे होतात, परंतु मेलेनोसाइट्स कोणत्या कारणामुळे तयार होतात, याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप आढळलेली नाही. असे मानले जाते की अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्ग एका उत्प्रेरक म्हणून कार्य करते, कारण अतिनील किरणे या मेलेनोसाइट्सच्या निर्मितीला चालना देतात, ज्यामुळे सूर्यप्रकाशात असताना आपल्या त्वचेचा रंग बदलतो. याव्यतिरिक्त, अनुवांशिकता देखील तीळ निर्माण होण्यामागे प्रमुख भूमिका बजावते. काही कुटुंबांमध्ये प्रत्येक सदस्याला तीळ असतात. काही संशोधनांतून असे सुचवण्यात आले आहे की लिंग-विशिष्ट जीन्स यातील फरकांसाठी जबाबदार असतात. सामान्यत: स्त्रियांच्या शरीरावर खालच्या भागात तकर पुरूषांच्या शरीरावर वरच्या भागात (मान आणिस्काल्पवर) तीळ दिसून येतात.
हार्मोन्सचा देखील मेलानोसाइट्सवर परिणाम होता. यौवनावस्था, यौवन, गर्भधारणा आणि इतर प्रमुख हार्मोनल चढउतारांदरम्यान नवीन तीळ अनेकदा शरीरावर दिसतात आणि काही वेळा गायबही होतात.
तीळ येणे नॉर्मल असते का ?
तीळ येणे हे पूर्णपणे सामान्य आहेत आणि ते कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर येऊ शकतात. फिकट त्वचा असणाऱ्या लोकांच्या अंगावर तीळ येण्याची शक्यता जास्त असते. पुष्कळ मुलांचा तर तीळासह जन्म होतो आणि बालपणापासून तारुण्यापर्यंत म्हणजे वयाच्या 30व्या वर्षांपर्यंत कधीही येऊ शकतात. तीळाचा आकार आणि रंग काळानुसार बदलत राहतो.
तीळामुळे काही त्रास होऊ शकतो ?
त्वचेवर वाढलेले हे तीळ धोकादायक नसतात. तथापि, एका विशिष्ट वयानंतर त्याचे अचानक दिसणे चिंताजनक असू शकते. मात्र तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागात मोठा तीळ असेल, त्यामुळे वेदना होत असतील, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.