जाणून घ्या जान्हवी कपूरच्या सौंदर्याचं गुपित, तुम्हीही करु शकता या ऑर्गनिक वस्तूंचा वापर

जाणून घ्या जान्हवी कपूरच्या सौंदर्याचं गुपित, तुम्हीही करु शकता या ऑर्गनिक वस्तूंचा वापर (know the secret of Janhvi Kapoor's beauty)

जाणून घ्या जान्हवी कपूरच्या सौंदर्याचं गुपित, तुम्हीही करु शकता या ऑर्गनिक वस्तूंचा वापर
जाणून घ्या जान्हवी कपूरच्या सौंदर्याचं गुपित
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 5:53 PM

मुंबई : नेहमीच आपल्या स्टाईल, अदा, लुकमुळे सोशल मीडियात चर्चेत असलेली अभिनेत्री जान्हवी कपूरच्या सौंदर्यावरही चाहते फिदा असतात. जान्हवी कपूर सौंदर्य खुलवण्यासाठी नेहमी ऑर्गनिक गोष्टींचा वापर करते. जान्हवी घरगुती उपायांना सर्वाधिक महत्व देते. जर तुम्हालाही जान्हवी कपूरसारखे सुंदर व्हायचे असेल तर आम्ही तुम्हाला काही सोपे उपयुक्त उपाय सांगणार आहोत. हे तुम्ही आपल्या त्वचेला चमकदार बनविण्यासाठी आपल्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करू शकता. (know the secret of Janhvi Kapoor’s beauty)

गोल्डन ग्लो येण्यासाठी काय करावे?

त्वचेला गोल्डन ग्लो यावा यासाठी तुम्ही हर्बल फेस पॅक बनवू शकता, जे तुमच्या त्वचेचे सखोल पोषण करते आणि त्वचेला निरोगी ठेवते. याचा नियमित वापर केल्यास तुमच्या त्वचेत मेलेनिनचे उत्पादन कमी होते आणि त्वचेला तजेलदार करते. विशेष म्हणजे हा फेस पॅक बनविण्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. ज्या संत्र्याच्या साली तुम्ही कचरा म्हणून फेकून देता त्यांचा उपयोग हा फेसपॅक बनविण्यासाठी करायचा आहे. हा तुमच्या चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसातच तुमची त्वचा चमकदार होईल.

कसा बनवाल संत्र्याच्या सालींचा फेसपॅक?

साहित्य – दीड चमचा संत्र्याच्या सालीची पावडर, अर्धा चमचा हळद, एक चमचा मध, गुलाबपाणी, कॉटन बॉल कृती – एका भांड्यात दीड चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घ्या. यात आर्धा चमचा हळद, एक चमचा मध आणि गरजेनुसार गुलाब पाणी टाकून पेस्ट बनवा. लक्षात ठेवा ही पेस्ट जाडसर असली पाहिजे.

कसे उपयुक्त आहे संत्र्यांचे फेसपॅक?

संत्र्याची पावडर तुमच्या चेहऱ्यावरील डेड सेल्स बाहेर काढते. त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते. तसेच हळद चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग साफ करते. मध त्वचेला खोलवर मॉईश्चराईज करते आणि तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता. कारण त्वचेवरील सेल्स एकदम स्वस्थ आणि फ्रेश दिसतात. गुलाब पाणी त्वचा घट्ट करण्यास मदत करते. हे आपल्या त्वचेला मॉईश्चरायझिंग करण्यास आणि बराच काळ त्वचेतील ओलावा राखण्यास मदत करते. तसेच यामुळे त्वचेचा रंग उजळतो.

कसे लावाल फेस पॅक?

सर्वप्रथन चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. कारण पेस्ट जाडसर असल्यामुळे चेहऱ्यावर योग्य पद्धतीने लावता आली पाहिजे. यासाठी हळू-हळू पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर 10 ते 15 मिनिटे तसेच ठेवा. पॅक सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर स्प्रे किंवा कॉटनवर गुलाबजल घेऊन चेहऱ्यावर लावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही या पॅकचा वापर करु शकता. जर लगातार एक महिना हे केले तर तुमच्या त्वचेमध्ये तुम्हाला सकारात्मक हदल जाणवतील. यासोबतच तुमची त्वचा दीर्घकाळ स्वस्थ राहिल. (know the secret of Janhvi Kapoor’s beauty)

इतर बातम्या

Military Diet | केवळ तीन दिवसात वजन कमी करा, जाणून घ्या मिलिटरी डाएट प्लानबाबत

Migraine Neck Pain । मानेपर्यंत पोहोचू शकतात मायग्रेनच्या वेदना, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.