Too much sugar : गोडाचं खाणार त्याला (लवकर) म्हातारपण येणार ! जाणून घ्या अति साखर खाण्याचे दुष्परिणाम
आपल्या सर्वांना थोडंफार गोड खायला आवडतंच आणि तो पुरेसा गोडवा फळांमधून मिळतो. पण तुम्ही एका प्रमाणाबाहेर मिठाई खात असाल तर त्याचा फटका तुमचे आरोग्य व त्वचा दोहोनांही बसेल.
नवी दिल्ली : जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करणे (excessive sugar) हे आपल्या आरोग्यासाठी तर हानिकारक आहेच पण त्याचा आपल्या त्वचेलाही त्रास (affect on skin) सहन करावा लागतो. याचा परिणाम केवळ तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवरच होत नाही तर शरीराच्या सर्व भागांच्या त्वचेवर होतो. निरोगी शरीर आणि त्वचेसाठी योग्य आहार (healthy diet) खूप महत्त्वाचा आहे. यासोबतच खाण्याच्या योग्य सवयींमध्ये संतुलन राखणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आहारप्रमाणे साखरेच्या सेवनावरही नियंत्रण ठेवणे गरजेचे असून आहारात शक्य तितकी कमी साखर घ्यावी.
आपल्या सर्वांना माहित आहे की जास्त साखर खाल्ल्याने मधुमेह होऊ शकतो. तसेच मधुमेहाने ग्रस्त लोकांची त्वचा खूप संवेदनशील बनते. यासोबतच साखरेचे जास्त सेवन करणार्यांची बरी करण्याची शक्तीही (healing power)खूप कमी असते. तर, अति गोड खाण्याच्या सवयीचा त्वचेवर काय परिणाम होऊ शकतो, ते जाणून घेऊया.
तुम्ही जास्त गोड खात असाल तर ही लक्षणे दिसून येऊ शकतात.
1) ॲक्ने ब्रेकआऊट
साखरेचे जास्त सेवन केल्यास मुरुमांचा धोका वाढू शकतो. शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने जळजळ होते हे आपल्याला माहीत असेलच. यामुळे पिंपल्स , झिट्स, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स होऊ शकतात. यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीरात जास्त प्रमाणात सेबम (तेल) निर्माण होऊ लागते, तर त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो आणि ॲक्ने ब्रेकआऊट समस्या दिसू लागतात.
2) अकाली वृद्धत्व
त्वचेवर साखरेच्या हानिकारक प्रभावांमुळे होणारी एक गंभीर समस्या म्हणजे अकाली वृद्धत्व. साखरेचे जास्त सेवन केल्याने त्वचा अकाली वृद्ध होते.आपल्या त्वचेला आकार, रचना आणि मजबूती देण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कोलेजन आणि इलास्टिनला साखर तोडते. यामुळे त्वचेवर सुरकुत्या, बारीक रेषा, कोरडेपणा, पिगमेंटेशन इत्यादी वृद्धत्वाची चिन्हे वेळेपूर्वी अथवा अकाली दिसू लागतात.
3) जळजळ होते
जास्त साखर असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात त्वरीत दाहक प्रतिक्रिया निर्माण होते. त्यामुळे सोरायसिस आणि एक्झिमा यासारख्या त्वचेशी संबंधित दाहक समस्यांचा धोका वाढतो.
4) तेलाचे उत्पादन वाढते
सेबम हे एक प्रकारचे तेल आहे जे नैसर्गिकरित्या आपल्या शरीरात असते. हे आपल्या त्वचेला मॉयश्चराइझ ठेवण्यास मदत करते. अशा परिस्थितीत साखरेचे जास्त सेवन केल्याने शरीरातील सेबमचे उत्पादन वाढते, त्यामुळे त्वचेत जास्त प्रमाणात तेल तयार होते आणि त्वचा तेलकट होते. यामुळे सेबम हे एक प्रकारचे तेल आहे जे नैसर्गिकरित्या आपल्या शरीरात असते. हे आपल्या त्वचेला मॉइश्चरायझेशन ठेवण्यास मदत करते. अशा परिस्थितीत साखरेचे जास्त सेवन केल्याने शरीरातील सेबमचे उत्पादन वाढते, त्यामुळे त्वचेत जास्त प्रमाणात तेल तयार होते आणि त्वचा तेलकट होते. यामुळे ॲक्ने, पिंपल्स इत्यादी समस्या उद्भवतात.
त्वचेची काळजी घेण्यासाठी उपाय
साखरेचे सेवन माफक प्रमाणात करा
साखर पूर्णपणे टाळणे कठीण आहे, परंतु ते नियंत्रित करणे सोपे असते. आपल्या पदार्थांमध्ये शक्य तितकी कमी साखर घालण्याचा प्रयत्न करा. यासाठी साखरेचा समावेश असलेल्या पदार्थांपासून अंतर राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्याच वेळी, फळे, मध, खजूर आणि गूळ यासारखी शक्य तितकी नैसर्गिक साखर घेण्याचा प्रयत्न करा.
पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे
स्वतःला आतून हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. पाणी कोलेजन आणि इलास्टिन तयार करण्यास मदत करते. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी प्या, तसेच काकडी, टोमॅटो आणि टरबूज यांसारख्या पाण्याने समृद्ध पदार्थांचा आहारात समावेश करा.
अँटी-ऑक्सीडेंट युक्त पदार्थांचे सेवन करा
अँटिऑक्सिडंट्स त्वचेवरील फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतात. यासोबतच नैसर्गिकरीत्या मिळणारे जीवनसत्त्वे आणि खनिजे साखरेला शरीरातील प्रथिनांना बांधून ठेवण्यास प्रतिबंध करतात. ज्यामुळे साखरेचा त्वचेवर परिणाम होत नाही. तुमचे शरीर देखील नैसर्गिकरित्या अँटिऑक्सिडेंट्स तयार करते, परंतु त्याचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, कॉफी, इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकता.
पुरेशी झोपही महत्वाची
योग्य प्रमाणात झोप घेतल्याने त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर दिसते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा त्वचा खराब झालेल्या त्वचेच्या पेशी आणि वृद्धत्वाचे परिणाम दुरुस्त करते, त्यामुळे पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे. अन्यथा, त्वचेशी संबंधित विविध प्रकारच्या समस्या दिसू शकतात.