शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दानधर्म करा, साडेसातीची पीडा निवारण्याचे ज्योतिषशास्त्रात उपाय काय?

शनिवारी शनि मंदिरात जाऊन त्याची पूजा केल्यास शनि ग्रहाचे अशुभत्व दूर होते, असे मानले जाते. (Saturday zodiac sign)

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दानधर्म करा, साडेसातीची पीडा निवारण्याचे ज्योतिषशास्त्रात उपाय काय?
शनिदेव
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 10:33 AM

मुंबई : शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित असतो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी भाविक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. चांगल्या वाईट-कर्मांचा हिशेब ठेवणाऱ्या शनिदेवाला श्रद्धाळू न्यायदेवता मानतात. शास्त्रामध्ये शनि ग्रहाला क्रूर ग्रहही म्हटलं जातं. साडेसातीची पीडा राशीला लागल्यास अनेकांचे धाबे दणाणतात. मात्र शनिदेव नेहमीच अशुभ फळ देईल, असं नाही. शनिदेव शुभ फलितही देतात. ज्योतिष शास्त्रामध्ये शनि ग्रहाचे दोष निवारण करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपायांचा उल्लेख करण्यात आला आहे. (know what to donate on Saturday and how it affects your zodiac sign)

शनिवारी शनि मंदिरात जाऊन त्याची पूजा केल्यास शनि ग्रहाचे अशुभत्व दूर होते, असे मानले जाते. दर शनिवारी मंदिरात दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात, अशीही धारणा आहे. कुठल्या दानामुळे शनिदेव प्रसन्न होतात, त्याविषयी जाणून घेऊया.

कोणत्या राशींना साडेसाती?

ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, सध्या मिथुन आणि तूळ राशीवर शनिची वक्रदृष्टी आहे. तर धनु, मकर आणि कुंभ राशींची साडेसाती सुरु आहे. शनिग्रह शांत करण्यासाठी एखाद्याने दानधर्म केले पाहिजे, असे शास्त्रात सुचवले आहे.

शनिदेवाला कसे कराल प्रसन्न?

जेव्हा कुंडलीत शनि ग्रहाचा प्रकोप होतो, तेव्हा आपल्या कार्यात कुठल्या ना कुठल्या कारणास्तव बाधा येत राहते, असं निरीक्षण नोंदवलेलं आहे. तुमचे आरोग्य, धन, कुटुंब, व्यवसाय आणि नोकरीवरही याचा परिणाम होतो, असं बोललं जातं. त्यामुळेच शनीच्या अशुभ फळांपासून बचाव करण्यासाठी भाविक मार्ग शोधतात.

शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय

शनि दोष कमी करण्यासाठी शनिवारी काळ्या वस्तू दान कराव्यात, असं ज्योतिषशास्त्रात सुचवलं आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळ्या रंगाचे ब्लँकेट, छत्री दान करणे शुभ मानले जाते. याशिवाय काळ्या चपला गोरगरीब लोकांना दान करणे चांगले मानतात. शनिवारी मोहरीचे तेल आणि काळे उडीद दान करणे शुभ असते. याशिवाय मोहरीचे तेल अर्पण करुन दान दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात, असेही मानले जाते.

विशेष टीप:  ‘टीव्ही 9 मराठी’ कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही, प्रस्तुत लेखात ज्योतिषशास्त्राच्या उपायांचा उल्लेख करण्यात आला आहे.

(know what to donate on Saturday and how it affects your zodiac sign)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.