फळं खाणं फायदेशीर, पण अवेळी खालं तर…
जेवणाच्या अर्धा ते एक तास आधी फळे खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळते, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
नवी दिल्ली : फळं खाणं (Fruits) हे आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी (beneficial for health) असते असे म्हटले जाते. त्यांच्यापासून आपल्याला भरपूर खनिजे आणि जीवनसत्त्वे (vitamins) तसेच कॅलरीज मिळतात. पण फळे खाण्याची योग्य वेळ कोणती याबद्दल बऱ्याच लोकांना शंका असते. फळे कधी खावीत, जेवणापूर्वी की जेवणानंतर, (best time to eat fruits) असा प्रश्न अनेक लोकांना पडतो. आज हा गोंधळ दूर करूया आणि फळे खाण्याची योग्य वेळ कोणती तेही जाणून घेऊया.
जेवणापूर्वी व जेवणानंतर फळं खाण्याचे फायदे व तोटे
जेवणाच्या अर्धा ते एक तास आधी फळे खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र जेवणानंतर फळं खाल्ल्यास अन्नासोबत फळांच्या अतिरिक्त कॅलरीज शरीरातून निघून जातात, ज्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. अन्नासोबत फळं न खाणे आणि जेवल्यानंतरही लगेचं फळांचे सेवन न करणे हे उत्तम ठरते. फळे खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, पण रात्री झोपण्यापूर्वी फळांचे सेवन करू नये.
जेवणानंतर फळं खाल्ल्यास काय नुकसान होते ?
जेवण झाल्यानंतर लगेच फळे न खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. वास्तविक, शरीराने अन्नातून आधीच भरपूर कॅलरीज घेतलेल्या असतात. त्या पचायच्या आधीच जर तुम्ही लगेच पळं खाल्लीतर तर शरीराला अतिरिक्त कॅलरीज सहन करावी लागतात. त्यामुळे पचनसंस्थेवर दुहेरी भार पडतो आणि एकाच वेळी इतक्या कॅलरीज पचू शकत नाहीत. जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या जसे अपचन, पोट फुगणे, ॲसिडिटी, पित्त, आणि बद्धकोष्ठता असा त्रास होण्याची शक्यता निर्माण होते.
खाल्ल्यानंतर लगेच फळे खाण्याचे तोटे
तसं पहायला गेलं तर फळांमध्ये फ्रुक्टोज असते जे लवकर पचते, फळे जेवणानंतर लगेच खाल्ल्यास फ्रुक्टोज लवकर पचते आणि पोटात आधीचे अन्न पचायला खूप त्रास होतो. जेवणानंतर लगेच अन्न खाल्ल्याने शरीरात अनेक प्रकारची विषारी द्रव्ये जमा होतात. त्याचा परिणाम पोटावर तसेच त्वचेवर दिसून येतो.
फळे खाण्याची योग्य वेळ कोणती ?
फळ खाण्यापूर्वी किंवा नंतर जर तुम्ही लगेच जेवणार नसाल तर ती फळं खाण्याची उत्तम वेळ आहे. म्हणजेच दुपारी 10 ते 12 ही फळे खाण्याची योग्य वेळ आहे. यावेळी तुम्ही फळे आरामात खाऊ शकता आणि तुमच्या शरीराला त्यांच्यापासून पूर्ण पोषण मिळेल. फळे संध्याकाळीही खाता येतात, ही वेळ चार ते सात वाजेपर्यंत असू शकते. जर तुम्ही दिवसभरात 11 वाजण्याच्या सुमारास फळे खाल्ले तर तुमची अवेळी लागणारी भूकही शांत होते आणि फळांमधून तुम्हाला भरपूर फायबरही मिळते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.