Health Tips | शिळे अन्न खाताय? सावधान! ‘या’ गंभीर समस्यांचा करावा लागू शकतो सामना…

जेव्हा आपण ताजे अन्न शिजवतो, तेव्हा रूम टेम्प्रेचरवर थंड झाल्यावरच ते फ्रीजमध्ये ठेवतो. ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीव वाढू लागतात.

Health Tips | शिळे अन्न खाताय? सावधान! ‘या’ गंभीर समस्यांचा करावा लागू शकतो सामना...
जेव्हा आपण ताजे अन्न शिजवतो, तेव्हा ते रूम टेम्प्रेचरवर थंड झाल्यावरच ते फ्रीजमध्ये ठेवतो. ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीव वाढू लागतात.
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 2:48 PM

मुंबई : आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये, बहुतेक लोक दिवसभरातून एकदाच दोनवेळचे अन्न शिजवतात जेणेकरून त्यांना पुन्हा पुन्हा स्वयंपाक करावा लागत नाही. बर्‍याच वेळा व्यस्त शेड्यूलमुळे आपण जास्त अन्न शिजवतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवतो आणि नंतर गरम करून पुन्हा एकदा खातो (Leftover food can harm your body and health).

बरेच लोक अन्न फेकण्याची वेळ येऊ नये, उरलेले अन्न खातात. जेणेकरून अन्नाचा अनादर होणार नाही, कारण आजही अनेक लोक भुकेल्या पोटी झोपतात. तर, काहींना बरेच दिवस अन्न पाहण्यास देखील मिळत नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ते अन्न फेकून देणे जीवावर येते. पण, शिळे अन्न खाण्याने आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, याची कल्पना आपल्याला नसते. चला तर, असे शिळे अन्न खाण्यामुळे कोणत्या समस्या उद्भवतात, ते जाणून घेऊया.

शिळ्या अन्नात जीवाणू वाढतात

जेव्हा आपण ताजे अन्न शिजवतो, तेव्हा रूम टेम्प्रेचरवर थंड झाल्यावरच ते फ्रीजमध्ये ठेवतो. ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीव वाढू लागतात. रूम टेम्प्रेचरवर अन्न ठेवल्यानंतर ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया वेगाने तयार होतात, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. शिळे अन्न खाल्ल्याने अपचन, आंबटपणा आणि अन्न विषबाधा होण्याचा धोका देखील वाढतो (Leftover food can harm your body and health).

अन्न विषबाधा होण्याचा धोका

अन्न शिजवल्यानंतर काही तासांतच ते फ्रिजमध्ये ठेवले नाही तर, त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे अन्न खराब होऊ शकते. या हानिकारक बॅक्टेरियांमुळे अन्न विषबाधा अर्थात फूड पॉयझानिंग होण्याचा धोकाही वाढतो. विशेषत: शिळा भात खाऊ नये. कारण काही काळ रूम टेम्प्रेचरवर ठेवल्यानंतर तो भात पुन्हा गरम करून खाल्ल्याने अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो.

अतिसार

जर अन्न विषबाधा वाढली, तर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास देखील वाढतो. यामुळे, शरीर निर्जलीकरण होण्यास सुरुवात होते आणि शरीरात पाण्याचा अभाव निर्माण होऊ शकतो. म्हणून, शिळे अन्न खाण्यापूर्वी आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

कोणत्या ‘शिळ्या’ गोष्टींचे सेवन करू नये?

साग्याच प्रकारचे शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. विशेषत: अंडी, तांदूळ, सीफूड, चिकन आणि प्रक्रिया केलेले तेलकट पदार्थ शिळे खाणे टाळावे. या सर्व गोष्टींमध्ये बॅक्टेरिया पटकन वाढतात. म्हणून, या गोष्टी बर्‍याच दिवसांनंतर खाऊ नयेत.

(टीप : सदर माहिती ही सामान्य संशोधनावर आधारित असून, कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Leftover food can harm your body and health)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.