चेहऱ्यावर लिंबाचा वापर करताय? होतील ‘हे’ गंभीर परिणाम…एकदा नक्की वाचा
Lemon Uses : लिंबू आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतात ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यास मदत होते. तुमच्या आहारामध्ये लिंबाचा समावेश केल्यामुळे अनेक फायदे होतात. अनेकजण चेहऱ्यावर देखील लिंबाचा वापर करतात. परंतु लिंबाचा चेहऱ्यावर डायरेक्ट वापरल्यामुळे तपमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं.
Lemon Skin Care: चेहरा चमकदार करण्यासाठी आणि डागांपासून मुक्ती मिळवण्यासाठी DIY Hacksपासून महागड्या कॉस्मेटिक पर्यंत अनेक प्रकारचे फेशियल देखील केले जातात. परंतु जास्त प्रमाणार रसायनिक कॉस्मेटिक्सचा वापर केल्यामुळे तुमचा चेहरा खराब होऊ शकतो. अनेकजण चमकदार त्वचा मिळवण्यासाठी स्वयंपाकघरातील काही पदार्थ वापरतात. चमकदार त्वचा मिळवण्यासाठी सर्वात जास्त प्रमाणात लिंबाचा वापर केला जातो. लिंबू तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग निघून जाण्यास मदत होते.
लिंबू तुमच्या त्वचेसह आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो. लिंबाचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत करतात. अनेकजण चेहऱ्यावर अनेक प्रकारचे फेस पॅक लावतात ज्यामुळे तुमच्या पिंपल्सच्या समस्या दूर होण्यास मदत होते. फेस पॅकमध्ये लिंबूचा वापर केला जातो. लिंबाचा तुमच्या चेहऱ्यावर खुप चांगला रिजल्ट मिळतो. परंतु चेहऱ्यावर लिंबाचा वापर करताना काही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. लिंबू तुमच्या चेहऱ्यावर कधीच डायरेक्ट लावू नका. यामुळे तुमच्या चेहऱ्याला भरपूर प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
लिंबू तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ब्लीचिंगचे काम करते आणि त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. लिंबूच्या ऍसिडिक गुणधर्मांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सवर त्याचा परिणाम दिसून येतो. लिंबू डायरेक्ट चहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेवर बारिक पुरळ येऊ शकतात. चेहऱ्यावरील बारिक पुरळमुळे त्वचेवर खाज येणे जळजळ होणे आणि लालसरपणा यांच्या सारख्या समस्या उद्भवतात. अशा समस्या उद्भवल्यास तुमच्या चेहऱ्यावर बेसन, मुलतानी माती, ग्लिसरीन, खोबरेल तेल, कोरफड जेल हे घटक तुमच्या चेहऱ्यावर लावा. अनेक लोकांची त्वचा संवेदनशील असते अशा लोकांनी चेहऱ्यावर लिंबू लावणे टाळावे. संवेदनशील त्वचेवर लिंबाचा वापर केल्यामुळे त्वचेवर सूज, लालसरपणा आणि बारिक पुरळ येते.
चेहऱ्यावर लिंबाचा वापर केल्यामुळे तुमची त्वचा संवेदनशील बनते. संवेदनशील त्वचा सुर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे तुम्हाला सनवर्न सारख्या समस्या होऊ शकतात. लिंबाचा चेहऱ्यावर जास्त प्रमाणात वापर केल्यामुळ तुम्हाला हायपरपिग्मेंटेशनच्या समस्या होऊ शकतात. लिंबू खूप अम्लीय पदार्थ आहे. ज्यामुळे लिंबाचा वापर तुमच्या चेहऱ्यावर लावल्यामुळे तुमच्या त्वचेच्या पिएचचे संतुलन बिघडते. लिंबाचा जास्त प्रमाणात चेहऱ्यावर वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेची लवचिकता करी होते आणि जास्त प्रमाणात सुरुकुत्या पडतात. लिंबाचा जास्त प्रमाणात वापर केल्यास मुरुमांची समस्या वाढते आणि मुरुमांमुळे चेहऱ्यावर डाग देखील वाढतात. डागांमुळे तुमचा चेहरा काळपट आणि ड्राय होतो.