रिलेशनशीपमध्ये या 4 गोष्टी हव्यातच… चौथी गोष्ट सर्वात महत्त्वाची; नाही तर…
लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये संवाद आणि विश्वास अतिशय महत्त्वाचे आहेत. नियमित संवाद साधणे, गैरसमज टाळणे आणि सरप्राईज भेटींचे नियोजन करणे हे संबंध मजबूत करण्यास मदत करते.

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये अचानक गरज असताना आपला जोडीदार सोबत नसतो. तो अचानक आपल्यापासून दूर जातो. त्यामुळे एकाकीपण वाढते. त्यामुळे आपसात संवाद आणि समज कायम ठेवणं महत्वाचं आहे. ही समज कशी ठेवायची? हे अनेकांना माहीत नसतं. संबंध सुमधूर ठेण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. काही गोष्टी टाळल्या तर संबंध अधिक मजबूत होतात. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा विश्वास. तुमचा विश्वास एकमेकांवर असणं हे नातं दृढ करण्यास उपकारक ठरतं.
संवाद ठेवा
लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये संवाद साधणं एकमेव सोपा मार्ग असतो. संवाद साधण्याची संधी न मिळाल्यास, दिवसभर इतर कोणत्याही मार्गाने संवाद साधा. पण आपल्या प्रिय व्यक्तीशी संध्याकाळी किमान एकदा बोलण्याचा सर्वोत्तम पर्याय ठेवा. आता तर सर्व लोक डिजिटली एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. पर्याय बरेच आहेत. त्यामुळे व्हर्च्युअल संवाद खूप महत्वाचा आहे.
चूक समजून घ्या
एकमेकांपासून दूर असल्यास चूक समजून न घेण्याची शक्यता खूप वाढते. छोट्या छोट्या मुद्द्यांवर समज आणि गैरसमज होत असतात. फोन उचलू शकले नाही, मेसेजला उत्तर देऊ शकले नाही, अशा कारणांमुळे गैरसमज वाढण्याची दाट शक्यता असते. असे होऊ नये यासाठी खबरदारी घ्या. एकमेकांच्या चुका समजून घ्या आणि त्या चूका टाळा. एकमेकांबद्दलची काळजी असणं स्वाभाविक आहे. पण ही काळजी अधिक वाढेल आणि ती वादाचं कारण बनणार नाही याची काळजी घ्या.
भेट घ्या
प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी प्लान करता येतो. पण कधी तरी एक Surprise Visit करा. आपल्या जोडीदाराला आश्चर्य वाटेल आणि तिचा आनंद द्विगुणीत होईल अशी योजना तयार करा. यामुळे जोडीदारही आनंदित होतील आणि संबंधही अधिक मजबूत होतील.
इतरांची गोष्ट महत्त्वाची नाही
जोडीदार प्रत्यक्ष समोर नसेल आणि तिसरी व्यक्ती काही तरी सांगत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. खात्री करून घ्या, मगच विश्वास ठेवा. हवं तर प्रिय व्यक्तीला थेट त्याबाबत विचारून गैरसमज दूर करा. पण इतरांच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे तुमचे संबंध खराब होऊ शकतात. एक चूक महागात पडू शकते.