Military Diet | केवळ तीन दिवसात वजन कमी करा, जाणून घ्या मिलिटरी डाएट प्लानबाबत

Military Diet | केवळ तीन दिवसात वजन कमी करा, जाणून घ्या मिलिटरी डाएट प्लानबाबत (lose weight in just three days with a military diet)

Military Diet | केवळ तीन दिवसात वजन कमी करा, जाणून घ्या मिलिटरी डाएट प्लानबाबत
केवळ तीन दिवसात वजन कमी करा
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 4:26 PM

मुंबई : हल्ली प्रत्येक जण आपल्या आरोग्याबाबत आणि डाएटबाबत जागृक असतो. आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही डाएट प्लान फॉलो करीत असतो. तर काही जण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाईजचा सहारा घेतात. मात्र यातून मनासारखे परिणाम दिसू येतातच असे नाही. पण आम्ही तुम्हाला अशा डाएट प्लानबाबत सांगणार आहोत जो फॉलो केल्यानंतर एका आठवड्यात तुम्ही साडेचार किलो वजन कमी करु शकता. या डाएट प्लानला मिलिटरी डाएटच्या नावाने ओळखले जाते. (lose weight in just three days with a military diet)

काय आहे मिलिटरी डाएट?

मिलिटरी डाएट हे एका अनुभवी न्यूट्रिशियनिस्टने तयार केले आहे. कमी वेळेत वजन कमी करता यावे यासाठी हे खासकरुन देशाच्या सैन्य दलासाठी तयार करण्यात आले आहे. म्हणून याला मिलिटरी डाएट, नेव्ही डाएट, आर्मी डाएट किंवा आईस्क्रीम डाएट ही संबोधले जाते. या डाएटची खासियत ही आहे की, या डाएटमध्ये कोणत्याही महागड्या सप्लीमेंट किंवा खाद्यसामग्रीचा समावेश नाही. उलट हे डाएट कोणीही व्यक्ती खरेदी करु शकते असे परवणारे असून कमी कालावधीत वजन कमी करता येते.

काय आहे डाएट पॅटर्न?

वजन कमी करण्यासाठी डाएट सर्वात महत्वपूर्ण असते. हे मिलिटरी डाएट वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात आले आहे. या डाएटमध्ये आठवड्यातील तीन दिवस कमी कॅलरी असलेले हेल्दी फूड खायचे आहे. तर उरलेले चार दिवस डाएटचे पालन करायचे नाही. जोपर्यंत तुमचे वजन कमी करण्याचे लक्ष्य पूर्ण होत नाही तोपर्यंत हे डाएट फॉलो करायचे आहे.

डाएटची खास बात

या डाएटची खास बात ही आहे की, हे शरीरातील फॅट जाळण्याचे काम करते आणि मेटाबॉलिज्मला किकस्टार्ट करते. यामध्ये वजन सहजरीत्या कमी होते. पण जेव्हा तुम्ही चार दिवस डाएट ऑफ वर असाल तेव्हा तुम्हाला केवळ 1300 ते 1500 कॅलरीजपर्यंत सेवन करायचे आहे. यामध्ये तुम्हाला काही भाज्या डाएटमध्ये ठेवायच्या आहेत, तसेच प्रोटिनकडेही लक्ष द्यायचे आहे. याशिवाय वजन कमी होण्यास अडचण होऊ नये म्हणून कार्ब्सची मात्रा अतिशय कमी असली पाहिजे.

शीतपेय टाळा

जर तुम्ही हे डाएट फॉलो करीत असाल तर तुम्हाला कोल्ड ड्रिंक, फ्रुटी सारखी अन्य शीतपेयांचे सेवन करणे टाळले पाहिजे. या शीतपेयात रिफाईन शुगरचा वापर केला जातो. याऐवजी तुम्हाला अधिकाधिक पाण्याचे सेवन करायचे आहे.

कसा आहे तीन दिवसाचा डाएट प्लान?

तीन दिवसाचा डाएट प्लान काटेकोरपणे बनवण्यात आला आहे. त्यामुळे याव्यतिरिक्त अधिक खाणे तुमच्या डाएटवर नकारात्मक परिणाम करु शकते. यासाठी खाली दिलेल्या डाएटचे पालन करा.

पहिला दिवस नाश्ता – 1/2 किलो द्राक्षे, 1 टोस्ट स्लाईस, 2 चमचे पीनट बटर आणि विदाऊट शुगर चहा किंवा कॉफी लंच – 1/2 कप फिश, 1 टोस्ट स्लाईस, कॉफी किंवा चहा डिनर – मांसाचे 2 तुकडे, 1 कप हिरव्या शेंगा, अर्धे केळे, 1 छोटे सफरचंद आणि 1 कप व्हॅनिला आईस्क्रीम

दुसरा दिवस नाश्ता – 1 अंडे, 1 टोस्ट स्लाईस, अर्धे केळे लंच – 1 कप कॉटेज चीज किंवा 1 स्लाईस चेडर चीज, 1 उकडलेले अंडे, 5 सॉल्टेट क्रॅकर्स डिनर – 2 हॉट डॉग, 1 कप ब्रोकली, 1/2 कप गाजर, अर्धे केळे आणि 1/2 कप व्हॅनिला आईस्क्रीम

तिसरा दिवस नाश्ता – 5 सोडा क्रॅकर्स, 1 स्लाईस चेडर चीज, एक छोटे सफरचंद लंच – एक उकडलेले अंडे, 1 टोस्ट स्लाईस डिनर – 1 कप फिश, अर्धे केळे, 1 कप व्हॅनिला आईस्क्रीम

जर तुम्ही शाकाहारी असाल तर टोफू, सुका मेवा, लेटिन्स टोफू चीजचे सेवन करु शकता. याशिवाय सोया आईस्क्रीम चीजचेही सेवन करु शकता.

एक्सरसाईज किती करावी?

हे डाएट कमी कॅलरीजवर आधारीत आहे. जर तुम्ही हे डाएट फॉलो करीत असाल तर केवळ 20 मिनिटे चालणे पुरे आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त अन्य काही एक्सरसाईज जरुरी नाही. मात्र हे डाएट फॉलो करताना तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमी असू शकते ज्यामुळे तुम्हाला कमजोरी येऊ शकते. त्यामुळे हे डाएट फॉलो करण्याआधी तुमच्या न्यूट्रिशियनचा सल्ला अवश्य घ्या. (lose weight in just three days with a military diet)

संबंधित बातम्या

Migraine Neck Pain । मानेपर्यंत पोहोचू शकतात मायग्रेनच्या वेदना, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Life without Organs : ‘या’ अवयवांशिवायही जगू शकतो मनुष्य, जाणून घ्या या मागचे रहस्य…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.