एका मिठीतून कळेल तुमचा पार्टनर कसा? मिठीचे हे प्रकार माहीत आहेत का?

तुमच्या जोडीदाराची मिठी तुमच्या नात्याबद्दल बरेच काही सांगू शकते. खांद्यावरची मिठी मैत्रीपूर्ण असू शकते, तर घट्ट मिठी प्रेमाची आणि सुरक्षेची भावना दर्शवते. पण जर मिठी तुम्हाला अस्वस्थ करत असेल तर तुमच्या नात्यात विश्वासाचा अभाव असू शकतो. तुमच्या भावनांच्या आदान-प्रदानाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

एका मिठीतून कळेल तुमचा पार्टनर कसा? मिठीचे हे प्रकार माहीत आहेत का?
Follow us
| Updated on: Dec 21, 2024 | 11:53 AM

तुम्ही प्रेमात असता. प्रेमात कधी आनंदाचे तर कधी कुरबुरीचे क्षण वाट्याला येतात. आनंदाच्या क्षणी तुम्हाला कसलीच जाणीव होत नाही. पण कुरबुर झाली किंवा थोडं काही बिनसलं तर मात्र आपल्याला एकटं वाटतं. आपला पार्टनर योग्य तर नाही ना? आपली निवड चुकली तर नाही ना? लग्नानंतर आयुष्यभर वाट्याला हेच येणार आहे का? असे असंख्य प्रश्न मनात येतात. त्यामुळे रिलेशनशीपमध्ये असताना आपला पार्टनर कसा आहे? त्याची माहिती असली पाहिजे. तुमचा पार्टनर तुम्हाला कशा पद्धतीने मिठी मारतो यावरूनही तुम्ही त्याच्या स्वभावाविषयी जाणून घेऊ शकता. तुम्हाला याच संदर्भात काही टिप्स देत आहोत.

कधी कधी पार्टनरचा राग येतो. तेव्हा हे नातं जसं होतं तसं नाही, असं प्रकर्षाने जाणवू लागतं. पण त्या रागाच्या पलिकडे, जर तुमच्या पार्टनरने तुम्हाला घट्ट आणि मनापासून मिठी दिली तर तुमचा राग लवकर निघून जाईल. परंतु तुमच्या नात्यात थोडीही शंका असल्यास, त्या मिठीच्या प्रकारावर लक्ष ठेवा.

तर शंका नको

तुम्हाला जोडीदाराने खांद्यापासून मिठी मारली तर शंका घेण्यात अर्थ नाही. ते योग्य ठरणार नाही. ही मिठी एका मित्रासारखी असू शकते. हे नातं सहजपणे समजून घेतलं पाहिजे. मनात विनाकारण कोणताही विचार आणायचा नाही.

हृदयापासून अलिंगन

तुमचा पार्टनर जर तुम्हाला चोहोबाजूने पकडून मिठी मारत असेल, ती मिठी हृदयापासून असेल तर हा प्रकार अधिक काळजी करणारा आहे असं समजा. तुम्हाला जपणारा आहे, असं समजा. तुमचा जोडीदार तुम्हाला नेहमीच आदर देईल आणि तुमच्या भावना समजून घेईल, असा त्याचा अर्थ होतो.

गुपचूप मिठी

जर तुमचा जोडीदार तुमच्या पाठी चुपचाप येऊन तुम्हाला घट्ट अलिंगन देत असेल तर याचा अर्थ असा की, तो तुमच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी नेहमीच तयार आहे.

कठोर मिठी

जर तुमचा जोडीदार तुम्हाला कठोरपणे मिठी मारत असेल आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रेमाची गोड भावना असेल तर तो तुम्हाला नेहमीच सहकार्य देईल. तुमच्यासोबत दीर्घकाळ राहील.

मिठीला घाबरत असाल तर…

परंतु, जर तुम्ही त्याच्या मिठीला घाबरत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की शंका घेण्याची गरज आहे, तर याचा अर्थ कदाचित तुमच्या नात्यातील सुरक्षा किंवा विश्वास कमकुवत आहे. असे नाते असलेल्या व्यक्तींनी आपल्या भावनांवर प्रेमाचा विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाच्या प्रेम व्यक्त करण्याचा एक वेगळा मार्ग असतो. जास्त भावनांच्या आदान-प्रदानातल्या अंतरावर लक्ष ठेवून तुम्हाला तुमच्या नात्याचा गंभीरतेचा अंदाज येतो.

संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.