Mahashivaratri 2021 | महादेवाचे असे मंदिर जिथले शिवलिंग मूळ जागेवरून पुढे सरकते, वाचा या मंदिराचे अद्भुत किस्से…

| Updated on: Mar 09, 2021 | 1:46 PM

या मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला हे शिवलिंग अगदी दारांना खेटून जवळच दिसेल,  जणू त्या शिवलिंगाला मंदिराचा दरवाजा पारच करायचा असावा.

Mahashivaratri 2021 | महादेवाचे असे मंदिर जिथले शिवलिंग मूळ जागेवरून पुढे सरकते, वाचा या मंदिराचे अद्भुत किस्से...
वनैश्वर मंदिर
Follow us on

मुंबई : शास्त्रात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतांना अर्पण केला आहे. सोमवार हा दिवस महादेवाच्या पूजेसाठी उत्तम मानला जातो. सोमवारी महादेवाचे भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी व्रत-उपवास ठेवतात आणि पूजापाठ करतात. महाशिवरात्री आणि सोमवार अर्थात महादेवाला अर्पित या दिवसाच्या निमित्ताने आपण अशाच एका महादेवाच्या मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे किस्से ऐकून सगळ्यानांच आश्चर्य वाटेल…(Mahashivaratri 2021 special story of vanaishwar temple shivling moves from actual place)

महादेवाचे हे अद्भुत मंदिर उत्तर प्रदेशमधील मैनपुरी शहरात असून, ‘वनेश्वर’ असे या मंदिराचे नाव आहे. हे मंदिर जुन्या मैनपुरीला लागून असलेल्या नगरियामध्ये आहे. हे दिसायला एक छोटेसे मंदिर आहे, परंतु ते खूप जुने आहे. तसेच, इथल्या कथा बर्‍याच रंजक आणि आश्चर्यकारक आहेत. या गावाचे नाव नगरिया असल्याने  या मंदिराला ‘नगरिया मंदिर’ म्हणून देखील ओळखले जाते. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि सर्व भाविक येथे महादेवाची पूजा करण्यासाठी येतात.

इथले शिवलिंग मूळ जागेवरुन पुढे सरकते!

असे बोलले जाते की, येथील शिवलिंग दरवर्षी आपल्या ठिकाणाहून थोडासा पुढे सरकतो. जर तुम्ही या मंदिरात पाऊल ठेवले तर मंदिरात प्रवेश करताच तुम्हालाही असे दृश्य दिसेल जे सहसा इतर शिव मंदिरांमध्ये दिसणार नाही. बऱ्याच मंदिरात तुम्ही शिवलिंगास घंटेच्या किंवा पाण्याच्या धारेखाली पाहिले असेल, पण वनेश्वर मंदिरातील शिवलिंग या पाण्याच्या कलशापासून सुमारे दोन फूट अंतरावर आहे.

मंदिराच्या दाराच्या अगदी जवळ आहे शिवलिंग

या मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला हे शिवलिंग अगदी दारांना खेटून जवळच दिसेल,  जणू त्या शिवलिंगाला मंदिराचा दरवाजा पारच करायचा असावा. विशेष म्हणजे हे शिवलिंग पाहणे अजिबात सामान्य नाही, या शिवलिंगाच्या मध्यभागी एक जाड खोक आहे, जणू एखाद्याने या शिवलिंगावर धारदार वस्तूने प्रहार केला असावा (Mahashivaratri 2021 special story of vanaishwar temple shivling moves from actual place).

शिवलिंग सरकण्याचे ‘हे’ कारण

या मंदिरातील शिवलिंग सरकल्यामुळे सुमारे पन्नास ते साठ वर्षांपूर्वी गावात एकदा दुष्काळ होता असे मंदिरातील लोकांचे मत आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी पाऊस पडावा म्हणून शिवाची पूजा केली. पण, पाऊस पडला नाही. एके दिवशी मंदिराचे संतप्त पुजारी भोंगदानंद यांनी शिवलिंगावर कुऱ्हाडीने वार केला. असे म्हणतात की, शिवलिंगावर असलेली जाड खोक त्याच कुऱ्हाडीच्या हल्ल्याचा पुरावा आहे. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की, ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवसापासून हे शिवलिंग दरवर्षी आपल्या जागेवरुन पुढे जाऊ लागले.

‘या’ भीतीने घाबरतात लोक

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, एकावेळी ते शिवलिंग मंदिराच्या दाराच्या इतके जवळ आले आहे की, आता ते लवकरच मंदिरा बाहेर येईल असे वाटले. हे दृश्य पाहिल्यानंतर तेथील लोकही घाबरून गेले होते. परंतु काही वेळाने शिवलिंग पुन्हा आत गेले. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, ज्या दिवशी हे शिवलिंग दाराबाहेर येईल, त्या दिवशी जगाचा सर्वनाश निश्चित आहे.

कोणतीही इच्छा 40 दिवसात पूर्ण होते!

वैनेश्वर मंदिराबद्दल असेही म्हटले जाते की, या मंदिरात, जो भक्त सतत 40 दिवस शिवलिंगाला जल अर्पण करण्याचा संकल्प करतो आणि तो पूर्ण करतो, त्याची इच्छा नक्कीच पूर्ण होते. तथापि, त्या 40 दिवसांत, महादेव आपल्या भक्ताची कठोर परीक्षा घेतात आणि यावेळी त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. परंतु, जर भक्ताने ही परीक्षा पार केली आणि महादेवांवर जलाभिषेकाचा संकल्प पूर्ण केला, तर त्याला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याची अशक्य कामे देखील पूर्ण होतात.

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)

(Mahashivaratri 2021 special story of vanaishwar temple shivling moves from actual place)

हेही वाचा :

शनैश्चरी अमावस्या : शनिच्या साडेसातीने त्रस्त आहात?, ‘हे’ उपाय करा, दूर होतील सर्व समस्या