आजच ट्राय करा, मुलांसाठी परफेक्ट चविष्ट आणि झटपट मॅकरोनी रेसिपी !
मुलांना काही वेगळं आणि टेस्टी बनवायचं आहे का? तर आजच ट्राय करा या ३ सोप्या आणि चविष्ट मॅकरोनी रेसिपी! ही रेसिपी मुलांच्या आवडीची असून ती तयार करणे खूप सोप्पं आहे. ताज्या घटकांसह साजलेली ही पास्ता रेसिपी मुलांच्या आहारासाठी परफेक्ट आहे.

मुलांना मॅकरोनी खूप आवडतो, आणि ते बनवणं खूप सोप्पं आहे. या डिशमध्ये तुमच्या आवडीनुसार मसाले आणि टॉपिंग्स जोडून तुम्ही ती आणखी स्वादिष्ट आणि खास बनवू शकता. तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी काही टेस्टी, वेगळं पण झटपट बनवू इच्छिता, तर मॅकरोनीच्या या ३ रेसिपी नक्की ट्राय करा
1. बेसिक बटर मॅकरोनी
साहित्य: मॅकरोनी, बटर, मीठ, काळी मिरी, चिली फ्लेक्स (ऐच्छिक)
कृती:




एका पातेल्यात पाणी उकळा आणि त्यात मॅकरोनी आणि मीठ घाला. मॅकरोनी उकडून गाळून घ्या.
एका पॅन मध्ये बटर गरम करा आणि त्यात उकडलेली मॅकरोनी घाला.
त्यात मीठ, काळी मिरी आणि चिली फ्लेक्स घालून हलवा.
गरमागरम सर्व करा! मुलं त्याला आवडीने खातील.
2. पनीर मॅकरोनी
साहित्य: मॅकरोनी, पनीर (तुकड्यांमध्ये), टमाटो सॉस, कॅप्सिकम, आलं-लसूण पेस्ट, मसाले
कृती:
मॅकरोनी उकळून गाळून घ्या.
एका पॅन मध्ये तूप गरम करा, त्यात आलं-लसूण पेस्ट आणि कॅप्सिकम परतून घ्या.
त्यात टमाटो सॉस आणि मसाले घाला.
आता त्यात पनीर आणि उकडलेली मॅकरोनी घालून चांगलं मिसळा.
गरम गरम सर्व करा. मुलांना नक्की आवडेल.
3. व्हेज मॅकरोनी
साहित्य: मॅकरोनी, गाजर, मटार, मक्का, ब्रोकोली, टमाटो सॉस, मसाले
कृती:
मॅकरोनी उकळा आणि गाळून ठेवा.
एका पॅन मध्ये थोडं तेल गरम करा, त्यात गाजर, मटार, मक्का आणि ब्रोकोली घालून परतून घ्या.
त्यात टमाटो सॉस आणि आवडीनुसार मसाले घाला.
उकडलेली मॅकरोनी घालून चांगलं मिसळा.
मुलांना व्हेजीटेबल्स आणि मॅकरोनीचा उत्तम कॉम्बिनेशन नक्की आवडेल!