Travel | पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘या’ राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदाच सायकल सफारी! तुम्हीही घेऊ शकता आनंद…

सायकल सफारीच्या पहिल्या टप्प्यात, 12 पर्यटकांना घनदाट जंगलात आत फिरण्याची आणि ऑफबीट ट्रॅक एक्सप्लोर करण्याची संधी मिळणार आहे.

Travel | पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘या’ राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदाच सायकल सफारी! तुम्हीही घेऊ शकता आनंद...
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 6:19 PM

मुंबई : भारतातच नव्हे तर, जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. भारतात सध्या ही परिस्थिती आटोक्यात आल्याने पुन्हा एका जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, या साथीने सगळ्याच क्षेत्राचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर, देशातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजनांवर सध्या काम केले जात आहे. ज्या लोकांना नैसर्गिक सौंदर्य आवडते त्यांना सहसा जंगल, राष्ट्रीय उद्यान, डोंगरांमध्ये फिरायला आवडते. हीच बाब लक्षात घेऊन, पर्यटकांसाठी प्रथमच राष्ट्रीय उद्यानात सायकल सफारी सुरू केली जात आहे. आसामच्या ‘मानस नॅशनल पार्क’मध्ये पर्यटक सायकल सफारीचा आनंद घेऊ शकणार आहेत (Manas national park in assam launch cycle safari for tourist).

सायकल सफारीच्या पहिल्या टप्प्यात, 12 पर्यटकांना घनदाट जंगलात आत फिरण्याची आणि ऑफबीट ट्रॅक एक्सप्लोर करण्याची संधी मिळणार आहे. या विषयी बोलताना मानस उद्यानाचे संरक्षक अमल शर्मा म्हणतात की, ‘हा एक प्रयत्न आहे जेणेकरुन कोरोनाच्या साथीनंतर अधिकाधिक पर्यटकांनी येथे भेट द्यावी. या एका यशस्वी पावलाने पर्यटनाला चालना मिळेल.’

पूर्वीही असायची जंगल सफारी

ते म्हणाले की, पूर्वी उद्यानात रात्रीची सफारी असायची, जी नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याविरोधात निर्णय दिल्यानंतर थांबवली गेली. मानस राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोने जाहीर केलेली हेरिटेज साईट आहे. हा एक व्याघ्र प्रकल्प आहे आणि 2837 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. हे उद्यान 2 ऑक्टोबर 2020 पासून पर्यटकांसाठी उघडले गेले आहे (Manas national park in assam launch cycle safari for tourist).

मानस बांसबाडी परिसराबाबत अलकेश दास म्हणाले की, येथील स्थानिक लोक, विशेषत: बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल (बीटीसी) अंतर्गत येतात. ते म्हणाले की, शिलाँग आणि भूतान सारखी लोकप्रिय पर्यटन स्थळे साथीच्या रोगामुळे पर्यटकांसाठी बंद असल्याने लोक जवळपासची ठिकाणे शोधण्यास उत्सुक होते. पुढे ते म्हणाळे की, सध्या गर्दी इतकी वाढली की, जानेवारीत अधिकाऱ्यांना वाहन मर्यादा 175 पर्यंत ठेवावी लागली होती.

ग्लोबल कन्झर्वेशन एक्सलन्स अ‍ॅवॉर्डने सन्मानित!

याचबरोबर मानस व्याघ्र प्रकल्पाचे विशेष अधिकारी धरणी धर बोरो म्हणाले की, मानस आणि त्याच्या संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी एक प्रकारे 2020 हे भाग्याचे वर्ष ठरले आहे. मानस प्रकल्पाला ग्लोबल टायगर फोरम कडून ग्लोबल कन्झर्वेशन एक्सलन्स अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. मानस आणि भूतानचा रॉयल मानस यांना संयुक्तपणे सन्मानित करण्यात आले आहे. ते म्हणाले की, ‘मानस हा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी झाला, कारण इथल्या वाघांची संख्या एका वर्षात तब्बल तिप्पट झाली आहे, जी निकषांनुसार ती केवळ दुप्पट होणे गरजेचे असते.’

(Manas national park in assam launch cycle safari for tourist)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.