दोघात तिसरा नकोय? मग या गोष्टी लक्षात ठेवा, नाही तर…

लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पे आहे. या लेखात आपण लग्नजीवनात विश्वासघाताचे कारणे आणि त्यावर मात कशी करावी हे पाहू. जोडीदाराच्या चुका शांततेने समजावून घेणे, त्यांची मदत करणे, त्यांच्याबरोबर उभे राहणे आणि समस्या शांततेने सोडवण्याचे मार्ग यावर भर दिला जाईल. विश्वास, आदर आणि संवाद हे एक मजबूत नातं निर्माण करण्याच्या मुलाधार आहेत.

दोघात तिसरा नकोय? मग या गोष्टी लक्षात ठेवा, नाही तर...
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 1:47 PM

लग्न ही एक माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. लग्नापासून त्याच्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू होते. लग्न म्हणजे केवळ एक नातं नाही, तर सहजीवनाचं एक बंधनही आहे. लग्न झाल्यानंतर दाम्पत्य एकमेकांना समजून घेत असतात. न सांगता एकमेकांची काळजी घेत असतात. एकमेकांच्या गरजा लक्षात घेत असतात. आदर राखणं हा देखील त्यामागचा एक पर्याय आहे. म्हणूनच लग्न या घटकाला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. लग्नाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. विश्वासावर अनेक गोष्टी घडत असतात. त्यामुळेच दोघांनीही एकमेकांना साथ द्यायची असते. एकमेकांना दगा द्यायचा नसतो.

लग्नानंतर आपण अनेकांचे विवाहबाह्य संबंध झाल्याचेही ऐकतो. दोघांमध्ये तिसरा किंवा तिसरी येत असते. त्यामुळे प्रकरण हाताबाहेर जातं. घटस्फोटापर्यंत येतं. संसार उद्ध्वस्त होतो. अशावेळी दोघांनीही सामंजस्याने राहिलं पाहिजे. दोघांनीही एक पाऊल मागे टाकून दोन पावलं पुढे टाकले पाहिजे. नात्यातील विश्वास घट्ट ठेवून तिसरी व्यक्ती आयुष्यात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जर तुमच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती येऊ द्यायची नसेल तर काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

जोडीदाराच्या चुका समजावून द्या

हे सुद्धा वाचा

तुमच्या जोडीदाराला त्याच्या चुका सांगणे आणि त्याला समजून घेणे या गोष्टी नात्याला बळकट करतात. जोडीदाराचे संरक्षण करण्यापूर्वी दुसऱ्या व्यक्तीच्या गोष्टी नीट ऐका. तुमच्या जोडीदाराला विश्वासात घेऊन एकांतात त्याच्या चुका समजावून द्या आणि त्याला चूक आणि बरोबर याची माहिती द्या. दुसऱ्यांसमोर जोडीदारावर आरोप करणे, केवळ त्याचा अपमान करणे, यामुळे तुमच्या नात्यावर देखील परिणाम होतो.

जोडीदाराची मदत घ्या

नात्यात काही मर्यादा ठेवल्या पाहिजे. जोडीदाराचा वारंवार अपमान करू नका. इतरांसमोर कमीपणा येईल असं बोलू नका. दोघांनी आपआपल्या मर्यादा पाळल्या पाहिजे. नात्यातील एक पुसटशी सीमारेषा असते, ती पाळली पाहिजे. तिचं उल्लंघन होता कामा नये. तुमचे सर्व निर्णय आणि योजना फक्त तुमच्या जोडीदाराच्या मदतीने पूर्ण करा. यामुळे तुमच्या दोघांच्या मनात प्रेम, सहानुभूती आणि आदर निर्माण होईल.

जोड़ीदारासोबत राहा

उघडपणे जोडीदाराच्या बाजूने उभे राहताना त्याच्या चुका त्याला खासगीत सांगा. दुसऱ्यांच्यासमोर त्यांना ओरडू नका, त्यांना कमीपणा वाटेल असं काही करू नका. तुमच्या नात्यात गोडवा कसा टिकून राहील याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराव जर कोणी खोटा आरोप करत असेल, तर त्या वेळी तुमच्या जोडीदाराच्या बाजूने उभे राहा. तुमच्या मनात शंका वाढवू देऊ नका.

शांततेत मार्ग काढा

समस्या समजून घेण्यासोबतच शांतपणे तिला सोडवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पक्षांना शांततेत ऐकून, तुमच्या जोडीदाराला समजून घेतल्यावर त्याला क्लिष्ट परिस्थितीमधून बाहेर काढा. तुमच्या जोडीदारापासून काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नका आणि त्याच्याशी प्रामाणिक राहा. तुमच्या जोडीदाराला हे जाणवून द्या की तुम्ही प्रत्येक क्षणी त्याच्यासोबत आहात. यामुळे जीवनातील समस्या आणि द्विधा परिस्थिती सोडवण्यात मदत मिळते.

नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?.
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?.
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.