विवाहित महिलांनी चुकूनही करू नये ‘हे’ काम , अन्यथा….!

शास्त्रानुसार विवाहित महिलांसाठी अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यांच्या उल्लंघनाचा थेट परिणाम त्यांच्या पतीच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे काही नियमांनुसार महिलांनी त्यांच्या सौभाग्याची खूण सुरक्षित ठेवावी. विवाहित महिलांना काही वस्तू दान करताना या गोष्टींचा विचार केला पाहिजे.

विवाहित महिलांनी चुकूनही करू नये 'हे' काम , अन्यथा....!
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 5:09 PM

लग्नानंतर महिलांच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. जबाबदारी, नवीन नाती, घर या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. त्याचबरोबर लग्नानंतर मुलींना साज-शृंगार करण्याची मान्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत अनेक स्त्रिया नोकरी करतात. त्यामुळे अनेक महिला जीवनशैलीनुसार तयार होत असतात म्हणून साज- शृंगार करणे कठीण झाले आहे. पण लग्नानंतर अश्या काही गोष्टी आहे ज्याचे पालन केले पाहिजे. तसेच आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार विवाहित महिलांसाठी त्यांच्या सौभाग्याची खूण असलेले त्यांचे शृंगार याला खूप महत्त्व आहे. तेवढेच शृंगारचे उल्लंघन झाल्यास त्यांचा परिणाम पतीच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे काही नियमांनुसार महिलांनी त्यांच्या सौभाग्य असलेल्या वस्तूंचे संरक्षण करावे. त्यात विवाहित महिलांना शृंगाराच्या वस्तू दान करताना काही गोष्टी लक्षात ठेवणंही खूप गरजेचं आहे.

त्यात हिंदू धर्मग्रंथांनुसार विवाहित महिलांना देवीचे रूप मानले जाते. लग्नानंतर महिलेचे भवितव्य तिच्या पतीशी निगडित असते. पण कधी कधी त्या काही चुका करतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या पती वर आणि सासू-सासऱ्यांवर होतो, तर चला जाणून घेऊया विवाहित महिलांनी कोणत्या गोष्टींबद्दल सावध गिरी बाळगली पाहिजे.

सिंदूर

हिंदू धर्मग्रंथांनुसार सिंदूर हे प्रत्येक स्त्रीसाठी पहिले शृंगार आहे. अशा वेळी प्रत्येक स्त्रीने त्यांचा आदर केला पाहिजे. कारण सिंदूर हे शुद्धतेशी जोडलेला असते. त्यामुळे आंघोळ केल्याशिवाय सिंदूर लावू नका. तसे न केल्यास पतीच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

मंगलसूत्र

विवाहित महिलांनी आपले मंगळसूत्र अतिशय काळजीपूर्वक वापरवावे . कारण सौभाग्याचं खूण म्हणून मंगळसूत्राला देखील खूप महत्वाचे स्थान आहे , त्यामुळे ते कधीही तुम्ही कारणास्तव काढाल तर योग्य ठिकाणी ठेवा. जर तुम्ही कोणत्याही अयोग्य ठिकाणी मंगळसूत्र ठेवल्यास पतीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

लाल रंगाचे अजिबात दान करू नका

आपल्या हिंदू धर्मात दान करणे खूप शुभ मानले जाते, मात्र विवाहित महिलांनी कोणत्याही विधवा स्त्रीला लाल रंगाची साडी, बांगड्या किंवा इतर लाल रंगाच्या वस्तू दान करू नका. असे केल्याने तुमच्या नात्यात अडचणी येऊ शकतात.

कुंकवाचा करंडा रिकामा ठेवू नका

विवाहित महिलांनी नेहमी त्यांचा कुंकवाचा करंडा कधीही रिकामा राहणार नाही याची काळजी घ्यावी. असे करणे हिंदू धर्मग्रंथांमध्ये अपशकुन मानले जाते. यामुळे पतीचा जीवाला धोका निर्मण होऊ शकतो.

हात रिकामे ठेवू नका

हिंदू धर्म ग्रंथानुसार विवाहित महिलांनी कधीही त्यांचे हात रिकामे ठेवू नयेत. नेहमी त्यांनी दोन काचेच्या बांगड्या घालाव्यात. हात रिकामे राहिल्यास पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.