मॅट किंवा ग्लॉस लिपस्टिक, हिवाळ्यात कोणत्या प्रकारची लिपस्टिक देईल परफेक्ट फिनिश
लिपस्टिक हा जवळपास सर्वच स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. फक्त एका लिपस्टिकमुळे सुद्धा सौंदर्यात भर पडू शकते. त्यासाठी भरगच्च मेकअप करण्याची गरज पडत नाही. मात्र हिवाळ्यात ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी योग्य लिपस्टिक निवडणं गरजेचं आहे. हिवाळ्यात मॅट की ग्लॉस कोणती लिपस्टिक लावणे ओठांसाठी योग्य आहे. जाणून घेऊयात...

हिवाळा ऋतू सुरु झाला की आपण आपल्या त्वचेची आणि ओठांची काळजी घेत असतो. वातावरणातील थंडाव्यामुळे अनेकांचे ओठ लवकर कोरडे होतात. त्यामुळे ओठातून रक्त निघणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी घरगुती उपायांचा अवलंब करून ओठांची काळजी घेतो. तर दुसरीकडे प्रत्येक महिलांच्या सौंदर्यात भर टाकण्याचं काम लिपस्टिक करत असते. पण कधी कधी थंडीच्या दिवसात लिपस्टिक लावताना मॅट लिपस्टिक वापरायची की ग्लॉसी लिपस्टिक वापरायची असा प्रश्न अनेकदा महिलांना पडतो. मॅट आणि ग्लॉसी लिपस्टिक या दोन्हींचे स्वतःचे फायदे आहेत.
अशातच थंडीच्या दिवसात योग्य लिपस्टिक निवडणे खूप महत्वाचे ठरते जेणेकरून ओठ सुंदर तर दिसतीलच पण हेल्दी ही राहतील. जाणून घेऊया हिवाळ्यात कोणती लिपस्टिक जास्त चांगली ठरेल?
हिवाळयात मॅट लिपस्टिक लावणे चांगले आहे का?
मॅट लिपस्टिक ही ओठांवर बराचकाळ टिकून राहते आणि उच्च पिग्मेंटेशनसाठी ओळखली जाते. यामुळे ओठांना बोल्ड आणि परफेक्ट लुक मिळतो. मात्र हिवाळ्यात मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण मॅट टेक्सचर्ड लिपस्टिकमुळे ओठ कोरडे होऊ शकतात.
मॅट लिपस्टिक लावण्याचे फायदे
मॅट लिपस्टिक बराच वेळ ओठांवर टिकते आणि एकदा ही लिपस्टिक लावल्यानंतर वारंवार टच-अपची आवश्यकता नसते. तसेच ही लिपस्टिक पसरत नाही आणि मेकअप परिपूर्ण दिसतो. याव्यतिरिक्त मॅट लिपस्टिक लावल्याने ओठांना प्रोफेशनल लुक मिळतो.
मॅट लिपस्टिक लावण्याचे परिणाम
तर हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात. अशावेळी तुम्ही कोरड्या ओठांवर मॅट लिपस्टिक लावल्याने ही समस्या अधिक वाढू शकते. मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना मॉइश्चरायझ करणे आवश्यक आहे, अन्यथा लिपस्टिक लावल्यास ओठ तडकलेले दिसतील.
हिवाळयात ग्लॉसी लिपस्टिक लावणे चांगले आहे का?
ग्लॉसी लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस ओठांना हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यात ग्लॉसी लिपस्टिक ओठांना चमकदार फिनिश फ्रेश आणि ग्लोइंग लुक देते, ज्यामुळे ओठ निरोगी आणि सुंदर दिसतात.
ग्लॉस लिपस्टिक लावण्याचे फायदे
ग्लॉस लिपस्टिकस या मॉइश्चरसमृद्ध असतात, त्यामुळे या लिपस्टिक ओठ मऊ आणि कोमल ठेवतात. ग्लॉस लिपस्टिकचा चमकदार पोत ओठांना चमकदार आणि हेल्दी लुक देतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात ग्लॉस लिपस्टिक ओठ कोरडे होण्यापासून वाचवते आणि नैसर्गिक चमक टिकवून ठेवते.
ग्लॉस लिपस्टिक लावण्याचे परिणाम
ग्लॉस लिपस्टिक ओठांवर दीर्घकाळ टिकणारी नसते. ग्लॉस लिपस्टिकसमध्ये मॉइश्चराइझर असल्याने ही लिपस्टिक लगेच ओठानावरून निघून जाते. त्यामुळे ग्लॉस लिपस्टिक तुम्हाला वारंवार लावावी लागते. ग्लॉस लिपस्टिक सहज पसरू शकते, ज्यामुळे तुमचा मेकअप खराब होऊ शकतो.
हिवाळ्यात कोणती लिपस्टिक जास्त चांगली असेल?
हिवाळ्यात बराच वेळ लुक चांगला दिसायला हवा यासाठी तुम्ही मॅट लिपस्टिक हा एक चांगला पर्याय निवडू शकता, पण मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना मॉइश्चरायझ करायला विसरू नका. तर दुसरीकडे तुमचे ओठ खूप कोरडे आणि फाटलेले असतील तर ग्लॉस लिपस्टिक तुमच्यासाठी सर्वोत्तम निवड असू शकते कारण यामुळे ओठांना ओलावा मिळतो आणि ते हेल्दी राहतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)