Mauni Amavasya 2021 | मौनी अमावस्येच्या दिवशी ‘महोदय’ योग, शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने मिळतील अनेक लाभ!

हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला ‘मौनी अमावस्या’ म्हणतात.

Mauni Amavasya 2021 | मौनी अमावस्येच्या दिवशी ‘महोदय’ योग, शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने मिळतील अनेक लाभ!
मौनी अमावस्या
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 11:40 AM

मुंबई : हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला ‘मौनी अमावस्या’ म्हणतात. यावेळी मौनी अमावस्या 11 फेब्रुवारीला येणार आहे. तसेच या महिन्यात आंघोळ केल्याने आपल्याला भरपूर पुण्य मिळते, असे म्हटले जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी आंघोळ केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो, अशी देखील मान्यता आहे. या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे (Mauni Amavasya 2021 muhurat and mahodaya yoga).

मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. पुराणानुसार या पवित्र दिवशी देव-देवता नदीच्या संगमामध्ये वास्तव्य करतात. यामुळेच मौनी अमावस्येला गंगा स्नान करण्यास विशेष महत्त्व आहे.

मौनी अमावस्येदिनी बनतोय महासंयोग

या वेळी मौनी अमावस्ये दिवशी चंद्र श्रावण नक्षत्रात आणि सहा ग्रह मकर राशीत असल्याने या दिनी ‘महासंयोग’ तयार होत आहेत. या शुभ मुहूर्ताला ‘महोदय योग’ असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते.

मौनी अमावस्येची तारीख, शुभ वेळ आणि पूजा करण्याची पद्धत

मौनी अमावस्या 10 फेब्रुवारी रोजी 1 वाजून 10 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि 11 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजून 37 मिनिटांनी संपेल. या खास दिवशी गंगा स्नान केल्यानंतर मौन धारण करून, उपवास करण्याचा संकल्प करा. यानंतर पिवळी फुले, केशर, चंदन, तुपाचा दिवा आणि प्रसादाने भगवान विष्णूची पूजा करा. तसेच या दिवशी विष्णू चालीसा किंवा विष्णू सहस्रनामांचे पठण करावे. यानंतर एका ब्राम्हणाला दान देखील द्यावे. संध्याकाळी मंदिरात दीपदान करुन आरती करावी आणि त्यानंतर भगवान विष्णूला मिठाईचा नैवैद्य दाखवावा. गाईला गोड भाकरी किंवा हिरवा चारा देऊन दुसर्‍या दिवशी उपवास सोडा (Mauni Amavasya 2021 muhurat and mahodaya yoga).

मौनी अमावस्या व्रत

मौनी अमावस्येच्या दिवशी नदी, तलावाच्या किंवा कोणत्याही पवित्र कुंडात स्नान करुन सूर्य देवाची प्रार्थना करा. उपवासानंतर शक्यतो शांत रहा. गरीब आणि भुकेलेल्या व्यक्तीला अन्न दान अवश्य करा. तसेच कपडे, धान्य, आवळा, तीळ, ब्लँकेट, तूप आणि गोठ्यातील गायीसाठी निश्चितच अन्नदान करा. ज्याप्रमाणे दुसऱ्या अमावस्येच्या दिवशी जशी आपण आपल्या वाड-वडिलांची आठवण काढतो, त्याचप्रमाणे या अमावास्येलाही पितरांना आठवा. या दिवशी आपल्या पूर्वजांचे तर्पण केल्याने मोक्ष मिळतो.

मौन बाळगण्याचे महत्त्व

या दिवशी मौन राहण्याची प्रथा आहे. असे म्हटले जाते की मौन धारण केल्यानंतर उपवास संपल्याने त्या व्यक्तीस मनुपदाचा दर्जा प्राप्त होतो. या दिवशी मौन बाळगणे म्हणजे मनावर संयम ठेवणे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो.

(Mauni Amavasya 2021 muhurat and mahodaya yoga)

हेही वाचा :

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.