पुरुषांनो, त्वचेसंदर्भात या चुका कधीच करू नका, अन्यथा कमी होईल चमक..

पुरूषांनी त्वचेकडे दुर्लक्ष न करता नीट काळजी घेतली पाहिजे. त्वचेची काळजी घेताना काही गोष्टींची विशेष काळजी घेऊन काही टिप्स फॉलो करणे महत्वाचे ठरते. त्यामुळे त्वचेची चमक कमी होत नाही. यासाठी काही टिप्स जाणून घेऊया.

पुरुषांनो, त्वचेसंदर्भात या चुका कधीच करू नका, अन्यथा कमी होईल चमक..
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 1:34 PM

Men Skin Care Mistakes : त्वचेची काळजी घेताना (skin care) पुरूष बरेच वेळा निष्काळजीपणा करतात. सर्वात पहिली चूक म्हणजे पुरुष त्यांचा चेहरा नीट धूत नाहीत. त्यामुळे बराच त्रास होतो व समस्यादेखील उद्भवतात. त्यांची दुसरी चूक म्हणजे काही वेळेस तू खूप जास्त स्क्रब करतात. या चुकांमुळे वेळेपूर्वीच त्यांच्या चेहऱ्याची चमक (skin glow) कमी होते.

बहुतांश पुरूष हे त्यांची त्वचा नीट ओळखत नाहीत. त्यांची त्वचा हार्ड असेल तर तेलकट क्रीम लावतात आणि तेलकट त्वचा असेल तर हार्ड क्रीम लावतात. त्यांच्या अनेक चुकांचा त्वचेवर परिणाम होतो. तुमची त्वचा नेहमी तरुण दिसावी असे वाटत असेल तर काही चुका चुकूनही करू नका.

1) स्किन टाइप न ओळखणे

बऱ्याच पुरुषांना असं वाटतं की त्यांची त्वचा महिलांपेक्षा जास्त तेलकट असल्यामुळे त्यांना जास्त लोशन किंवा क्रीमची गरज नाही. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याच्या त्वचेलाही ओलावा हवा असतो. म्हणूनच जर एखाद्या व्यक्तीने क्रीम लावले नाही तर त्या व्यक्तीचा चेहरा कोरडा होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारची चूक करू नका. आपली त्वचा कशी आहे ते ओळखून क्रीमचा वापर करा.

2) शेव्हिंग नंतर आफ्टशेव्हचा वापर

बहुतांश पुरुषांना असं वाटतं की शेव्हिंग केल्यानंतर आफ्टरशेव्ह लावल्यानंतर त्वचा सॉफ्ट होते. पण ही चुकीची समजूत असते. कारण आफ्टरशेव्ह लोशनमध्ये अल्कोहोल असते, ज्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे स्किन इरिटेट होते. त्यामुळे अशी चूक न करता आफ्टरशेव्ह लोशनऐवजी मॉयश्चरायझरचा वापर करावा.

3) महिलांना मॉइश्चरायझरची जास्त गरज असते

पुरूष हे मॉयश्चरायझरचा वापर अगदी क्वचितच करतात. मात्र त्यांना हे कळत नाही की मॉयश्चरायझर न वापरल्याने त्यांची त्वचा कोरडी होऊ लागते. पुरूषांनाही मॉयश्चरची गरज असते. यामुळेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी रेटीनॉल, मलबरी, विटामिन सी, हाइल्यूरोनिक ॲसिड आणि नियासिनामाइन असलेल्या प्रॉडक्ट्सचा वापर करावा, ते फायदेशीर ठरते.

4) शेव्हिंग क्रीम लावताना होते चूक

बहुतांश पुरुष हे हल्ली शेव्हिंग फोम वापरत असतात. ते शेव्हिंग फोम थेट ब्रशवर घेतात आणि शेव्हिंग सुरू करतात. त्यामुळे त्वचेवरही जळजळ होते. यासाठी ब्रश प्रथम कोमट पाण्यात बुडवून चेहऱ्यावर फिरवून घ्यावा आणि त्यानंतर दाढी करावी. तसेच मिल्क क्रीमचा वापर केल्यानेही दाढीचे केस मऊ होतात, आणि शेव्हिंग करताना त्रास होत नाही. तसेच तुमची स्किनही सॉफ्ट होते.

5) सनस्क्रीन न लावणे

बहुतांश पुरुषांना असं वाटतं की सनस्क्रीन फक्त महिलाच लावतात. पण हा त्यांचा गैरसमज आहे. पण उन्हात सनस्क्रीन लावलं नाही तर तुम्ही सूर्यकिरणांच्या थेट संपर्कात येता व त्यामुळे डार्क स्पॉट्स आणि हायपर पिगमेंटेशनचा त्रास होतो. यामुळे ऊन असो किंवा नसो, बाहेर जाताना नेहमी सनस्क्रीन लावले पाहिजे.

दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.