पुरुषांनी घरातील भांडी घासण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

काही पुरुष आपल्या घरामध्ये महिलांना घरकामासाठी मदत करतात. ही एक चांगली सवय आहे. मात्र घर काम केल्याचे पुरुषांसाठी देखील अनेक फायदे असल्याचं नुकतंच एका संशोधनातून समोर आलं आहे.

पुरुषांनी घरातील भांडी घासण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 4:13 PM

भारतीय कुटुंब पद्धतीमध्ये अनेकदा घरातील कामं या महिलाच करताना दिसतात. जर एखाद्या कुटुंबात फक्त पुरुषच नोकरी करत असेल तर त्या घरातील महिला ही घरातील सर्व कामे करते. दुसरीकेड जर एखाद्या कुटुंबात पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील तरी देखील त्या घरात नोकरीवरून आल्यानंतर पत्नी हीच घरातील सर्व कामे करताना दिसते. तसेच मुलांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी देखील तिच्याकडे असते. मात्र हळूहळू हे चित्र आता बदलत आहेत. अनेक पुरुष देखील आपल्या पत्नीला घरकामात मदत करताना दिसून येत आहेत. मात्र अजूनही हे प्रमाण खूप कमी आहे.

भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये पूर्वीपासूनच घरातील सर्व कामे या महिला करत आल्या आहेत. त्यामुळे आजही अनेक कुटुंबात आपल्याला हेच चित्र पाहायला मिळतं. घरातील महिला याच स्वंयपाक बनवतात, धुणे धुतात, भांडी देखील घासतात. मग भलेही ती देखील पतीच्या बरोबरीने नोकरी करून घराचा आर्थिक भार सांभाळत असेल. मात्र आता काही ठिकाणी पुरुष देखील आपल्या पत्नीला मदत करताना दिसतात. घरातील कामे दोघांनी मिळून केल्याचे अनेक फायदे आहेत. मात्र आज आपण घरातील भांडी जर पुरुषांनी घासली तर त्याचे काय फायदे आहेत, हे जाणून घेणार आहोत. नुकतंच एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.

पुरुषांनी भांडी घासण्याचे फायदे?   

याबाबत फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांकडून संशोधन करण्यात आलं आहे.  या संशोधनानुसार घरातील भांडी जर पुरुषांनी घासली तर त्याचा फायदा त्यांचा ताण-तणाव दूर होण्यासाठी होतो. या संशोधनातून असं समोर आलं  की, जेव्हा एखादा पुरुष भांडी घासण्यासाठी हातात घेतो तेव्हा तो त्या प्रक्रियेमध्ये गुंतून जातो, आणि त्यामुळे त्याच्यामागे जो ऑफिसचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा तणाव असेल तो विसरण्यास मदत होते. एवढंच नाही तर त्यामुळे सकारात्मक विचार देखील वाढीस लागतात. एकूण 51 लोकांवर हा प्रयोग करण्यात आला होता. भांडे घासल्यामुळे त्यांच्यावरील तणावर कमी झाल्याचं या संशोधणातून समोर आलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.