रजोनिवृत्तीबाबत जाणून घ्‍या – असा विषय, ज्‍याबाबत आजही मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात नाही

रजोनिवृत्ती हा एक असा टप्पा आहे, ज्याचा परिणाम सर्व महिलांवर त्‍यांच्‍या वयानुसार होत असल्याने जीवनातील या वेगळ्या टप्प्याबाबत महिलांमध्‍ये जागरुकता वाढवणे आणि त्यांना पाठिंबा देणे

रजोनिवृत्तीबाबत जाणून घ्‍या - असा विषय, ज्‍याबाबत आजही मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात नाही
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 1:33 AM

मुंबई : अॅबॉटने भारतातील रजोनिवृत्तीवर सर्वेक्षण करण्‍यासाठी इप्‍सोससोबत सहयोग केला, जेथे सात प्रमुख शहरांमधील १,२०० हून अधिक प्रतिसादकांनी या सर्वेक्षणामध्‍ये सहभाग घेतला. प्रमुख निष्‍पत्तींमधून निदर्शनास येते, ८७ टक्‍क्‍यांहून अधिक प्रतिसादकांचा विश्‍वास आहे की रजोनिवृत्तीचा महिलेच्‍या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो.सर्वेक्षणाने रजोनिवृत्तीबाबत चर्चेचा अभाव निदर्शनास आणला, जेथे ८४ टक्‍के प्रतिसादक सांगतात की याबाबत जागरूकता वाढवण्‍यासाठी अधिकाधिक महिलांनी त्‍यांच्‍या अनुभवांबाबत सांगणे गरजेचे आहे. रजोनिवृत्तीबाबत अधिक चर्चा होण्‍याला आणि अधिकाधिक गाथा सांगण्‍यास प्रेरित करण्‍यासाठी अॅबॉट ‘द नेक्‍स्‍ट चॅप्‍टर’ मोहिम सुरू करत आहे. माजी मिस युनिव्‍हर्स लारा दत्ता, तसेच प्रख्‍यात हेल्‍थकेअर स्‍पेशालिस्‍ट्स यांच्‍या उपस्थिती एका कार्यक्रमामध्‍ये या मोहिमेचा शुभारंभ करण्‍यात आला.

मुंबईत १९ ऑक्‍टोबर २०२२ – ऑक्टोबरमध्ये जागतिक रजोनिवृत्ती महिना साजरा करण्यासाठी जागतिक आरोग्यसेवा अग्रणी कंपनी अॅबॉट महिलांना जीवनाच्या या टप्प्यावर मुक्‍तपणे जगण्यासाठी सक्षम बनवण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत आहे.

इप्सॉससोबत सहयोगासह अॅबॉटने नुकत्‍याच केलेल्‍या सर्वेक्षणानुसार ८७ टक्‍के व्‍यक्‍तींना वाटते की, रजोनिवृत्तीचा महिलेच्या दैनंदिन जीवनावर लक्षणीय परिणाम होतो. तरीही, या विषयाबाबत फारशी चर्चा केली जात नाही.

रजोनिवृत्ती हा एक असा टप्पा आहे, ज्याचा परिणाम सर्व महिलांवर त्‍यांच्‍या वयानुसार होत असल्याने जीवनातील या वेगळ्या टप्प्याबाबत महिलांमध्‍ये जागरुकता वाढवणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे अॅबॉटचे ध्येय आहे.

रजोनिवृत्तीबाबत चर्चेला पाठिंबा देण्‍याच्‍या उद्देशाने अॅबॉट महिलांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍यासाठी आणि त्‍यांना आवश्‍यक असलेला पाठिंबा व केअर मिळवण्‍यास सक्षम करण्‍यासाठी ‘द नेक्‍स्‍ट चॅप्‍टर’ मोहिम सुरू करत आहे. आज महिलांचा रजोनिवृत्तीबाबतचा अद्वितीय पैलू व वैयक्तिक अनुभवांबाबत सांगणाऱ्या गाथांच्‍या संकलनासह ‘द नेक्‍स्‍ट चॅप्‍टर’ मोहिमेला सुरूवात झाली.

भारतात कथांचे हे संकलन माजी मिस युनिव्‍हर्स लारा दत्ता, तसेच द फेडरेशन ऑफ ऑब्‍स्‍टेट्रिक अॅण्‍ड ग्‍यानेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (एफओजीएसआय)चे नियुक्‍त अध्‍यक्ष प्रख्‍यात स्‍त्रीरोगतज्ञ ऋषिकेश पै, अपोलो व फोर्टिस हॉस्पिटल्‍सच्‍या कन्‍सल्‍टण्‍ट एण्‍डोक्रिनोलॉजिस्‍ट डॉ. तेजल लेथिया आणि शीदपीपलच्‍या संस्‍थापिका शैली चोप्रा यांच्‍या उपस्थितीत सादर करण्‍यात आले.

अॅबॉटच्‍या द नेक्‍स्‍ट चॅप्‍टरमधील रजोनिवृत्ती गाथांचे संकलन ई-बुक म्‍हणून उपलब्‍ध आहे, ज्‍यामध्‍ये भारत, चीन, ब्राझील व मेक्सिको या चार देशांमधील रजोनिवृत्ती महिलांचे वास्‍तविक अनुभव व गाथांचा समावेश आहे.

हार्मोनल बदलांचा नाते व करिअरवरील परिणामापासून आरोग्‍य व स्‍वावलंबीपणावरील परिणामापर्यंत द नेक्‍स्‍ट चॅप्‍टर (The Next Chapter) मधील प्रत्‍येक महिलेची गाथा अधिकाधिक महिलांना त्‍यांच्‍या अनुभवाबाबत सांगण्‍यास, रजोनिवृत्तीबाबत अधिक मुक्‍तपणे चर्चा करण्‍यास आणि कुटुंब व मित्रांकडून पाठिंबा मिळवण्‍यासाठी पुढाकार घेण्‍यास प्रोत्‍साहित करते.

प्रत्‍येक देशासाठी एक असे या बुकचे चार व्‍हर्जन्‍स आहेत, ज्‍यामध्‍ये भारतासह प्रत्‍येक देशामधील महिलेने निर्माण केलेले रजोनिवृत्तीबाबत सविस्‍तर माहिती सांगणारे सर्जनशील वर्णन आहे.

रजोनिवृत्ती – असा विषय, ज्‍याबाबत आजही मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात नाही रजोनिवृत्तीमुळे (जेव्‍हा मासिक पाळी कायमची थांबते) हार्मोन्‍समध्‍ये होणारे बदल सामान्‍यत: महिलांच्‍या वयाच्‍या चाळीशीमध्‍ये सुरूवात होते. सरासरी भारतीय महिला पाश्चिमात्‍य देशांमधील महिलांच्‍या तुलनेत जवळपास पाच वर्षे लवकर रजोनिवृत्तीचा अनुभव घेतात.

पाश्चिमात्‍य देशांमधील महिला जवळपास वयाच्‍या ४६व्‍या वर्षी रजोनिवृत्ती अनुभवतात. यामुळे अनेक शारीरिक, मानसिक व लैंगिक लक्षणे उद्भवू शकतात, ज्‍याचा जीवनाचा दर्जावर परिणाम होऊ शकतो.

सर्व महिला या परिवर्तनाचा अनुभव घेतात आणि त्‍यामधून अनेक महिलांना अस्‍वस्‍थ लक्षणे जाणवू शकतात, असे असले तरी अनेकदा त्‍याकडे दुर्लक्ष केले जाते. सामाजिक कलंक आणि जागरूकतेच्‍या अभावामुळे निम्‍या महिला रजोनिवृत्ती लक्षणांसाठी वैद्यकीय साह्य घेत नाहीत.

निषिद्ध विषय म्हणून रजोनिवृत्तीबद्दल आपले मत व्‍यक्‍त करत माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता म्हणाल्या, “रजोनिवृत्ती महिलेच्या नैसर्गिक जीवन प्रक्रियेचा एक भाग असली तरी, आपण अनेकदा याबाबत मौन बाळगतो. परिणामी, बऱ्याच महिलांना खरोखर काय अपेक्षित आहे हे माहित नसते.

आपण रजोनिवृत्तीबद्दल जितकी अधिक चर्चा करू, तितके अधिकाधिक महिलांना जीवनाच्या या टप्प्याबाबत अधिक चांगल्या प्रकारे समजण्‍यास मदत होईल. यामधून त्यांना त्यांचे मित्र, कुटुंब आणि डॉक्टरांशी बोलण्यास प्रेरणा मिळू शकते, यामुळे महिला लक्षणांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासोबत पुढे काय अपेक्षित आहे याचा स्‍वीकार करू शकतील.’’

सर्वेक्षणामधून रजोनिवृत्तीचा जीवनाच्‍या विविध पैलूंवर होणारा परिणाम निदर्शनास आला

अॅबॉटच्‍या सर्वेक्षणामध्‍ये सात शहरांमधील १,२०० हून अधिक व्‍यक्‍तींकडून माहिती घेण्‍यात आली. या सर्वेक्षणाचा जागरूकतेचे प्रमाण, समज व रजोनिवृत्तीदरम्‍यान महिलांना येणाऱ्या अनुभवांचे मूल्‍यांकन करण्‍याचा उद्देश होता. या सर्वेक्षणामध्‍ये ४५ ते ५५ वर्षे वयोगटातील महिला, तसेच कुटुंबातील सदस्‍यांचा समावेश होता.

1. ८२ टक्‍के प्रतिसादकांचा विश्‍वास आहे की, रजोनिवृत्तीचा महिलांच्‍या वैयक्तिक आरोग्‍यावर परिणम होऊ शकतो. अनेकांचा असा देखील विश्‍वास आहे की रजोनिवृत्तीचा त्‍यांचे लैंगिक जीवन (७८ टक्‍के), कौटुंबिक जीवन (७७ टक्‍के), सामाजिक जीवन (७४ टक्‍के) आणि कामकाज जीवन (८१ टक्‍के) यावर देखील परिणाम होतो.

2. जवळपास ४८ टक्‍के महिलांनी विविध रजोनिवृत्ती लक्षणे अनुभवल्‍याचे सांगितले, जसे कमी प्रमाणात रक्तस्त्राव (५९ टक्‍के), नैराश्य (५६ टक्‍के), संभोग करताना वेदना (५५ टक्‍के) आणि मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव (५३ टक्‍के).

3. जवळपास ८४ टक्‍के प्रतिसादकांना वाटते की रजोनिवृत्तीदरम्‍यान महिलांमध्‍ये अनेक बदल होतात, ज्‍यामुळे कुटुंबांनी त्‍यांची अधिक काळजी घेतली पाहिजे.

4. जवळपास ३७ टक्‍के महिलांनी त्‍यांच्‍या रजोनिवृत्ती लक्षणांबाबत स्‍त्रीरोगतज्ञांशी सल्‍लासमलत केली. यापैकी जवळपास ९३ टक्‍के महिलांनी लक्षणे दिसू लागल्यानंतर तीन महिने किंवा त्याहून अधिक कालावधीनंतर स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घेतला. स्त्रीरोगतज्ञाला भेट देणाऱ्यांपैकी ५४ टक्‍के महिला ७ महिन्यांहून अधिक काळ डॉक्टरांकडे गेल्‍या.

5. ७९ टक्‍के प्रतिसादकांचा विश्‍वास आहे की महिलांना रजोनिवृत्तीबद्दल त्यांचे कुटुंब, मित्र किंवा सहकाऱ्यांशी चर्चा करण्यास अस्‍वस्‍थ वाटते. ६२ टक्‍के महिला ‘त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे त्रास देऊ इच्छित नाहीत’.

6. ७६ टक्‍के महिलांनी सांगितले की, त्यांनी रजोनिवृत्तीदरम्यान त्यांच्या माता आणि/किंवा मोठ्या बहिणींना कोणतीही विशिष्ट मदत घेण्‍याबाबत कधीही ऐकले नव्हते.

7. सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍या ९४ टक्‍के पतींना वाटले की, जागरूकता वाढवण्‍यासाठी अधिकाधिक महिलांनी रजोनिवृत्तीबाबत त्‍यांच्‍या अनुभवांबद्दल सांगितले पाहिजे.

8. ८० टक्‍के प्रतिसादकांचा विश्‍वास होता की भारतात रजोनिवृत्तीपेक्षा गर्भनिरोधक व वंध्‍यतेबाबत चर्चा अधिक सामान्‍य आहे, ज्‍यामधून रजोनिवृत्तीबाबतचा निषिद्ध व ‘कलंक’ दिसून येतो.

या सर्वेक्षणामध्‍ये निदर्शनास आलेल्‍या पोकळीबाबत सांगताना डॉ. पै म्‍हणाले, ‘’रजोनिवृत्तीदरम्यान शरीरात कसे बदल होतात आणि महिला अस्वस्थ लक्षणांचे व्यवस्थापन कसे करू शकतात हे समजून घेणे त्यांना या परिवर्तनाशी सामना करण्‍यास मदत करण्यासाठी, त्यांचे दीर्घकालीन आरोग्य व जीवनाची गुणवत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे.

विशेषत: या परिवर्तनातून जात असलेल्या भारतीय महिलांच्या अनुभवांसह रजोनिवृत्तीची व्‍यापक लक्षणे व परिणामांबद्दल बहुमूल्‍य माहिती देत आपण महिलांना शिक्षित करण्यासाठी आणि जीवनाच्या या अवस्थेतील कलंक हाताळण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलू शकतो.’’

अॅबॉट इंडियाचे प्रादेशिक वैद्यकीय संचालक डॉ. पराग शेठ म्‍हणाले, ‘’अॅबॉटमध्‍ये आम्‍ही महिलांना दीर्घायुष्य आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

रजोनिवृत्ती अनेक महिलांसाठी आव्हानात्मक असू शकते. आम्ही महिलांच्या रजोनिवृत्तीच्या अनुभवांबद्दल जागरुकता वाढवत आहोत, ज्‍यामुळे महिलांना रजोनिवृत्ती अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल, त्याबद्दल बोलण्यास अधिक सोयीस्कर वाटू शकेल आणि त्यांना जीवनाच्‍या या टप्‍प्‍यामध्‍ये पूर्णपणे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेला पाठिंबा मिळेल.

आमच्या प्रयत्नांच्‍या माध्‍यमातून आम्ही महिलांना त्यांच्या जीवनातील हा नवीन अध्याय स्वीकारण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

अॅबॉटचे रजोनिवृत्तीवरील ई-बुक ‘द नेक्‍स्‍ट चॅप्‍टर’ आणि अतिरिक्‍त रजोनिवृत्ती संसाधने त्‍यांची वेबसाइट The Next Chapter – Womenfirst वर व फेसबुकवर <https://facebook.com/abbottindia> येथे उपलब्‍ध हाऊ शकतात. भारतातील महिलांना येथे (here) ‘द नेक्‍स्‍ट चॅप्‍टर’ डाऊनलोड करण्‍यास आणि हॅशटॅग #MenopauseStories चा वापर करत त्‍यांच्‍या सोशल मीडिया चॅनेल्‍सवर त्‍यांच्‍या अद्वितीय गाथा शेअर करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.