Be Alert | तुम्हालाही ‘वर्क फ्रॉम होम’च्या ‘या’ सवयी लागल्यात का? वाचा याचे परिणाम…

'वर्क फ्रॉम होम' करत असताना, आपल्यापैकी बरेचजण अशा प्रकारच्या चुका करतात, ज्याचा थेट परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.

Be Alert | तुम्हालाही ‘वर्क फ्रॉम होम’च्या ‘या’ सवयी लागल्यात का? वाचा याचे परिणाम...
वर्क फ्रॉम होम
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 3:05 PM

मुंबई : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आपला काम करण्याचा ट्रेंड खूप बदलला आहे. कार्यालयातील बहुतेक काम घरातूनच पूर्ण केले जात आहे. या नवीन ट्रेंडमध्ये स्वत:ला रुळवून घेण्यात अजूनही बर्‍याच लोकांना त्रास होत आहे. घरात काम अर्थात ‘वर्क फ्रॉम होम‘ करत असताना, आपल्यापैकी बरेचजण अशा प्रकारच्या चुका करतात, ज्याचा थेट परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो (Mental and physical health Tips for work from home).

सुरुवातीला ‘वर्क फ्रॉम होम’ ही नवीन संस्कृती स्वीकारणे प्रत्येकासाठी कठीण होते. कंपनी आणि कर्मचारी या दोघांनाही बर्‍याच समस्यांमधून जावे लागले. परंतु, लॉकडाऊनच्या दीर्घ कालावधीमुळे हळूहळू सगळ्यांनाच याची सवय झाली. यातही मजेशीर गोष्ट म्हणजे आता लोकांना ‘वर्क फ्रॉम होम’ इतके आवडू लागले आहे की त्यांना पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन काम करायचे नाही. यासाठी ते पगारामध्ये तडजोड करण्यासही तयार आहेत. परंतु, वर्क फ्रॉम होममुळे आरोग्याच्या समस्यादेखील वाढल्या आहेत.

शारीरिक आणि मानसिक त्रास वाढला!

वर्क फ्रॉम होममुळे घरातून काम करणाऱ्यांच्या कामाचे तास वाढल्याचे दिसून आले आहे. अनेकजण कामाच्या निर्धारित तासांपेक्षा एक ते दोन तास अधिक काम करतात, असे दिसून आले आहे. या संकल्पनेमुळे नवीन कौशल्य शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे. वर्क फ्रॉम होमच्या करण्यात आलेल्या सर्वेत 64 टक्के लोकांनी आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचे सांगतिले. 75 टक्के लोकांनी वर्क फ्रॉमहोममुळे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगतिले. अशा समस्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.

बेड आणि पलंगावर काम करू नका!

घरातून काम करायचे म्हणून घरी आरामात बसतो. बहुतेक लोक पलंग किंवा सोफ्यावर आरामात बसून काम करण्यास प्राधान्य देतात, ज्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. पलंगावर आणि बेडवर बसल्यामुळे तुमचे बॉडी पोश्चर खराब होते. म्हणून, डेस्क आणि खुर्चीवर बसूनच काम केले पाहिजे (Mental and physical health Tips for work from home).

टीमशी बोलत रहा.

एकटे काम केल्यामुळे संवाद कमी होतो. तसेच कामादरम्यान परस्पर संवाद न झाल्यामुळे गोंधळ होतो. कार्यसंघ लोकांनी मजकूर, संदेश, ऑडिओ आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलणे सुरू ठेवावे. हे व्यवस्थापक आणि सहकारी यांना चांगले संबंध राखण्यासाठी देखील मदत करते.

आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका!

कार्यालयात, आपण आपल्या डेस्कवरून कॉन्फरन्स हॉल आणि कॅफेटेरियामध्ये जाता. परंतु, जेव्हा आपण घरून काम करता तेव्हा आपली शारीरिक क्रिया कमी होते. यामुळे कंबर दुखणे, पाय दुखणे इत्यादी समस्या उद्भवतात. कधीकधी आपण कामाच्या दरम्यान लंच देखील खात नाही. म्हणून कामाच्या दबावातही आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.

आपली कौशल्ये वाढवा.

तथापि, आपली इच्छा असल्यास आपण कामासह आपली संप्रेषण कौशल्ये वाढवू शकता. दररोज नवीन तांत्रिक अॅपबद्दल माहिती मिळवा. जेणेकरुन आपण स्मार्टली काम करू शकाल.

(Mental and physical health Tips for work from home)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.